Home Blog Page 186

राज्यात H3N2 चा धोका वाढला,२३ वर्षीय तरुणासह तीन जणांचा बळी, सरकारचे नवे आदेश

मुंबई – : पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 विषाणुमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी अहमदनगर आणि नागपूरमध्ये या व्हायरसने बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर राज्य सरकारने नवे आदेश जारी केले आहेत.*

*👉🛑🛑👉महाराष्ट्रात कोरोनाच्या भीतीनंतर आता H3N2 व्हायरसच्या संसर्गाने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मागील तीन दिवसांत राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तात्काळ संसर्गजन्य H3N2 ची आढावा बैठक घेतली. यानंतर राज्य सरकारने नवे आदेश जारी केले आहेत.*

*👉🔴🔴👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी H3N2 संसर्गाबाबत बैठक बोलावली होती. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोविड १९ व H3N2 हे दोन्ही संसर्गाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कोरोना व एच३एन२ या व्हायरसच्या प्रसाराची कारणेही सारखी आहेत. त्यामुळेच कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा ही पुन्हा ॲक्टीव्ह करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.*

*👉🟥🟥👉मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश खालीलप्रमाणे -*

*👉🔺🔺👉गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आजारी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे.*

*👉🔺🔺👉सर्दी खोकला यासारखी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांच्या सल्यानुसार औषध घ्यावी,*

*👉🔺🔺👉गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क वापरावा.*

*पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 विषाणुमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी अहमदनगर आणि नागपूरमध्ये या व्हायरसने बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता राज्यातील H3N2 बाधित रुग्णाच्या मृत्यूची संख्या तीनवर पोहोचली आहे. अहमदनगरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा २३ वर्षीय विद्यार्थी होता.*

शैक्षणिक संस्थांना नॅक मुल्यांकन नोंदणीसाठी मुदतवाढ* – *उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नॅक मुल्यांकनबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी परीस स्पर्श योजना*

मुंबई दि. १६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक संस्थांना नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी नॅक मुल्यांकन करुन घेण्यासाठीची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

शैक्षणिक संस्थांना नॅक मुल्यांकन प्रक्रियेतील अडीअडचणी सोडविण्यासाठी परिस स्पर्श योजना प्रस्तावित असल्याचेहीमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले
सदस्य कपिल पाटील यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी माहिती देतांना सांगितले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांनी नॅक मानांकन व मूल्यांकनाच्या प्रक्रियेत आपली गुणवत्ता राखणे, गुणवत्ता वाढ करणे अपेक्षित आहे. यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी मदत व प्रोत्साहन देण्यात येत आहे. तथापि सन 2010 पासुन वारंवार शासन स्तरावरून सूचना देऊनही शैक्षणिक संस्था याबाबत उदासीन दिसून येत आहेत. नुकतेच शासनाने पुढील सहा महिन्यात नॅक मूल्यांकन करून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच वेळोवेळी विविध कार्यशाळा घेऊन नॅक मूल्यांकन नोंदणीसाठी प्रोत्साहीत करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक संस्थांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या जात आहेत. यासाठी परिस स्पर्श योजना प्रस्तावित असून 175 नॅक पात्र महाविद्यालयांना मेंटोर म्हणून निश्चित करण्यात आले आहे. या महाविद्यालयांद्वारे प्रत्येकी पाच महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनासाठी मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
उच्च शिक्षण विभागाचे संचालक यांनी नॅक मूल्यांकनासंदर्भात महाविद्यालयांना दिलेल्या सूचनामुळे कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
या चर्चेत सदस्य विक्रम काळे, अभिजीत वंजारी यांनी सहभाग घेतला.

राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; आरोग्यमंत्र्यांनीही दिले संकेत

संपादक :- रामवर्मा आसबे

संपूर्ण राज्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे. H3N2 विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आज आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे.या बैठकीत राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.*

*👉🟥👉कोरोनानंतर देशावर आता नव्या विषाणूचं संकट आलं आहे. सध्या देशात H3N2 विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्येही या विषाणूने डोकं वर काढलं आहे. मुंबई आणि पुण्यासह इतर महत्वाच्या शहरांमध्ये H3N2 विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत.मार्च महिन्यातील 15 दिवसांत मुंबईमध्ये H3N2 विषाणूच्या 53 रुग्णांची नोंद झाली आहे. तर जानेवारी ते मार्च या 75 दिवसात H3N2 चे 118 रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे बुधवारी राज्यात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एक रुग्ण अहमदनगर आणि एक रुग्ण नागपूर येथील आहे.*

*👉🟥👉इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे 19 ते 60 वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. यावरून या विषाणूची साथ पुण्यात मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हायरसची लक्षणं ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहे. त्यामुळे जीवघेणी बाब नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.*

*👉🅾️🅾️👉आरोग्यमंत्री तानाजी सावंत काय म्हणाले?*

*दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या पार्श्वभूमीवर महत्वाचं आवाहन केलं आहे. H3N2 मृत्यू होत नाही. तो रूग्ण 2 दिवसांत बरा होता. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी असे संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार केले जातील. आजार अंगावर काढू नका. खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, अंतर पाळा तसेच मास्क वापरा, असं आवाहन तानाजी सावंत यांनी केलं आहे.*

*👉🅾️🅾️👉दुसरीकडे, राज्यातील सर्व खाजगी प्रॅक्टिशनर्सना मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली गेली आहे. जर 24 तासांच्या आत ताप कमी झाला नाही तर चाचण्यांच्या निकालांची वाट न पाहता Oseltamivir हे औषध ताबडतोब सुरू केले जावे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.*

मुंबईत इन्फ्लुएन्झाचे 118 रुग्ण,H3N2 चे 15 रुग्ण तर कोरोनाच्या 176 नव्या रुग्णांची नोंद

मुंबई:-राज्यात आधी कोरोनाचा संसर्ग होता. त्यानंतर इन्फ्लुएन्झा एच्या H3 N2 चा संसर्ग झालेल रुग्ण आढळत आहे. भरीस भर म्हणजे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. हवामान बदलत असताना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.मुंबईमध्ये गेले तीन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. त्यातच आता इन्फ्लुएन्झा एच्या H3 N2 या विषाणुचा शिरकाव झाला आहे. मुंबईत H3 N2 या विषाणूची लागण झालेले १५ रुग्ण आढळून आले आहेत. H1 N1 आणि H3 N2 इन्फ्लुएन्झाचे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात ११८ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.*

*👉🟥🟥👉मुंबईत H3 N2 चे १५ रुग्ण -*

*मुंबईत तीन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. मार्चमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मुंबईकर चिंतेत असताना H3 N2 चे १५ रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीत १, फेब्रुवारीत ७ तर मार्च मध्ये ७ रुग्ण आढळून आले आहेत. इतर H1 N1 चे १०३ असे इन्फ्लुएन्झाचे एकूण ११८ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या H3 N2 चे ४ तर H1 N1 चे २८ असे एकूण ३२ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. H3 N2 च्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात १० बेडचा स्पेशल वॉर्ड तैनात ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे असे आवाहन डॉ. संजीवकुमार यांनी केले आहे.*

*👉🛑🛑👉राज्यात इन्फ्लुएन्झाचे ३६१ रुग्ण -*

*राज्यात इन्फ्लुएन्झाचे एकूण ३६१ रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. H1 N1 चे ३०३ रुग्ण आढळून आले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर H3 N2 चे ५८ रुग्ण आढळून आले आहेत. H3 N2 चे ४८ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. नागपूर आणि अहमदनगर (छत्रपती संभाजी नगर) येथे इन्फ्लुएन्झा ए च्या H3 N2 मुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही मृत्यू संशयित मृत्यू म्हणून नोंद झाले आहेत. डेथ ऑडिट कमिटीच्या अहवालानंतर हे मृत्यू नेमके H3 N2 चे आहेत का हे स्पष्ट होणार आहेत. राज्यात H1 N1 म्हणजेच स्वाईन फ्लूचे २०१७ ते २०२३ या सात वर्षाच्या कालावधीत १५ हजार ५५० रुग्ण आढळून आले असून १७०८ मृत्यू झाले आहेत. राज्यात 11 मार्चला 114, 12 मार्चला 101 तर 14 मार्चला 155 रुग्णांची नोंद झाली. त्यात आणखी वाढ होऊन 15 मार्चला 176 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत 31 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत असताना इन्फ्लुएन्झा या आजाराचे रुग्ण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असे आवाहन करण्यात आले आहे.*

