मुबंई, दि. २२ : राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये क्रीडा सुविधांचा अद्ययावत आराखडा मान्यतेसाठी लवकर मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशा सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.
राज्य क्रीडा विकास समितीची बैठक मंत्रालयातील परिषद सभागृह येथे झाली. त्यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन बोलत होते. बैठकीस वित्त (व्यय) अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, सचिव (बांधकामे) अरविंद तेलंग यासह क्रीडा विभागाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे खेळाडूंना उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या क्रीडा संकुलाचा अद्ययावत आराखडा बनवावा. क्रीडा सुविधांसाठी आलेल्या सूचनांचा विचार करून हे क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. येथे सध्या खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्येही वाढ करून त्याप्रकारे खेळाडूंना सुविधा देण्यात याव्यात.राज्यात नव्याने होत असलेली व सध्या कार्यरत असलेल्या क्रीडा संकुलांचा पूर्णवेळ वापर होण्यासाठी नियोजन करावे. विभाग, जिल्हा, तालुका येथील मंजूर संकुलांची कामे गतीने होण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे. यावेळी नवीन तालुका क्रीडा संकुलांचे अंदाजपत्रक, सुधारित अंदाजपत्रक तसेच अनुदान मर्यादेबाहेरचे अतिरिक्त अंदाजपत्रक व आराखडे तपासून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.खेळाडूंना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधांसाठी क्रीडा विभागाने आग्रही असले पाहिजे. ग्रामीण भागातही क्रीडांग्रणांसाठी नियोजन करावे, फुटबॉल या खेळाची लोकप्रियता पाहता फुटबॉल लीगची तयारी करण्यात यावी, या खेळासाठीही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असेही मंत्री श्री.महाजन म्हणाले.

पुणे, दि. २३: पुढील वर्षी फ्रान्स (ल्योन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उमेदवारांची निवड होण्यासाठी जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पूर्वतयारीच्या निवडीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.
फ्रान्स (ल्योन) येथे 52 क्षेत्रांशी संबंधित जागतिक कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने संबंधित जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
कौशल्य स्पर्धेचे जिल्हा, विभाग, राज्य तसेच देश पातळीवर आयोजन करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, डिजिटल बांधकाम, औद्योगिक डिझाइन तंत्रज्ञान, इंडस्ट्री ४.० माहिती नेटवर्क गॅबलिंग, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टम एकत्रीकरण आणि जल तंत्रज्ञान या क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी १९९९ किंवा त्यानंतरचा तर इतर क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००२ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.
कौशल्य स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून निवड होणाऱ्या उमेदवारांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेमार्फत करण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम हॉस्पिटॅलिटी संस्था, कॉर्पोरेट तांत्रिक संस्था, कौशल्य प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीईटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, फाइन आर्टस कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिटयूट, इन्स्टिटयूट ऑफ ज्वेलरी मेकिंग, तसेच इतर सर्व महाविद्यालये, व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांमधील उमेदवारांची नोंदणी करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी. तसेच याकरिता जिल्ह्यातील सर्व संबंधित संस्थांनी सहभाग घेऊन कौशल्य स्पर्धेबाबतची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.
000

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्यामुळे भविष्यातील संधी ओळखून नियमित अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्यासाठी पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सतत दिशादर्शक मार्गदर्शन करण्याची गरज आहे. राज्यातील महाविद्यालयांमधील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्रे’ स्थापन करण्यात येणार आहेत.
*”ज्ञान ही शक्ती आहे, माहिती म्हणजे स्वातंत्र्य तर शिक्षण हा प्रत्येक कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचा आधार आहे…”*
विद्यार्थ्यांचे सामान्य जीवन सद्या गुंतागुंतीचे बनत आहे. बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. शिक्षण क्षेत्रात देखील आज आपण खूप बदल होतांना बघत आहोत. नवनवीन अभ्यासक्रम, व्यवसाय, विशेषीकरण यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात अडचणी येतात. यासाठी नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्री-शिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षेसह उद्योजकता, व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने समाज कल्याण विभागाकडून ‘समान संधी केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात किमान एक प्राध्यापक आणि सहाय्यक म्हणून काही विद्यार्थ्यांची मदत घेऊन ‘समान संधी केंद्र’ सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने या केंद्राच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. ‘समान संधी केंद्र’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शासन प्रोत्साहन देणार आहे. यासोबतच उद्योजक निर्मिती किंवा व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षणासह सर्वसमावेशी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेचे सर्वच स्तरातून स्वागतही करण्यात येत आहे.
उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आणि इतर सर्व शैक्षणिक संस्थांच्या सर्व महाविद्यालयांमध्ये ‘समान संधी केंद्र’ सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू नसली तरी प्रत्येक महाविद्यालयात केंद्राची स्थापना करण्याचे निर्देश तसे देण्यात आलेले आहेत. यामध्ये समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून व्हॉट्सअॅप ग्रुप आणि समाज माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय साधाण्याची सूचना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना इतर जण कसे वागवतात, यापेक्षा त्याला स्वतःला, स्वतःबद्दल कसे वाटते, ते जाणणे आणि त्यावर काम करणे, हे शिक्षकांनी महत्त्वाचे मानायला हवे. आपण कोणीतरी वेगळे आहोत, सर्वांपेक्षा माझ्यात काही विशेष गुण आहेत, हे मुलांना जाणवून देण्यामुळे मुलांच्या इतर क्षेत्रातल्या कामगिरीवर मोठाच परिणाम होतो. याच बरोबरीने मुले अहंकारी होत नाहीत ना, वागणे बोलणे, उद्दामपणाचे होत नाही ना, या सीमारेषा सांभाळणेही तितकेच आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीतील अडथळे, त्याची कारणे, निदान, उपचार मार्गदर्शन आणि योग्य समुपदेशन ‘समान संधी केंद्रा’ द्वारे होवू शकते.
मानव एक अमूल्य संसाधन आहे. या संसाधनाची वाढ, विकास संवेदनशील आणि जाणीवपूर्वक रीतीने होण्याची गरज आहे. मागासवर्गीय मुला-मुंलीना उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता, व्यावसायिक, कौशल्य शिक्षण आदि महत्वाकांक्षी उपक्रम “समान संधी केंद्र”च्या माध्यमातून राबविले जाणार आहे.
शाळांमधील करिअर समुपदेशनाची सध्याची प्रणाली आणि मुख्य शिक्षण आणि सर्वोत्तम पद्धती नेमकी काय आहेत या सर्व बांबीचा विचार करूनच “समान संधी केंद्र” उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे. व्यावसायिक शिक्षणाबाबत असलेल्या धारणा पासून मुक्त करण्यासाठी आणि त्या महत्त्वाकांक्षी बनवण्यासाठी सर्व संबंधितांकडून एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, इतर सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्या अधिपत्याखाली येणार्या सर्व महाविद्यालयांमध्ये ‘समान संधी केंद्रे’ तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने समान संधी केंद्राची स्थापना करून महाविद्यालयनिहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी, त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा किंवा इतर समाज माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय करावा, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणाची संधी प्रदान करणे, ‘समान संधी केंद्रा’चे उद्दिष्ट्य आहे.
डॉ. प्रशांत नारनवरे,(भा.प्र.से.)
आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

पुणे, दि. २३: सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी; याअनुषंगाने आपल्या अधिनस्त निवडणूक विषयक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकसित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४ व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी)’ या विषयावर यशदा येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवसातील प्रथम सत्रात मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे सहसचिव ओ. पी. सहानी, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते.
ईव्हीएममधील प्रक्रिया पारदर्शक असून त्यामध्ये कोणताही प्रकारचा मानवी हस्तक्षेप करता येत नाही, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक प्रकियेच्यावेळी ईव्हीएम जोडताना मतदान कक्षात स्वतंत्र वीज जोडणी असल्याची खात्री करावी. ईव्हीएमवर सूर्यप्रकाश, पाऊस आदी तांत्रिक बाबीचा होणारा परिणामाबाबत पडताळणी करुन घ्यावीत. यासाठी निवडणूकीपूर्वी अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात यावेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळताना घेण्यात येणाऱ्या दक्षतेबाबत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे.
श्री. देशपांडे पुढे म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या तंत्रज्ञानाविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये शिबीरे, प्रश्नंमजूषा आयोजित करावी. प्रचार प्रसिद्धीसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देणारे छोटे-छोटे भाग करुन चित्रफिती तयार कराव्यात आणि समाजमाध्यमाचा वापर करावा.
सहसचिव श्री. सहानी म्हणाले, सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी ईव्हीएम ताब्यात घेताना आवश्यक तांत्रिक बाबी विचारात घेऊनच ताब्यात घेण्यात याव्यात. व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक अडचण असल्यास संपूर्ण संच बदलण्यात येतो, असेही श्री.सहानी म्हणाले.
