Home Blog Page 184

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज इंदापूर येथे जाहीर सभा – दीपक काटे

संपादकीय

बारामती लोकसभा मतदार संघात विजय प्राप्त करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून बारामती मिशन चा नारा देण्यात आला आहे. या अनुशंगाने रविवारी (दि.26) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बारामती लोकसभा मतदार संघात बारामतीसह इंदापूर तालुक्यात बावन्न शाखांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक काटे व भाजपाचे इंदापूर तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या बावन्न शाखांमध्ये युवा मोर्चा व युवा वॉरियर्स च्या शाखांचा समावेश आहे. या उद्घाटन कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेसह विधान परिषदेचे आ. गोपीचंद पडळकर, आ. राम शिंदे, बाळा भेगडे, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळकर, राहुल लोणीकर, योगेश टिळेकर, नरेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे या प्रमुख मान्यवर नेत्यांसह, स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.

शाखा उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यात इंदापूर तालुक्यातील युवा मोर्चा व युवा वॉरियर्स च्या शाखांचे ओपनिंग करण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात बारामती व कर्जत जामखेड येथील शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

तसेच सायंकाळी पाच वाजता इंदापूर नगरपरिषद मैदानावर जाहिर सभेचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार यांनी दिली.

बारामती मतदारसंघात भाजपचे बावनकुळे करणार बावन्न शाखांचे उद्घाटन

बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व ज्यांच्या नावाभोवती अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण चालते ते राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपाने कंबर कसली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीचा हा गड भाजप जिंकणारच यासाठी भाजपा प्रदेश स्तरावरील व तालुकास्तरावरील नेते मंडळी तयारीनिशी राजकीय मैदानात उतरले असल्याचे चित्र दिसत आहे.

दिनांक २४ मार्च रोजी भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दीपक अण्णा काटे व भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार व शहराध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते येत्या २६ मार्च रोजी बारामती लोकसभा मतदारसंघात ५२ शाखांचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले.

बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर, बारामती तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्च्याच्या शाखांचे उदघाटन व जाहीर सभा असा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, आ. राम शिंदे,बाळा भेगडे,विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, राहुल लोणीकर, योगेश टिळेकर, हर्षवर्धन पाटील, नरेंद्र पाटील, गणेश भेगडे, या प्रमुख मान्यवरनेत्यांसाह स्थानिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत. शाखा उदघाटणाचा पहिल्या टप्यात इंदापूर तालुक्यातील युवा मोर्चा व युवा वॉरियर्स च्या शाखांचे ओपनिंग करण्यात येणार असून…. दुसऱ्या टप्यात बारामती व कर्जत जामखेड येथील शाखांचे ही उदघाटन करण्यात येणार आहे. अशी माहिती युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक आण्णा काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. २६ मार्च रोजी बावनकुळे यांचे सायंकाळी पाच वाजता इंदापूर येथे आगमन होईल व तेथून त्यांच्या हस्ते इंदापूर शहरातील २ शाखांचे प्रतिनिधीक स्वरूपात उदघाटन होईल व त्यानंतर इंदापूर नगरपरिषदेसमोरील मैदानावर जाहीर सभा होणारं असल्याची माहिती ऍड. शरद जामदार व पदाधिकाऱ्यांनी दिली….

जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

पुणे, दि. २१ : शासनाचे महत्त्वाकांक्षी असे ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामात शासकीय यंत्रणेने लोकसहभागाला प्राधान्य देण्याबरोबरच अशासकीय तसेच खासगी संस्थांचाही योग्य सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत गाव निवडीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे यांच्या समवेत जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समितीतील सदस्य उपस्थित होते. सर्व उप विभागीय अधिकारी तसेच गटविकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, गाव आराखडा शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे तयार करावा. अभियानांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी करून पाणलोटनिहाय गावाचा आराखडा तयार करावा. हे अभियान जिल्ह्यात मोहीम स्तरावर राबवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

