Home Blog Page 196

अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार

संपादकिय:-

*नवी दिल्ली :-संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होऊन ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल, असेही सांगण्यात आले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होईल आणि 6 एप्रिलपर्यंत चालेल, ज्यामध्ये सामान्य सुट्टीसह 66 दिवसांत 27 बैठका होणार आहेत.*

*👉🅾️👉प्रह्वाद जोशी यांनी माहिती दिली की 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, 14 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत सुट्टी असेल, जेणेकरून विभाग-संबंधित संसदीय स्थायी समित्या अनुदानाच्या मागण्यांचे परीक्षण करू शकतील आणि त्यांच्या मंत्रालये/विभागांशी संबंधित अहवाल तयार करू शकतील.*

*👉🅾️👉संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, विरोधकांनी आरोप केला की त्यांना अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) 9 डिसेंबर रोजी झालेल्या भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीवर चर्चा करण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे अधिवेशनात अनेक व्यत्यय निर्माण झाला होता.या सगळ्यात आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आवश्यक आहे कारण सध्या जग रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धातून जात आहे. या युद्धाचा परिणाम जागतिक स्तरावर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर झाला आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने देखील 2023 मध्ये येऊ घातलेल्या मंदीचा इशारा दिला आहे.*

*👉🔴👉राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने गुरुवारी (12 जानेवारी) सांगितले की, अन्नधान्याच्या किमती नरमल्याने भारतातील किरकोळ महागाई डिसेंबरमध्ये 12 महिन्यांच्या नीचांकी 5.7 टक्क्यांवर आली आहे. डिसेंबर 2022 ला संपलेली तिमाही ही सलग चौथी तिमाही होती जेव्हा CPI 6 टक्क्यांच्या वर राहिला.*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम-उपमुख्यमंत्री

संपादकिय:-

पुणे, दि.१३: महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून उत्तमप्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे आयोजित ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, मेघना बोर्डीकर साकोरे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस महासंचालक तथा गृह रक्षक दलाचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार, अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंग, पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद आदी उपस्थित होते.

अनेक चांगल्या परंपरा महाराष्ट्राच्या पोलीस दलाने कायम केल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासह लोकशाहीची मुल्ये जपण्याकरिता पोलीस दल कार्यरत आहे. विपरीत परिस्थितीत पोलीस कर्मचारी काम करतात. पोलिसांनी कोरोना काळात जीवनाची जोखीम पत्करून प्रचंड काम केले. त्यादरम्यान काही पोलिसांना शहीद व्हावे लागले. अशाही परिस्थितीत सामान्य माणसाचे जीवन सुकर व्हावे यासाठी पोलीस दलाने काम केले, असेही ते म्हणाले.

*पोलीस दलासाठी पुणे येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल*
२०१९ मध्ये पुण्यात पोलीस दलातील खेळाडूंसाठी चांगले क्रीडा संकुल तयार करण्याचा मनोदय पोलीस महासंचालकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलीस विभागाकडून अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल. बालेवाडी येथे खेळासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. पण पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यादृष्टीने पायाभूत सुविधांची याठिकाणी व्यवस्था करण्यात येईल.

*पोलीस दलातील खेळाडू देशाचे नाव मोठे करतात*
उपमुख्यमंत्री म्हणाले, पोलीस दलातील क्रीडापटूंसाठी या स्पर्धा महत्वाच्या असून त्यातून क्रीडा गुणांना वाव मिळतो आणि राष्ट्रीय स्पर्धेतही आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याची संधी मिळते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी पदके मिळवतात, देशाचे नाव मोठे करण्याचे काम करतात. अशा खेळाडूंना वाव देण्यासाठी या स्पर्धांना महत्व आहे.

खेळात जय-पराजय होत असतो शेवटी खिलाडूवृत्ती महत्वाची असते. खिलाडूवृत्ती आत्मसात केल्यास विजय डोक्यात जात नाही आणि पराभवाने निराशा येत नाही. माणूस हरल्यानंतरही जिद्दीने कामाला लागतो. पोलिसांना तणावाचा सामना करावा लागत असल्याने त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी खेळ महत्वाचे आहेत. खेळामुळे शिस्त आणि जिद्द निर्माण हेाते, असे श्री.फडणवीस म्हणाले.

