Home Blog Page 183

रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई , दि.३१ : वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जगंम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात.

यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनास करण्यात येत होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०२३-२४ च्या वार्षिक दर विवरणपत्र दरात कोणताही बदल न करता ते मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवल्यामुळे मालमत्ता खरेदी व विक्री करणाऱ्या दोघांनाही फायदा होतो. सामान्य नागरिकांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच बांधकाम व्यावसायिक, घरकुल विकासक, रिअल इस्टेटमध्ये काम करणारे मध्यस्थ, वकिल व सल्लागार आणि स्थावर मालमत्ता धारकांच्या व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन खरेदी-विक्रीस चालना मिळते. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या बाबी विचारात घेऊन शासनाने सन 2023-24 च्या रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद

मुंबई, दि. 31 : राज्यातील अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या निधीत दरवर्षी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मागील चार आर्थिक वर्षांमध्ये सन 2019-20 या वर्षी 9 हजार 208 कोटी, 2020-21 या वर्षी 9 हजार 668 कोटी, 2021-22 या वर्षी 10 हजार 635 कोटी, 2022-23 या वर्षी 12 हजार 230 आणि २०२३ – २४ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ८२० कोटी रूपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मागासवर्गाच्या निधीत कपात करण्यात आली नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

अर्थसंकल्पीय अंदाज हे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केले जाते. वर्षभरात गरजेनुसार त्यामध्ये बदल अपरिहार्य ठरतो. विविध योजनांमधील अखर्चित निधी इतर योजनांसाठी पुनर्विनियोजित करुन उपलब्ध करुन दिला जातो. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पात योजनांच्या तरतुदींमध्ये घट करण्यात आली असल्याचे म्हणता येणार नाही, असेही सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट केले आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन तीन आर्थिक वर्षांमध्ये योजनांकरिता निधी उपलब्धतेसाठी मर्यादा होत्या. चालू आर्थिक वर्षात केंद्र पुरस्कृत योजनांसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होत आहे. ज्याचा राज्याच्या अनुसूचित जातीच्या लाभार्थीना जास्तीत जास्त लाभ मिळणार आहे.अनुसूचित जाती घटक योजनेअंतर्गत इतर विभागाच्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी राज्य हिश्श्यापोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे इतर विभागांच्या योजनांसाठीची तरतूद 2 हजार 13 कोटी रूपयांवरून 2 हजार 706 कोटी रूपये इतकी भरीव स्वरुपात वाढली आहे.यामुळे 60 टक्केच्या प्रमाणात साधारणपणे 4 हजार कोटी रूपये एवढा निधी केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

सभी भारतवासीयो को राम नवमी की शुभकामनाये रामवर्मा आसबे

सभी भारतवासीयो को राम नवमी की शुभकामनाये

रामवर्मा आसबे

गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

मुंबई दि २९: भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती.
सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव

img 20230328 wa0005

पुणे, दि. २७: पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन-२०२० व विशेष सेवा पदक सन-२०२० विजेत्यांना पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे येथे पदक देवून गौरविण्यात आले.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर, पोलिस अधीक्षक पोलिस संशोधन केंद्र ज्योती क्षीरसागर उपस्थित होते.

सन्मानचिन्ह पदक तसेच विशेष सेवा पदक विजेत्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देवून संजय कुमार म्हणाले, पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांनी केलेल्या गुणवत्तापूर्वक सेवेबाबत शासनाने दखल घेऊन त्यांना गौरविले आहे. त्यांनी यापुढेही अशीच चांगली सेवा बजावावी.

पोलीसांनी आनंदात आणि तणाव मुक्त राहून आपले कर्तव्य करणे आवश्यक आहे. पोलीस विभागाने आपल्याला खूप काही दिले आहे. विभागासाठी काम करतांना आपण काय देतो हे खूप महत्त्वाचे आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावताना चांगले कार्य करून आपल्या विभागाचे नाव नेहमीच उंचावावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार आणि अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी २८ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह -२०२०(पदक) आणि १५ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल विशेष सेवा पदक -२०२२ ने गौरविण्यात आले.
०००

ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफ.एम. माध्यमातून इंदापूर तालुक्यात शिक्षणाचे नवे दालन सुरू झाले- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

img 20230326 wa0007

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात ‘ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफएम’ या समुदाय आकाशवाणी केंद्राचे उद्घाटन रविवार दि. 26 मार्च रोजी राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेचे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी विश्वनाथ काळे, आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे अधिष्ठाता प्रा. डॉ. भालचंद्र बाबुराव वायकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करून ग्रामीण भागातील विविध क्षेत्रांशी संबंधित योग्य माहिती , ज्ञान, शिक्षण प्रसारित करण्यासाठी ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफ.एम. शिक्षणाचे नवे दालन आहे.
कुलगुरू डॉ. कारभारी विश्वनाथ काळे म्हणाले की,’ रेडिओ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून समाज विकासासाठी आवश्यक माहितीवर आधार अभ्यासक्रम तयार करणे काळाची गरज आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विज्ञान , तंत्रज्ञान व कला यावर आधारित कौशल्य तरुण पिढीमध्ये रुजावे यासाठी उपयोगी आहे . वेगवेगळे कौशल्य विकसित करून त्याचा उपयोग उत्पादन प्रक्रियेत होण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील आलेले बदल हे समाजविकासाठी व देश विकासासाठी महत्त्वाचे आहे.
डॉ. भालचंद्र वायकर म्हणाले की,’ तंत्रज्ञान व विज्ञान समाजातील समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त असावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण क्षेत्रातील प्रयोग , संशोधन हे प्रयोगशाळेत पुरते मर्यादित न ठेवता ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचावे अशी व्यवस्था केली आहे. संशोधन हे नेहमी समाज उपयोगी ठरावे .शिक्षणावर केलेला खर्च हा गुंतवणूक मानला पाहिजे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच पाहुण्यांची त्यांनी ओळख करून दिली.
रेडिओ जॉकी रोहिणी कुचेकर यांनी ज्ञानवर्धिनी रेडिओ केंद्रात मान्यवरांची मुलाखत घेतली.
यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके , खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, संचालक विलासराव वाघमोडे , गणपत भोंग, पराग जाधव तसेच राजेंद्र पवार उपस्थित होते.
ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफएम केंद्राचे समन्वयक डॉ. संदिप शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार मानले.

error: Content is protected !!