*अभियानासाठी निवडलेली १८७ गावे:*
*हवेली तालुका (१७ गावे):* जांभळी, खेड, कोलवाडी, रामोशीवाडी, मांजरी खु., मांडवी बु., माणेखडी, मोगरवाडी, मोकरवाडी, शिवापूर, वांजळेवाडी, आर्वी तानाजीनगर, आगळंबे, कल्याण, खामगांव मावळ, घेरासिंहगड, खडेवाडी.
*शिरूर तालुका (१७ गावे):* चौधरवाडी (केंदूर), झगडेवाडी, महादेववाडी, माळवाडी आगरकरवाडी, पऱ्हाडवाडी, सुक्रेवाडी, मुखई, जातेगांव बु., पाबळ, खैरेनगर, धामारी, कान्हुर मेसाई, मिडगुलवाडी, शिक्रापूर, विठ्ठलवाडी, सविंदणे, थोरातवाडी (मलठण)
*खेड तालुका (२० गावे):* गोलेगांव, कासारी, कोहिंडे खु., परसूल, वाळद, वेव्हावळे, वाघू, येनिये खु., भोसे, वाफगांव, जऊळके बु., चिंचबाईवाडी, वरूडे, गाडकवाडी, कन्हेरसर, पूर, गोसासी, गुळाणी, वाकळवाडी, चौधरवाडी.
*मावळ तालुका (१३ गावे):* बेलज, नाणे, नानोली ना.मा, कुसगांव प.मा, जांभुळ, बेडसे, शिवाली, ओझर्डे, शिळींब, साते, इंगळुन, पिंपरी, डाहुली
*जुन्नर तालुका (१२ गावे):* बुचकेवाडी, धोलवड, डिंगोरे, डुंबरवाडी, घंगाळदरे, कुसुर, मालवाडी, नेतवाडी, उंब्रज, शिंदे, शिवली, धालेवाडी तर्फे मिन्हेर
*आंबेगाव तालुका (१३ गावे):* आपटी, कळंबई, कोंढवळ, गाडेवाडी, तेरुंगण, नानवडे, निमडाळे, मेघोली, मेनुंबरवाडी, वरसावणे, गिरवली, माळीण, काठापूर बुद्रुक
*पुरंदर तालुका (१४ गावे):* जाधववाडी, काळेवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पठारवाडी, पवारवाडी, कोडीत ख., राजेवाडी, बांदलवाडी, चिवेवाडी, मिसाळवाडी, नाझरे कडेपठार, ढालेवाडी, सासवड
*वेल्हा तालुका (४ गावे):* अंत्रोली, पाबे, कोदवडी, सोंडे सरफल
*मुळशी तालुका (६ गावे):* कातवडी, मुगावडे, निवे, आंबेगाव, सालतर, चाले
*भोर तालुका (६ गावे):* म्हसर खु., भावेखल अंगसुले, कुरंगवाडी, नायगांव, गोरड म्हसवली, तळे म्हसवली
*बारामती तालुका (३९ गावे):* गुनवडी, मळद, कन्हेरी, डोर्लेवाडी, पिंपळी, ढेकळेवाडी, झारगडवाडी, कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, काटेवाडी, माळेगांव खु., खांडज, निरावागज, मुर्टी, मासाळवाडी, मुढाळे, वढाणे, कुतवळवाडी, आंबी खु., भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी, देऊळगांवरसाळ, नारोळी, कोळोली, दंडवाडी, सुपे, लोणीभापकर, काऱ्हाटी, माळवाडी, आंबी बु., पळशी, मोरगाव, तरडोली, अंजनगाव, सोनवडी सुपे
*इंदापूर तालुका (११ गावे):* पिटकेश्वर, निमगांव केतकी, गोतंडी, कळस, शिंदेवाडी, काझड, बोरी, शेळगांव, भरणेवाडी, कडबनवाडी, अंथुर्णे
*दौंड तालुका (१५ गावे):* ताम्हणवाडी, खुटबाव, नानगाव, पारगांव, पडवी, भांडगाव, डाळिंब, जिरेगाव, हिंगणीगाडा, वासुंदे, रोटी, कोठडी, मळद, नंदादेवी, बोरीऐदी

महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नववर्ष प्रारंभ, गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई, दि. 21 : – आपला महाराष्ट्र प्रगतीशील आहे. नवनव्या संधीना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि आणखी डौलाने उभारूया,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवे वर्ष आरोग्यदायी ठरावे. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी मनोकामनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्याच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चैतन्याचे पर्व घेऊन येते. या निमित्ताने आपण ऋतुचक्रातील बदलाचा आनंददायी उत्सव साजरा करतो. अशा या नववर्षाच्या उत्साही क्षणांतून आपल्याला नवनिर्मितीची प्रेरणा मिळते. ही प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा यासाठी प्रयत्न करूया.