भोर-वेल्हाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी ईव्हीएम हाताळताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम बाबतचे गैरसमज व त्याअनुषंगाने करावयाच्या उपायोजना, ईव्हीएम विषयी न्यायालयीन याचिका, न्यायनिवाडे, परिपत्रके, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मॉकपोल, व्हीव्हीपॅट, निवडणूक साहित्य वाटप, साहित्य ताब्यात घेताना घ्यावची काळजी आदी विषयाबद्दल माहिती दिली.
यावेळी राज्यातील विविध जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक प्रकियेत काम करताना आलेले अनुभव मांडले.
रत्नागिरी :- केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज रत्नागिरीत भाजपाच्या वतीने व्यापारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. आज सायंकाळी ५.०० वाजता पऱ्याची आळी येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.*
*👉🟥🟥👉सेवा, सुशासन व गरीब कल्याण साधणारे केंद्र सरकार ९ वर्षे पूर्ण करत आहे. यानिमित्त मोदी @ ९ हे अभियान देशभरात राबवण्यात येत आहे. सरकारची व्यापारी धोरणं, व्यापारी वर्गाच्या अपेक्षा, व्यापारी बंधूंचे मनोगत अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्व व्यापारी बांधवांचे एकत्रीकरण आज मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याकरिता सर्व व्यापारी बंधूंनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाने केले आहे.*
*👉🅾️🅾️👉या मेळाव्याला भाजपाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळ माने उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी शहर, तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन व्यापारी मेळावा संयोजक तथा भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी यांनी केले आहे.*
मुंबई:-मुंबई व पुणे शहरात बाँबस्फोटा घडवण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात इसमाने फोन कॉलद्वारे मुंबई पोलिसांना ही धमकी दिली आहे. पोलिसांना आलेल्या एक फोनमुळे खळबळ उडाली आहे. माझी मागणी पूर्ण झाल्यावर मी माझ्या माणसांसोबत परदेशात निघून जाईन, असेही त्याने म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.*
*👉🟥🟥👉या कॉलरने गुरुवारी सकाळी 10 वाजता मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केला. यावेळी त्याने म्हटले की, 24 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात मी बॉम्बस्फोट करणार आहे. मला दोन लाख रुपयांची गरज असून ही रक्कम मिळाल्यानंतर मी बॉम्बस्फोट करणार नाही असे त्या फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले. दोन लाख रुपये मिळाल्यास आपण आपल्या माणसांसोबत मलेशियाला निघून जाऊ, असा दावा या कॉलरने केला आहे.*
*👉🅾️🅾️👉कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासात समोर आले आहे. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम 505(1)(बी), 505(2) आणि 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.*
“दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू आहे. हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावं लागेल. आपल्या देशांची एकजूट या दहशतवादाचा सामना करु शकते. मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतरही दहशतवादाचा धोका आहेच. त्याचा बिमोड करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आपल्या भाषणात त्यांनी AI चा नवा अर्थही सांगितला. AI म्हणजे अमेरिका – इंडिया असं नरेंद्र मोदी म्हणाले.*
*👉🅾️🅾️👉आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया आणि युक्रेन युद्धाचाही उल्लेख केला. ते म्हणाले “ही वेळ युद्धाची नाही. युक्रेनमध्ये सुरु असलेला रक्तपात थांबणं आवश्यक आहे. युद्धामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो. मात्र चर्चा केल्याने अनेक गोष्टींमधून मार्ग निघू शकतो. रशिया आणि युक्रेन यांच्या फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरु आहे. भारतातर्फे दोन्ही देशांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.”*
*👉🟥🟥👉“भारतात विविधेत एकता आहे. आज जगाला भारताविषयी माहिती हवी आहे, भारतात काय सुरु आहे? याची जिज्ञासा जगभरात अनेकांना असते. मी या सदनातही ती जिज्ञासा पाहू शकतो. भारताचा विकास, तिथली लोकशाही आणि विविधेत असलेली एकता या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला समजून घ्याव्याश्या वाटत आहेत. भारत एखादी गोष्ट कशी करतो? कोणत्या गोष्टीला कसं तोंड देतो? याकडे जगाचं लक्ष असतं.”*
*👉🅾️🅾️👉“आधी भारत हा जगातली दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होता. मात्र आता भारत जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. २०२५ पर्यंत भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होईल याबाबत माझ्या मनात शंका नाही. भारतात विकासाला प्रचंड मोठी गती मिळाली आहे.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.*