Home Blog Page 148

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त २६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना 1500 कोटींची मदत वितरित होणार

मुंबई, दि. २१ : गेल्या वर्षी सन २०२२ मधील पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुमारे 15 लाख ५७ हजार ९७१ हेक्टर बाधित क्षेत्रातील २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय १३ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, हा निधी वितरित करण्यात येणार आहे.

शेतपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त प्रस्तावांबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार हा निधी वितरित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल.

अहमदनगर जिल्ह्यातील २,९२,७५१ शेतकऱ्यांना सुमारे २४१ कोटी, अकोला जिल्ह्यातील १,३३,६५६ शेतकऱ्यांना ८६ कोटी ७२ लाख, अमरावती जिल्ह्यातील २,०३,१२१ शेतकऱ्यांना १२९ कोटी ५७ लाख, औरंगाबाद येथील ४,०१,४४६ शेतकऱ्यांना २२६ कोटी ९८ लाख, बीड जिल्ह्यातील ४,३७,६८८ शेतकऱ्यांना १९५ कोटी ३ लाख, बुलढाणा जिल्ह्यातील २,३८,३२३ शेतकऱ्यांना ११४ कोटी ९० लाख, जळगाव जिल्ह्यातील ६२,८५९ शेतकऱ्यांना ४५ कोटी १४ लाख, जालना जिल्ह्यातील २,१४,७९३ शेतकऱ्यांना १३४ कोटी २२ लाख, नागपूर जिल्ह्यातील ६ हजार १६१ शेतकऱ्यांना ६ कोटी २३ लाख, नाशिक जिल्ह्यातील १,१२,७४३ शेतकऱ्यांना २५ कोटी ८३ लाख, उस्मानाबाद येथील २,१६,०१३ शेतकऱ्यांना १३७ कोटी ७ लाख, परभणी जिल्ह्यातील १,८८,५१३ शेतकऱ्यांना ७० कोटी ३७ लाख, सोलापूर जिल्ह्यातील ४९,१६८ शेतकऱ्यांना ४६ कोटी ८९ लाख, वाशिम जिल्ह्यातील ६३ हजार ७१६ शेतकऱ्यांना ३९ कोटी ९८ लाख रूपये वितरित करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय २० जून २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

खरीप हंगामातील पीक नियोजन शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी कृषि आयुक्त सुनील चव्हाण

img 20230621 wa0048
img 20230621 wa0048

पुणे, दि. २१ : यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना विशेष दक्षता घ्यावी तसेच पेरणी संदर्भात नियोजन करावे. साधारणत: ८० ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

आपत्कालीन पीक परिस्थितीत शेतकऱी बांधवांनी कशा प्रकारची काळजी घ्यावी यासंदर्भात कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. याबैठकीत कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव, सर्व कृषि विद्यापिठांचे कुलगुरु त्याचप्रमाणे भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. हौसळीकर आदी उपस्थित होते.

हवामान बदलानुसार सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. त्यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (न्यू नॉर्मल मान्सून पिरीयड) हा २४ ते २५ जून असेल असा अंदाज वेधशाळेने सांगितला आहे. या हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४-२५ जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वत्र चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक नियोजनासंदर्भात योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.

*योग्य पीक नियोजन*
या नवीन सामान्य पाऊस कालावधीचा विचार करता शेतकऱ्यांनी पेरणी करताना लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. पाऊस उशीरा आल्यामुळे शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करु नये. पेरणीसाठी साधारणपणे २० टक्के जादा बियाणांचा वापर करावा. सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.

त्याप्रमाणे जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन सारख्या तंत्राचा वापर करावा. हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल. कृषि विद्यापीठ, कृषि विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने स्थानिक आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येणार आहे. क्षेत्रीय यंत्रणांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना कृषि विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

राज्यात मान्सूनचा अंदाज घेऊन पेरणीच्यावेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषि विभागाकडून घेण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषि निविष्ठांचा साठा उपलब्ध होईल यासाठी क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून १८००-२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असेही कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.