नववर्षाचे स्वागत करताना आपण पर्यावरणाचे भान देखील बाळगूया. आपल्या परिसरात स्वच्छता राखूया. पाणी, हवा यांचं प्रदूषण रोखण्याची जागरुकता निर्माण व्हावी, असे प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मनामनांत नवसंकल्पनांची पालवी फुलावी, हीच सदिच्छा. महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी उंच उभारूया, तिची पताका जगाच्या क्षितीजावर अभिमानाने आणि डौलाने फडकत रहावी, असा निर्धार करूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी बारामती उपविभागात ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

पुणे दि. २२- केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी बारामती कृषी उपविभागात दौंड आणि इंदापूर तालुक्यात ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करून नवीन उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता करून त्याआधारे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. निरनिराळ्या एकात्मिक शेती पद्धतींचा अवलंब करून दुष्काळ, पूर व हवामानातील अनपेक्षित बदलामुळे होणारे नुकसान टाळणे, अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादन वाढविणे व शाश्वत रोजगार उपलब्ध करणे, कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनातील जोखीम कमी करून शेतकऱ्यांचा कोरडवाहू शेतीबाबत आत्मविश्वास वाढविणे हे योजनेचे प्रमुख उद्देश आहेत.

या योजनेअंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचे निधी वितरणाचे प्रमाण ६०:४० असे आहे. फळपीक आधारीत शेती पद्धतीस २५ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील. दुग्धोत्पादक पशुधन आधारीत शेती पद्धतीस प्रति हेक्टर ४० हजार रुपये, इतर पशुधन आधारीत शेती पद्धतीस प्रति हेक्टर २५ हजार रुपये, ग्रीन हाउस ट्यु ब्युलर टाइप नैसर्गिक वायुवीजनास प्रति चौ.मी. ला ४६८ रूपये, शेडनेट हाउससाठी प्रति चौ.मी. ला ३५५ रूपये याप्रमाणे अनुदान देण्यात येते.

मूरघास युनिट साठी १ लाख २५ हजार रुपये प्रति युनिट, मधुमक्षिका पालनासाठी प्रति कॉलनीस २ हजार रुपये, काढणी पश्चात तंत्रज्ञानासन प्रति चौ.मी. साठी ४ हजार रुपये, गांडूळ खत युनिट (कायमस्वरूपी) ५० हजार रुपये प्रति युनिट आणि हिरवळीचे खत प्रति हेक्टर २ हजार रुपये अनुदान देय राहील.

कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी दौंड तालुक्यातील पिंपळाचीवाडी-खोर येथे पशुपालनच्या १३ घटकासाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये २ लाख ६० हजार, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ५० घटकांसाठी १० लाख, गांडूळखताच्या १ युनिटसाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये ५० हजार, मुरघासच्या ४ युनिटसाठी सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ५ लाख रुपयांचे असे सर्व मिळून १८ लाख १० हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

इंदापूर तालुक्यातील वायसेवाडी – कळस येथे पशुपालनच्या २० घटकांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये ४ लाख, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ३२ घटकांसाठी ६ लाख ४० हजार, गांडूळखत युनिटच्या २ घटकांसाठी सर्वसाधारण प्रवर्गामध्ये १ लाख रुपये, मुरघास युनिटच्या २ घटकांसाठी २ लाख ५० हजार, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये ३ घटकांसाठी ३ लाख ७५ हजार रुपयांचे असे एकूण १७ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आणि कोरडवाहू क्षेत्रातील इच्छूक घटकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री.तांबे यांनी केले आहे.
***

error: Content is protected !!