Home Blog Page 197

देशात 214 नवीन कोरोनाबाधित, BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण; ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?

संपादकिय:-

*देशात कोरोनाचा संसर्ग घटचाना दिसत आहे मात्र धोका कायम आहे.देशात आज 214 नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ही संख्या 228 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 14 रुग्णांची घट झाली आहे. देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण घटताना दिसत असेल तरी, कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या XBB आणि BF.7 या सब-व्हेरियंटचे रुग्ण देशात वाढताना दिसत आहे. देशात सध्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. इतकंच नाही तर नवीन BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत.*

*👉🟥👉मुंबई विमानतळावर 9 प्रवाशी कोरोनाबाधित*

*मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी नऊ जणाना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉन BQ 1.1 या सब व्हेरियंटचे रुग्ण आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या गाईडलाईन्सनंतर 24 डिसेंबरपासून आरटीपीसीआर कोरोना चाचणी परदेशातून आलेल्या नागरिकांची केली जात आहे.*

*👉🅾️👉11 कोविड नमुने NIV तपासणीसाठी पाठवले*

*राज्य सरकारच्या दैनंदिन कोविड अपडेटनुसार, मुंबईतील चारसह एकूण 11 कोविड-पॉझिटिव्ह नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.यापैकी, दोन रुग्णांना BQ.1.1 व्हेरियंटची लागण झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा मिळाला. या दोन रुग्णांमध्ये गोव्यातील एक 16 वर्षांचा मुलगा आणि नवी मुंबईतील एक 25 वर्षांची महिलेचा समावेश आहे. इतर नऊ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.*

*👉🅾️👉ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?*

*जगभरात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढवणाऱ्या बीएफ.7 आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे चा भारतातही शिरकार झाला आहे. भारतात बीएफ.7 व्हेरियंटचे सात आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे सात आणि BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत XBB व्हेरियंट आणि चीन, जपानमध्ये BF.7 व्हेरियंटचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले आहे.*

*👉🟥👉सर्दी, ताप नाही ‘ही’ आहेत नवीन लक्षणे*

*रिपोर्टनुसार, कोरोना रुग्णांमध्ये मागील काही महिन्यामध्ये आढळलेल्या खालील प्रमाणे लक्षणे दिसून आली. यामध्ये काही लक्षणे पूर्वीप्रमाणे सारखीच होती, तर काही लक्षणे नवीन असल्याचे दिसून येत आहे. घसा खवखवणे, डोकेदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, अंगदुखी, नाक वाहणे, थकवा येणे, शिंका येणे, रात्री घाम येणे ही नवीन लक्षणे आढळली आहेत.*

राज्यात 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर, राज्य शासनाचा निर्णय

संपादकिय:-

*मुंबई :-राज्यात 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. राज्य शासनाने आजच याबाबतचा निर्णय घेतलाय. राज्यातील महाडच्या डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दोन दिवसापूर्वी मोठा संप केला होता.त्यानंतर राज्य सरकारने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता राज्य सरकारकडून पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यभरातील 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.*

*👉🅾️👉दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील जवळपास 7 हजार निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. राज्याच्या आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यात यावी ही देखील या डॉक्टरांनी प्रमुख मागणी होती. संपादरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संपकरी डॉक्टरांसोबत चर्चा करून दोन दिवसांत राज्यातील निवासी डॉक्टरांची 1432 रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला होता. त्यामुळे राज्य शासनाने आज ही रिक्त पदे भरण्याची घोषणा केलीय.*

*👉🟥🟥👉या होत्या डॉक्टरांच्या मागण्या’*

*1,432 एसआर पदांची निर्मिती, वसतिगृहांची दुरूस्ती, वसतिगृहांची क्षमता वाढवणे, महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार अदा करा, सहयोगी तसेच सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरा, यासह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. यातील निवारी डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे.*

*👉🟥👉राज्यभरात आरोग्य विभागाची 527 रुग्णालये आहेत. या सर्व रूग्णालयांमध्ये जवळपास 46 हजारांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून वर्षाकाठी बाह्यरुग्ण विभागात जवळपास साडेतीन कोटी रुग्णांवर उपचार केले जातात, तर सुमारे 90 हजार छोट्या-माठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, पंतप्रधान मोतीबिंदू मुक्त भारत, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्लून, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनासह विविध राष्ट्रीय कार्यक्रम, तसेच आरोग्यविषयक राज्य उपक्रम, हिवताव, हत्तीरोग, डेंगी, चिकनगुन्यासह विविध साथरोग, तसेच मधुमेह व रक्तदाबासह असर्गजन्य आजारांपासून कर्करोगापर्यंत अनेक आजारांवर आरोग्य विभाग सतत्याने काम करीत आहे. माता आणि बाल आरोग्य, आदिवासी भागातील आरोग्य सेवा तसेच मानसिक आजाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या कमाची वाढती व्याप्ती लक्षात घेता ताबडतोब डॉक्टरांपासून लिपीकांपर्यंतची पदे भरण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे होते. अखेर आज राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.*

उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीला यश  महावितरणचा संप मागे

img 20230105 wa0027

संपादकिय:-

32 संघटना आणि दीड लाख कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे ठप्प झालेला वीजपुरवठा आता पुन्हा पूर्ववत होणार आहे, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपनीचे खाजगीकरण होणार नाही उलट पन्नास हजार कोटीची गुंतवणूक करू, असे आश्वासन दिल्याने सर्व संघटनांनी एकत्र येऊन संप मागे घेतला आहे.पूर्वीच्या एमएसईबी असलेल्या आत्ताच्या महावितरण, महाजनको आणि महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध करत मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे सकाळपासून राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.*

*मुंबई:-राज्यभरातील आज सकाळपासून बत्ती गुल झाली होती. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता.अखेर सरकारने हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार होती. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी ठाम होते.त्यानंतर आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. हा संप मागे घेण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, महावितरणचे खासगीकरण करायचे नाही. त्याबद्दल कोणताही विचार नाही असंही फडणवीस म्हणाले आहेत. आज वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे.*

*👉🅾️👉देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?*

*राज्य सरकारला कोणत्याही कंपन्यांच खासगीकरण करायचं नाही. राज्य सरकारला तिन्ही कंपन्यांच खासगीकरण करायचं नाही. ३२ संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. तीन ते चार मुद्यांवर सकारत्मक चर्चा झाली. वीज कंपन्यांमध्ये सरकार गुंतवणूक करणार आहे. वीज कंपन्यांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याचेही फडणवीस यावेळी म्हणालेत.*

*👉🟥👉उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करताना म्हटले की, राज्य सरकारला वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचे नाही.येत्या तीन वर्षात राज्य सरकार 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. अदानी समूहाने समांतर परवान्यासाठी अर्ज केला. त्याच्या निषेधार्थ हा संप करण्यात आला होता. याबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, समांतर परवान्याबाबत महावितरण, सरकारने अर्ज वीज नियामक आयोगाकडे करायला हवे अशी भूमिका वीज कर्मचारी संघटनांनी मांडली होती.*

*👉🅾️👉राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचे निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, असे फडणवीस यांनी म्हटले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.*

सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

संपादकिय:-

पुणे, दि. ४: पुण्यातील १८ पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आली असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल; त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते स्वारगेट पोलीस ठाण्यातील बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, कायद्यानुसार सर्वच पोलीस ठाण्यामध्ये बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाची सुरुवात होणार आहे. लहान बालके व महिलांवर अन्याय व अत्याचार झाल्यास ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना पोलीसांची भिती वाटू नये, त्या ठिकाणी विश्वास वाटावा, दडपण येऊ नये यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, बालस्नेही कक्षात येणारे अत्याचारित बालक, विधीसंघर्षग्रस्त बालक बोलके व्हावे, गुन्ह्याची नोंद होईपर्यंत त्यांच्या बसण्याची, रमण्याची, खेळण्याची व्यवस्था करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कक्ष उभारण्यासाठी सामाजिक उत्तर दायित्व निधीसोबतच जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल.

आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्याला लवकर जामीन मिळाला नाही, न्यायालयात गतीने खटले दाखल करुन चालवले आणि गुन्हे सिद्धतचे प्रमाण वाढून शिक्षा झाल्यास आरोपींच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल. त्यादृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही यावेळी श्री. पाटील म्हणाले.

यावेळी श्री. पाटील यांनी मुलांना खेळणी व खाऊचे वाटप केले तसेच गुलटेकडी येथील सेठ दगडूराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले. यावेळी ‘होप फॉर दि चिल्ड्रेन फॉऊडेशन’चे व्यवस्थापक शकील शेख यांचा कक्ष उभारणीमध्ये केलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

*असा आहे ‘बालस्नेही कक्ष*
आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून स्वारगेट पोलीस ठाणे अंतर्गत बालस्नेही कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस ठाणे परिसरातील रंगरंगोटी व स्वच्छता तसेच नुतनीकरण पुणे पोलीस मास निधीतून करण्यात आले आहे.