ई-टेंडर आणि जेम पोर्टल विषयी प्रशिक्षण सत्राचे आयोजन

पुणे, दि. २१: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत ई-टेंडर आणि जेम पोर्टल विषयी प्रशिक्षण सत्राचे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कृषी महाविद्यालय परिसर, म्हसोबा गेटजवळ, गणेश खिंड मार्ग, शिवाजीनगर, पुणे येथे उद्या सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ई-टेंडर भरणे, ई टेंडर पाहणे, बीओक्यू प्रक्रिया, ई टेंडर डाऊनलोड करणे, टेंडर संकेतस्थळावर नोंदणी करणे, आवश्यक सॉफ्टवेअर, डिजिटल स्वाक्षरी, टेंडर प्रक्रिया, बिडींग प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे, आयात निर्यात परवाना, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र नोंदणी, उद्यम नोंदणी, दुकान कायदा परवाना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार योजना, आयकर, वस्तु व सेवा कर, टी.डी.एस, जेम पोर्टल बिडिंग जेम पोर्टलवर उत्पादनाची नोंदणी याबाबत तांत्रिक आणि उद्योजकता विषय बाबत तज्ज्ञ व अधिकारी यांच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे.

ई-टेंडर आणि जेम पोर्टल तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम यशस्वीरीत्य पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागीय कार्यालय पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

इच्छुक उद्योजकांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कृषी महाविद्यालय परिसर, म्हसोबा गेटजवळ, गणेश खिंड मार्ग, शिवाजीनगर, पुणे तसेच कार्यक्रम संघटक विकास शिंदे (९८३४३२१७०४) यांच्याशी संपर्क साधावा, असेही केद्रांचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार यांनी कळविले आहे.

Press Information Bureau Government of India शिक्षण मंत्रालय

PIB Delhi

English

Press Information Bureau
Government of India

 

शिक्षण मंत्रालय

भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित, जी-20 शिक्षण कार्यगटाच्या पुण्यातील चौथ्या बैठकीची आज सांगता

बैठकीचा निष्कर्ष आराखडा विकसित करण्यासाठी भारतीय अध्यक्षपदावरून होत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची सर्व सहभागी देशांच्या प्रतिनिधींनी केली प्रशंसा

जी-20 शिक्षण मंत्र्यांची बैठक उद्या पुण्यात होणार

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने, जी-20 शिक्षण कार्य गटाच्या (EdWG) चौथ्या आणि अंतिम बैठकीचे पुण्यात यशस्वी आयोजन केले होते, या बैठकीची आज सांगता झाली. जी-20 सदस्य देशांचे सुमारे 80 प्रतिनिधी, आमंत्रित देश आणि शिक्षण कार्यगटाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, या बैठकीला उपस्थित होते.

दोन दिवसीय बैठकीचे अध्यक्षस्थान भारतीय अध्यक्ष आणि उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव, संजय कुमार यांनी भूषवले. तर, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी पर्यायी अध्यक्ष म्हणून होते. पहिल्या दिवशी भारत सरकारच्या G- 20 अध्यक्षांचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन शृंगला हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

 

या बैठकीचा निष्कर्ष आराखडा विकसित करण्यासाठी, सर्व जी-20 प्रतिनिधींनी संपूर्ण प्रक्रियेत दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल के संजय मूर्ती यांनी आभार व्यक्त केले. त्यांच्या ह्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करत, उद्या म्हणजेच 22 जून 2023 रोजी होणाऱ्या मंत्रिस्तरीय बैठकीत, सर्व सदस्य मंत्री हा निष्कर्ष आराखडा औपचारिक रित्या स्वीकारतील. ज्यातून, शिक्षण कार्यगट ट्रॅकमहडे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या व्यापक चर्चा आणि विचारमंथन यातून रचलेल्या पायावर एक ठोस कळस चढवला जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