*👉🔴🔴👉राज्यात 176 नवे रुग्ण -*

*राज्यात 15 मार्च रोजी 176 रुग्णांची नोंद झाली आहे. 51 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या 787 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 38 हजार 829 रुग्णांची नोंद झालेली आहे त्यापैकी 79 लाख 89 हजार 616 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 426 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 11 मार्चला 114, 12 मार्चला 101, 15 मार्चला 155, 10 मार्चला 93, 9 मार्चला 90, 7 मार्चला 80 तर 3 मार्चला 66 रुग्णांची नोंद झाली होती.*

*👉🟥🟥👉मुंबईत 31 रुग्णांची नोंद -*

*मुंबईत 15 मार्च रोजी 31 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 168 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण 11 लाख 55 हजार 632 रुग्णांची नोंद झाली आहे त्यापैकी 11 लाख 35 हजार 717 रुग्ण बरे झाले आहेत तर 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 11 मार्चला 25, 12 मार्चला 19, 15 मार्चला 36, 10 मार्चला 21, 9 मार्चला 18 तर 2 मार्चला 18 रुग्णांची नोंद झाली होती.*

*👉🅾️🅾️👉रुग्णालयातील बेड रिक्त -*

*कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये सध्या विविध रुग्णालयांत 4351 खाटा उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यापैकी 6 खाटांवर रुग्ण दाखल आहेत. सध्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची गरज भासत नाही. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास स्टँडबाय वर असलेली कोविड सेंटर सुरू करून तेथे रुग्णांवरती उपचार केले जातील अशी माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.*

*👉🟥🟥👉अशी घ्या काळजी -*

*संसर्गजन्य आजारात तोंडावाटे किंवा नाकातून बाहेर पडणार्‍या स्रावातून आजार पसरत असतात. त्यामुळे मास्क वापरणे, वारंवार हात धुळे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, सर्दी, खोकला आणि तापासारखी लक्षणे असल्यास इतरांपासून दूर रहावे. लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.*

निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात 10 पानी उत्तर,

सुनावणीत ट्विस्ट,*
शिंदे की ठाकरे कुणाची बाजू कमकुवत?

सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे.आज कपिल सिब्बल आपली राहिलेला युक्तिवाद कोर्टात मांडणार आहेत.*

राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात उत्तर सादर केलं आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांकडून सुप्रीम कोर्टात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ताशेर ओढण्यात आले होते. निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नावाबद्दल निकाल देताना दुजाभाव केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलेला. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेले. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात दहा पानी उत्तर सादर केलंय.*

*👉🔴🔴👉केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिन्ह देण्याचा निर्णय हा कायद्यानुसार योग्य असल्याचं म्हटलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत. आम्ही हा निर्णय संविधानाला अनुसरून घेतला आहे. आम्ही हा निर्णय नियमांनुसारच घेतला आहे, असं निवडणूक आयोगाने आपल्या दहा पानी उत्तरात म्हटलं आहे.*

*👉🟥🟥👉सरन्यायाधीशांची राज्यपालांच्या कृतीवर नाराजी*

*दरम्यान, सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणीवेळी शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. या सुनावणीवेळी राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावेळी बहुमत चाचणी घेण्यासाठी अधिवेशन बोलावण्याची मागणी करणं ही त्यावेळची परिस्थिती होती, असा युक्तिवाद त्यांनी केला. पण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी बहुमताची चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं, असं सरन्यायाधीश म्हणाले.*