कायद्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात बाल कल्याण कल्याण पोलीस अधिकारी नेमणे आवश्यक आहे. बालकांचे जबाब नोंदवितांना त्यांच्यावर दडपण येऊ नये यासाठी हे बालकल्याण पोलीस अधिकारी पिडीत बालक, विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत संवाद साधतील तसेच त्यांना समुपदेशन करण्यात येईल. अत्याचारग्रस्त पिडीत बालक त्यांच्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती विश्वासाने व मनमोकळेपणाने देण्यासाठी कक्षात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यासाठी येथे प्रयत्न केला जाणार आहे.

बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी त्यास प्रोत्साहित करणे. बालक गैरवर्तन करु नये याकरीता त्यांच्यामनात सकारात्मक विचार निर्माण करणे. बालकाला घडलेल्या घटनेची माहिती देण्यासोबत त्यास समुपदेशन व मानसशास्त्रीय आधार किंवा वैद्यकीय उपचार देणे आदी काम या ठिकाणी होणार आहे. स्वारगेट पोलीस ठाणे व होप फॉर दि चिल्ड्रेन फॉऊडेशन यांच्या समन्वयाने बालस्नेही कक्षाचे कामकाज करण्यात येणार आहे.

शेतकरी शेतमजुरांनी आपल्या हक्कासाठी एकत्रित यावे!प्रशांत डिक्कर यांचे आवाहन.

पंचाळा येथे शेतकऱ्यांची बैठक संपन्न.

संग्रामपूर / विदर्भात वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी शेतमजुरांनी एकत्रितपणे लढा उभारुन आपल्या न्याय हक्कासाठी संघटीत यावे असे आवाहन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी पंचाळा येथिल पार पडलेल्या बैठकीत बोलतांना केले आहे. नैसर्गिक संकटे, उत्पादनात घट आणि यामधून नैराश्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार २०२० मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये १८% वाढ झाली आहे. यामध्ये दुर्देव म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. शेती व्यवसयासाठी सरकारी योजना, विविध बाबतींमध्ये सवलती असे असतांना देखील शेतकरी आणि शेतमजूर यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. हे केंद्र व राज्यातील सरकारचे अपयश असल्याची खंत यावेळी प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना व्यक्त केली. राज्यातील काही शेतकरी स्वत:ची जमीन असलेले आहेत आणि ते त्याची लागवड करतात, तर शेतमजूर म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत इतरांच्या शेतात काम करतात. त्यामुळे शेतमजूरही आत्महत्येचे बळी ठरत आहेत. हे आलेले संकटे रोखण्यासाठी आम्ही धडपडतो आहे. याकरीता शेतकरी शेतमजुरांनी संघटीतपणे साथ द्यावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. या बैठकीला स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष विजय ठाकरे, मंगेश खानझोड, संतोष म्हसाड, विजय खानझोड, नंदू पाटील निलेश खानझोड, रवि खानझोड, ज्ञानेश्वर खानझोड, युवराज पाटील, अंकित अहीर, बाळकृष्ण पाटील , विलास पाटील, सुनिल पाटील, गजानन खानझोड, भगवान पाटील, यांच्या सह बहुसंख्य गावातील नागरिक उपस्थित होते. तसेच पंचाळा येथिल शेतकऱ्यांच्या वतीने आदरणीय प्रशांतभाऊ डिक्कर यांचा सत्कार करण्यात आला..

दुःखद निधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

संपादकिय:-

अहमदाबाद — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

याच वर्षी 18 जून रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हीराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांचे प्रधान सचिव के. कैलासनाथन रुग्णालयात गेले होते.त्यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटून हीराबेन यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. तसेच त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला आले होते. त्यांनी आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच आईसोबत थोडावेळ घालवला होता.

हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: गांधीनगर येथे येणार असल्याचं वृत्त आहे.मोदी अंत्यसंस्काराला येणार असल्याने गांधी नगरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे.हीराबेन यांचा जन्म 18 जून 1923मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सात भाऊ बहीण आहेत. सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, बहीण वासंतीबेन, पंकजभाई मोदी आदी त्यांच्या भाऊ आणि बहिणींची नावे आहेत. त्यात मोदी तिसऱ्या क्रमांकाचे आहेत.मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी अहमदाबादमध्ये किराणा दुकान चालवतात. मोदींचे मोठे बंधू सोमभाई आरोग्य विभागात कामाला होते, आता ते निवृत्त झाले आहेत. ते आता अहमदाबादेत एक वृद्धाश्रम चालवतात. तसेच सामाजिक कार्यात व्यस्त असतात.

अमरुतभाई यांनी एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम केलं आहे. आता तेही निवृत्त झालेले आहेत. मोदी यांचे सर्वात लहान बंधू पंकज मोदी हे गुजरातच्या माहिती विभागात कामाला होते. तेही निवृत्त झाले आहेत. हीराबेन पंकजभाईंसोबतच गांधीनगरला राहत होत्या.

error: Content is protected !!