शिक्षण कार्यगटाच्या ह्या चौथ्या बैठकीदरम्यान, G20 प्रतिनिधींनी अहवाल आणि संकलन विकसित करण्याच्या दिशेने भारतीय G-20 अध्यक्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची प्रशंसा केली. हा निष्कर्ष आराखडा आंतरराष्ट्रीय समुदायासाठी मार्गदर्शक ठरेल, सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक आणि उच्च-गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी यातून एक निश्चित आणि योग्य दिशा मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

शैक्षणिक कार्यगट भारतीय जी 20 अध्यक्षतेच्या “वसुधैव कुटुंबकम” किंवा “एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य” या संकल्पनेशी संरेखित आहे, या कार्यगटाच्याअ मागील 4 बैठकांमध्ये , आजच्या विविध जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक उपाय आणि सामूहिक कृती शोधण्यात आल्या. मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुनिश्चित करणे, विशेषत: मिश्र शिक्षणाच्या संदर्भात; तंत्रज्ञान-आधारित शिक्षण अधिक समावेशक, गुणात्मक आणि सहयोगी बनवणे; भविष्यातील कामाचे स्वरूप लक्षात घेता क्षमता बांधणी करणे आणि आजीवन शिक्षणाला चालना देणे; आणि वाढीव सहयोग आणि भागीदारीद्वारे संशोधनाला बळ देणे आणि नवोन्मेषाचा विस्तार यासह 4 प्राधान्य क्षेत्रांवर भर यात देण्यात आला आहे.

 

4थ्या शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीच्या आधी ‘विशेषत: मिश्र शिक्षणाच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुनिश्चित करणे’ (एफएलएन ) या विषयावर परिसंवाद झाला.सहभागींमध्ये सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्थंमधील मधील अनेक वक्ते सहभागी झाले होते यावेळी त्यांनी शिकण्याचे दृष्टिकोन आणि अध्यापनशास्त्र, शिक्षकांची भूमिका, क्षमता बांधणी करणे आणि बहुभाषिकतेच्या संदर्भात शिक्षकांचे प्रशिक्षण या एफएलएनशी संबंधित विषयांवर चर्चा केली.

याव्यतिरिक्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 17 ते 22 जून 2023 या कालावधीत मल्टीमीडिया प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 40,000 हून अधिक उपस्थित आणि 80+ प्रदर्शकांसह, हे प्रदर्शन एफएलएन संबंधित उपक्रम प्रदर्शित करण्याची संधी प्रदान करते.प्रदर्शनात सहभागी 28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील उल्लेखनीय सहभागींमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, भारतीय ज्ञान प्रणाली (इंडियन नॉलेज सिस्टम), मायक्रोसॉफ्ट, निपुण भारत उपक्रम, इंडोनेशिया, युनिसेफ, युनेस्को आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण लाखो वारकऱ्यांना दिलासा

मुंबई दिनांक २१: पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे

नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे-उपमुख्यमंत्री

img 20230621 wa0042
पुणे दि.२१: कृत्रिम बुद्धीमत्तेने शिक्षणासह सर्व क्षेत्रात मोठी क्रांती केल्यामुळे होणाऱ्या बदलांना लक्षात घेऊन त्यासाठीचे मनुष्यबळ शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करावे लागेल. ‘लर्न, अनलर्न, रिलर्न’ अशी त्रिसूत्री स्वीकारल्याशिवाय भविष्यातील आव्हानांचा सामना करता येणार नाही. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उन्नत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी खासदार अमर साबळे, अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, जोत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शिक्षणाच्या क्षेत्रात येत्या काळात झपाट्याने बदल होणार आहेत. २१ व्या शतकात नव्या पिढीसमोर कालसुसंगत राहण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने सातत्याने नव्या आव्हानांचा अभ्यास करून त्यानुसार शिक्षणाच्या क्षेत्रात कालानुरूप बदल करावे लागतील, अन्यथा शिक्षण पद्धत कालबाह्य व निरुपयोगी ठरेल.