*👉🟥🟥👉दुसरीकडे कोर्टाच्या अंतरिम आदेशामुळे आमच्यावर अन्याय झाला, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. आमदारांच्या सुरक्षेसंदर्भात राज्य सरकारने 26 तारखेलाच हमी दिली होती. मग राज्यपालांनी 28 तारखेला सुरक्षेसंबंधित का पत्र लिहिलं? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. 26 तारखेला एकनाथ शिंदे हेच गटनेते राहतील असं पत्र राज्यपालांना दिलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी 27 जूनला झाली, मग त्यांनी 26 तारखेला पत्र का दिलं? असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला.*

*👉🟣🟣👉“राज्यपालांचा संवाद हा गटनेत्यांशी असायला हवा. प्रतोद कोण याच्याशी राज्यपालांचं काही देणंघेणं नाही”, अशी टिप्पणी कपिल सिब्बल यांनी केली. “राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना विचारायला हवं होतं. अपात्रतेच्या नोटीसवर सात दिवसांची मुदत मागतात. मात्र नऊ महिने झाले तरी त्यांनी उत्तर दिलेलं नाही”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी आज केला.*

*👉🅾️🅾️👉“राज्यपालांनी 34 आमदारांना तेव्हाच निवडणूक आयोगात पाठवायला हवं होतं. खरी शिवसेना कोण यावर राज्यपालांनी सांगणं गरजेचं होतं”, असं कपिल सिब्बल म्हणाले. त्यावर कोर्टाने आयोगाचा निर्णय येईपर्यंत मग सरकार कसं चाललं असतं? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सिब्बल यांनी 34 जण आयोगाकडे गेले असते तर आपोआप अपात्र झाले असते.*

संपकऱ्यांचे वेतन कापणार,तर शिस्तभंगाची कारवाई होणार; जळगावात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आदेश

जळगाव:-संपामध्ये सहभागी होणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासह त्यांचे संपकाळातील वेतन कापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी या संदर्भातील आदेश मनपा आयुक्त, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, प्रांत, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांना पाठवले आहेत.*

*👉🛑🛑👉शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश त्वरित बजावण्यात यावेत, संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यास कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्यावी, अशी सूचना आहे.*

*👉🔴🔴👉काम नाही, वेतन नाही*

*शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे काम नाही, वेतन नाही हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याने कर्मचाऱ्यांना कळविण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे.*

*👉🅾️🅾️👉पोलिस तयारीत, बंदोबस्त पुरविणार*

*आम्ही विभागप्रमुखांना सांगितले आहे, की बंदोबस्त लागला तर कळवा. मात्र अद्याप अशी मागणी पोलिसांकडे आलेली नाही. तालुकास्तरावर आम्ही तयारीत आहोत. बंदोबस्त मागितला तर त्यानुसार व्यवस्था केली जाईल.*
*➖एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक, जळगाव*

इंदापूर न्यायालयात जमीन मोजणीविषयी मार्गदर्शन

img 20230311 wa0032

इंदापूर वकील संघटनेच्या वतीने
पुणे जिल्हा बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांचे मोजणी आणि त्या संदर्भातील सर्व परिपत्रके याविषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी एडवोकेट पांडुरंग थोरवे यांनी सम्राट अशोक यांच्या कालखंडापासून ते आजच्या आजच्या 2023 पर्यंतच्या तंत्रज्ञान युगातील मोजणीबाबत तसेच अलीकडच्या काळातील ड्रोन व जीपीएस तंत्रज्ञान मार्फत होणाऱ्या मोजणी, सॅटॅलाइट मोजणी त्या संदर्भातील नवीन नियम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास इंदापूर न्यायालयाचे न्यायाधीश पी.एल. पाटील, न्यायाधीश के.सी. कलाल, न्यायाधीश श्रीमती एस.डी. वडगांवकर, श्रीमती एस.एस. साळुंखे, न्यायाधीश श्रीमती जे.बी. खटावकर यांसह सरकारी वकील गौरी कस्तुरे, वरिष्ठ महिला वकील श्रीमती खबाले, इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. मनोहर चौधरी व सचिव ऍड. आशुतोष भोसले व इंदापूर बारचे वकील तसेच जिल्हा परिषद संघटनेचे वकील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!