प्रशिक्षण संचालनालयाने क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून यातून पोलीस दलाला सन्मान मिळवून देणारे चांगले खेळाडू मिळतील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दलही कौतुगोद्गार काढले.

पोलीस महासंचालक श्री.सेठ म्हणाले, या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या उत्साहात पार पडल्या. पोलीस खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, संघभावना वाढावी, आरोग्य राहावे मनोबल वाढावे यासाठी या स्पर्धा उपयुक्त आहेत. या स्पर्धेत ६ नवीन विक्रम नोंदले गेले. पुणे येथे २८ एकर जागेत पोलीस क्रीडा संकुल आणि होस्टेल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री. फडणवीस यांचा हस्ते विजयी खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. महिला गटात मंजिरी रेवाळे यांनी सुवर्णपदक, प्रियंका फाळके रौप्यपदक आणि नाजुका भोर यांनी कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात पप्पू तोडकर यांनी सुवर्णपदक, बाबासाहेब मंडलिक रौप्यपदक आणि मल्लिकार्जुन बिराजदार यांनी कांस्यपदक पटकावले.

स्पर्धेमध्ये पुरुष गटात सर्वाधिक पदके मिळवत राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वाधिक क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

प्रास्ताविक अनुप कुमार सिंग यांनी केले. आभार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मानले.

यावेळी राज्य राखीव पोलीस बल, प्रशिक्षण केंद्र नानविज येथील प्रशिक्षणार्थीनी नाईट सायलंट आर्म ड्रील या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

संपादकिय:-

पुणे दि. १३ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पीएम- किसान योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे प्रतिवर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. योजनेच्या १३ व्या हप्त्याच्या वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे. हा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाने लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आणि लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. या बाबी पूर्ण झाल्या तरच योजनेचे पुढील हप्ते लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होतील.

ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांस स्वतः पीएम किसान पोर्टलवरील ‘फार्मर कॉर्नर’मधून किंवा सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. लाभार्थ्यांने ‘फार्मर कॉर्नर’ मधून स्वत: ई-केवायसी करुन घेतल्यास त्यास कोणतेही शुल्क राहणार नाही. सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करण्यासाठी प्रती लाभार्थी १५ रुपये शुल्क आकारणी करण्यात येईल.

लाभार्थींनी या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, बैंक पासबुक, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे बँकेत जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून डीबीटी सुविधा प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे उपआयुक्त (कृषि गणना) तथा पी. एम. किसान पथक प्रमुख गणेश घोरपडे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

img 20230111 wa0017

संपादक:- रामवर्मा आसबे

पुणे, दि.११: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ चे उद्घाटन करुन मोटारसायकल फेरीला शुभारंभ करण्यात आला. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत हा सप्ताह राबवण्यात येत आहे.

यावेळी पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, अमर देसाई व युवराज पाटील उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केवळ सप्ताहापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्राचा शोध घेऊन त्याची दुरुस्ती करावी. देशात मोठ्या प्रमाणात रस्ते विकासाची कामे सुरू असताना अपघातांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे नागरिकानी प्रवास करताना सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर करण्यासह वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले.

मोटरसायकल फेरीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु होऊन पुढे कॅम्प, पुलगेट, स्वारगेट, सारसबाग, टिळक रोड, लकडी पुल, फर्ग्युसन महाविद्यालय रोड, कृषी महाविद्यालय, संचेती हॉस्पिटल मार्गे परिवहन कार्यालय येथे या फेरीचा समारोप करण्यात आला.

कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

img 20230111 wa0005

संपादक:- रामवर्मा आसबे

पुणे, दि. १०: कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करीत असल्याने त्यांना चांगले मानधन निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्तीमहर्षी स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी कोथरुड येथे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, आयोजक तथा माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाने राज्यस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग तीनच्या पदावर, राष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग दोनच्या पदावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग एकच्या पदावर थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उत्तम नियोजन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. या निमित्ताने मोठे मैदान, आकर्षक बक्षिसे तसेच खेळाडूंसाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

खासदार श्री. तडस म्हणाले, महाराष्ट्राच्या मातीतला खेळ म्हणून कुस्ती खेळाकडे बघितले जाते. कुस्ती खेळाला वैभव प्राप्त व्हावे आणि राज्यातील मल्ल ऑलिम्पिकमध्ये सहभागी होवून पदक जिकंण्याच्यादृष्टीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत. गेल्या ६५ वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

आमदार बावनकुळे म्हणाले, राज्याला अभिमान वाटावा अशा प्रकारचे आयोजन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नवीन खेळाडू उदयास येत आहेत. कुस्ती खेळाडूंनी संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करीत असतात. राज्यातील कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. मोहोळ म्हणाले, कुस्ती खेळाला प्रोत्साहन देण्यासोबतच त्यामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने १० ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातून सुमारे ९५० कुस्तीपटू सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले.

श्री. पाटील यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडचे पै. शेखर लोखंडे आणि जालना जिल्ह्याचे पै. अभिशेख पोरवाल यांच्यामध्ये कुस्ती लावून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पै. गोविंद घारगे लिखित ‘महाराष्ट्र केसरी वसा आणि वारसा’ या पुस्तकाचे अनावरण तसेच राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष स्व. दामोदर टकले यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह नामवंत कुस्तीपटू उपस्थित होते.

देशात 214 नवीन कोरोनाबाधित, BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण; ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?

संपादकिय:-

*देशात कोरोनाचा संसर्ग घटचाना दिसत आहे मात्र धोका कायम आहे.देशात आज 214 नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ही संख्या 228 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 14 रुग्णांची घट झाली आहे. देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण घटताना दिसत असेल तरी, कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या XBB आणि BF.7 या सब-व्हेरियंटचे रुग्ण देशात वाढताना दिसत आहे. देशात सध्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. इतकंच नाही तर नवीन BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत.*

*👉🟥👉मुंबई विमानतळावर 9 प्रवाशी कोरोनाबाधित*

*मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी नऊ जणाना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉन BQ 1.1 या सब व्हेरियंटचे रुग्ण आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या गाईडलाईन्सनंतर 24 डिसेंबरपासून आरटीपीसीआर कोरोना चाचणी परदेशातून आलेल्या नागरिकांची केली जात आहे.*

*👉🅾️👉11 कोविड नमुने NIV तपासणीसाठी पाठवले*

*राज्य सरकारच्या दैनंदिन कोविड अपडेटनुसार, मुंबईतील चारसह एकूण 11 कोविड-पॉझिटिव्ह नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.यापैकी, दोन रुग्णांना BQ.1.1 व्हेरियंटची लागण झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा मिळाला. या दोन रुग्णांमध्ये गोव्यातील एक 16 वर्षांचा मुलगा आणि नवी मुंबईतील एक 25 वर्षांची महिलेचा समावेश आहे. इतर नऊ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.*

*👉🅾️👉ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?*

*जगभरात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढवणाऱ्या बीएफ.7 आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे चा भारतातही शिरकार झाला आहे. भारतात बीएफ.7 व्हेरियंटचे सात आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे सात आणि BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत XBB व्हेरियंट आणि चीन, जपानमध्ये BF.7 व्हेरियंटचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले आहे.*

*👉🟥👉सर्दी, ताप नाही ‘ही’ आहेत नवीन लक्षणे*

*रिपोर्टनुसार, कोरोना रुग्णांमध्ये मागील काही महिन्यामध्ये आढळलेल्या खालील प्रमाणे लक्षणे दिसून आली. यामध्ये काही लक्षणे पूर्वीप्रमाणे सारखीच होती, तर काही लक्षणे नवीन असल्याचे दिसून येत आहे. घसा खवखवणे, डोकेदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, अंगदुखी, नाक वाहणे, थकवा येणे, शिंका येणे, रात्री घाम येणे ही नवीन लक्षणे आढळली आहेत.*

error: Content is protected !!