*नव्या शैक्षणिक धोरणात भविष्याचा विचार*
भविष्यातील आव्हाने ओळखूनच देशात नवीन शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. ते विस्तार, सर्वसमावेशक आणि उत्तमता या त्रिसुत्रीवर आधारीत असून त्यासोबत रोजगारक्षमता हा मुद्दा त्यात समाविष्ट आहे. इच्छा असणाऱ्याला शिक्षण देण्यासाठी विस्तार महत्वाचा आहे. उच्च शिक्षण घेण्याच्या वयातले २३ टक्के शिक्षण घेतात, हे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत घेवून जायचे आहेत. विद्यार्थी दुप्पट करताना मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उभारून संपूर्ण व्यवस्था तयार करावी लागेल. हे मोठे आव्हान आहे.

*प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी दीपस्तंभासारखे काम करणारी संस्था*
ज्ञान असणाऱ्याला शिक्षण मिळणे तेवढेच गरजेचे आहे. रोजगाराचे प्रश्न समोर उभे असताना शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगारक्षमता महत्वाची आहे. हे करण्यासाठी महाविद्यालयांचे ॲक्रीडीटेशन आणि अभ्यासक्रमासाठी स्वायत्तता यात समन्वय साधून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणता येईल. विद्यापीठांनी महाविद्यालयातील शिक्षणातील उत्तमतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. नव्या काळातील शैक्षणिक गरजा लक्षात घेणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने शिक्षणाच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवला आहे. नव्या काळातील प्रवाह लक्षात घेऊन पुढे जाणारी ही संस्था देशाच्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये दीपस्तंभासारखे काम करणारी संस्था आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी काढले.

*खाजगी विद्यापीठांना अभ्यासक्रमाबाबत स्वायत्तता-चंद्रकांतदादा पाटील*
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रोग्रेसिव्ह संस्थेने नेहमीच उत्तमतेवर भर दिला आहे. मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्याचा वेध आणि भूतकाळाबाबत गौरवाची भावना अशा दोन्ही बाबींचा समावेश आहे. राज्यात १ हजार ५०० महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.

ते पुढे म्हणाले, भविष्याचा वेध घेवून कौशल्य विकास, मातृभाषेतून शिक्षण, आपल्या थोर परंपरेची जाणीव आणि मूल्यशिक्षण अशा चार पैलूंचा समावेश नव्या शैक्षणिक धोरणात आहे. खाजगी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना नवे अभ्यासक्रम सुरू करण्यातील अडथळे लवकरच दूर करण्यात येतील. खासगी विद्यापीठात १० टक्के गरीब विद्यार्थ्यांचे शुल्कही माफ केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार शिरोळे म्हणाले, मॉडर्न महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसोबत सामाजिक जाणिवेने काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात संवेदनशिलतेने काम करणारे प्राध्यापक असल्याने राष्ट्रनिर्माणाचे कार्य या माध्यमातून घडत आहे.

यावेळी डॉ.एकबोटे यांनी विचार व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रात नाविन्याकडे कल वाढत असताना त्यासाठी आवश्यक सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. मूल्यशिक्षणासोबत अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जात असल्याने विविध क्षेत्रात मॉडर्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्रीमती एकबोटे यांनी नूतन इमारतीविषयी माहिती दिली.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ.गजानन एकबोटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे सदस्य, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मतदार याद्या बारकाईने अद्ययावत करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

img 20230621 wa0036
पुणे, दि.२१ : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व अधिकाऱ्यांनी मतदार याद्या बारकाईने लक्ष देऊन अद्ययावत कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले, यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. प्रशिक्षणाला उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर उपस्थित होत्या.

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदार संघ असून त्यापैकी ११ शहरी व १० ग्रामीण मतदार संघ आहेत. याद्या अद्ययावत करताना अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. याद्या अद्ययावत करताना ८० वर्षावरील मतदारांचे सर्वेक्षण करावे, पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सध्या आधुनिक सॉफ्टवेअर येत आहेत. त्याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी माहिती करुन घ्यावी. मतदार नोंदणीसाठी शाळा, महाविद्यालये, स्थानिक संस्था याठिकाणी व्यवस्था करावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

यावेळी ‘गरुडा’ ॲपबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला जिल्ह्यातील २१ मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी चेतना इंटरनॅशनल स्कूल& चेतना कॉलेज ऑफ फार्मसी

 

img 20230820 wa0043
समाज परिवर्तन घडविण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने श्री उदय सदाशिव देशपांडे , श्री विलास नामदेव भोसले, श्री सोमनाथ पांडुरंग माने व श्री बाळू गणपत बोराटे या चौघांनी मिळून चेतना फाउंडेशन ची स्थापना 2019 साली सुरू केली. सरडेवाडी या परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या हेतूने १ जून २०२३ रोजी चेतना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ची स्थापना करण्यात आली या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्ले ग्रुप ते ४ थी, ५ वी ते १० वी सेमी इंग्रजी वर्ग, ११ वी व १२ वी विज्ञान , वाणिज्य , कला महाविद्यालयाची स्थापना केली . तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची सोय व्हावी म्हणून चेतना इंटरनॅशनल स्कूल ची स्थापना करण्यात आली आहे .

ग्रामीण भागातील पालकांचे दूरवर मुलींना शिक्षणासाठी पाठवण्याची मानसिक तयारी नसते त्यामुळे मुलींचे पुढील शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्यासाठी चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चालू करण्यात आले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची सोय ग्रामीण भागात होईल .
आमच्याकडे येणारा विद्यार्थी हा आमचा आत्मा आहे हे लक्षात घेऊन त्याची बौद्धिक , शारीरिक असा असे सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवणारे अभ्यास विषय तज्ञ प्राध्यापक वर्गांची फळी सज्ज आहे त्यांच्याच अनुभवी मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात आमचे विद्यार्थी गरुड झेप घेतील
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ यांच्या आयोजन केले जाणार आहे

अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
१)दहावीचे गुणपत्रकाची झेरॉक्स
२)शाळा सोडल्याचा मूळ दाखला
३)आधार कार्ड
४)पासपोर्ट साईचे दोन फोटो
अकरावी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी
खालील विषयाची सोय
१) मराठी, इंग्रजी , फिजिक्स , केमिस्ट्री , बायोलॉजी , भूगोल .( B – Group)
२)मराठी, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, भूगोल.(A- Group)
३)मराठी, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स( AB-Group)
शिस्त
१)महाविद्यालयाच्या आवारात धूम्रपानास सक्त मनाई आहे
२)महाविद्यालयामध्ये मोबाईल वापरण्यास पूर्ण बंदी आहे
३)विद्यार्थिनीची गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यास विद्यालयातून काढून टाकून पोलीस कारवाई केली जाईल
४) महाविद्यालयात कोणत्याही प्रकारची निवडणूक घेतली जाणार नाही व विनापरवानगी सहलीचे आयोजित केले जाणार नाहीत
५) महाविद्यालयाच्या कोणत्याही मालमत्तेची मोडतोड अगर नुकसान केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल
६)महाविद्यालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचना वाचाव्यात न वाचल्यास होणाऱ्या नुकसानीस विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील तसेच सूचनाचे ते पालन करतील
७)नियमात बदल करण्याची व आवश्यकते नवीन नियम तयार करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत

महाविद्यालयाचे ठळक वैशिष्ट्ये
१)तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग
२)सुसज्ज प्रयोगशाळा
३)संपूर्ण विद्यालय परिसर सीसीटीव्ही कॅमेरे च्या कक्षेत
४)स्वच्छ व सुंदर परिसर
५)अभ्यसांतर्गत सहलीचे आयोजन
६)विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन
७)सुसज्ज इमारत व खेळाचे मैदान
८)विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी चेतना इंटरनॅशनल स्कूल& चेतना कॉलेज ऑफ फार्मसी

 

img 20230820 wa0043
समाज परिवर्तन घडविण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने श्री उदय सदाशिव देशपांडे , श्री विलास नामदेव भोसले, श्री सोमनाथ पांडुरंग माने व श्री बाळू गणपत बोराटे या चौघांनी मिळून चेतना फाउंडेशन ची स्थापना 2019 साली सुरू केली. सरडेवाडी या परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या हेतूने १ जून २०२३ रोजी चेतना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ची स्थापना करण्यात आली या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्ले ग्रुप ते ४ थी, ५ वी ते १० वी सेमी इंग्रजी वर्ग, ११ वी व १२ वी विज्ञान , वाणिज्य , कला महाविद्यालयाची स्थापना केली . तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची सोय व्हावी म्हणून चेतना इंटरनॅशनल स्कूल ची स्थापना करण्यात आली आहे .

ग्रामीण भागातील पालकांचे दूरवर मुलींना शिक्षणासाठी पाठवण्याची मानसिक तयारी नसते त्यामुळे मुलींचे पुढील शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्यासाठी चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चालू करण्यात आले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची सोय ग्रामीण भागात होईल .
आमच्याकडे येणारा विद्यार्थी हा आमचा आत्मा आहे हे लक्षात घेऊन त्याची बौद्धिक , शारीरिक असा असे सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवणारे अभ्यास विषय तज्ञ प्राध्यापक वर्गांची फळी सज्ज आहे त्यांच्याच अनुभवी मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात आमचे विद्यार्थी गरुड झेप घेतील
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ यांच्या आयोजन केले जाणार आहे

अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
१)दहावीचे गुणपत्रकाची झेरॉक्स
२)शाळा सोडल्याचा मूळ दाखला
३)आधार कार्ड
४)पासपोर्ट साईचे दोन फोटो
अकरावी विज्ञान विद्यार्थ्यांसाठी
खालील विषयाची सोय
१) मराठी, इंग्रजी , फिजिक्स , केमिस्ट्री , बायोलॉजी , भूगोल .( B – Group)
२)मराठी, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, भूगोल.(A- Group)
३)मराठी, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स( AB-Group)
शिस्त
१)महाविद्यालयाच्या आवारात धूम्रपानास सक्त मनाई आहे
२)महाविद्यालयामध्ये मोबाईल वापरण्यास पूर्ण बंदी आहे
३)विद्यार्थिनीची गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यास विद्यालयातून काढून टाकून पोलीस कारवाई केली जाईल
४) महाविद्यालयात कोणत्याही प्रकारची निवडणूक घेतली जाणार नाही व विनापरवानगी सहलीचे आयोजित केले जाणार नाहीत
५) महाविद्यालयाच्या कोणत्याही मालमत्तेची मोडतोड अगर नुकसान केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल
६)महाविद्यालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचना वाचाव्यात न वाचल्यास होणाऱ्या नुकसानीस विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील तसेच सूचनाचे ते पालन करतील
७)नियमात बदल करण्याची व आवश्यकते नवीन नियम तयार करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत

महाविद्यालयाचे ठळक वैशिष्ट्ये
१)तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग
२)सुसज्ज प्रयोगशाळा
३)संपूर्ण विद्यालय परिसर सीसीटीव्ही कॅमेरे च्या कक्षेत
४)स्वच्छ व सुंदर परिसर
५)अभ्यसांतर्गत सहलीचे आयोजन
६)विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन
७)सुसज्ज इमारत व खेळाचे मैदान
८)विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि सीमा शुल्क विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

img 20230621 wa0033
पुणे, दि. २१: केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि सीमा शुल्क विभागाच्या लेखापरीक्षण १ आणि लेखापरीक्षण २ आयुक्तालयांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

कार्यक्रमात वस्तू व सेवा कर आणि सीमा शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. के. एन. राघवन, संजय महेंद्र, व्ही.एन. थेटे, दिलीप गोयल, रवींद्र डांगे, भूपेंद्र सिंह सुहाग, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ अशी आहे. यावेळी सर्व सहभागी अधिकारी आणि कर्मचारी यांनी निरोगी जीवनासाठी योगाभ्यास करण्याची शपथ घेतली.

error: Content is protected !!