Home Blog Page 143

संपन्न भारतासाठी शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश गरजेचा-नितीन गडकरी

img 20230630 wa0005
बीएमसीसीच्या नूतन इमारतीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन*

पुणे दि.२९: भविष्यातील संपन्न भारताचा विचार करताना शिक्षणाच्या माध्यमातून स्वदेशी, स्वावलंबनाच्या संस्कारासोबत शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या श्री मुकुंददास लोहिया शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योजक पुरुषोत्तम लोहिया, डेक्क्न एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ.रविंद्र आचार्य, प्राचार्य डॉ.जगदीश लांजेकर, जगदीश कदम, धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले, तंत्रज्ञान आपले जीवन सुसह्य करणार आहे, शेतकऱ्यांनाही संपन्न करणार आहे. त्यामुळे शिक्षणसंस्थांना भविष्यात विविध क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तंत्रज्ञानाचा विचार करावा लागेल. भारताला विश्वगुरू बनविताना ज्ञान-विज्ञानाचा उपयोग करून ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करण्यासाठी असे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे लागेल. गरजा आणि साधनस्त्रोताच्या उपलब्धतेवर आधारीत संशोधनाकडे वळावे लागेल. उद्योगांशी समन्वय साधून भविष्यातील तंत्रज्ञान आपल्या महाविद्यालयात शिकविण्याचा विचार केल्यास देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल.

नैतिकता, अर्थशास्त्र आणि पर्यावरण असे समाजाचे तीन महत्वाचे स्तंभ आहेत आणि समाजाच्या शाश्वत विकासासाठी शिक्षणाला सर्वाधिक महत्व आहे. शिक्षणातून मिळणाऱ्या संस्काराच्या आधारे आपली आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासोबत प्रगल्भ समाज निर्माण करता येतो. ज्ञात प्राप्त झाल्याशिवाय भविष्यातील इतर क्षेत्रात विस्तार करता येणार नाही.

मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देताना त्याची गुणवत्ता कायम ठेवून संस्काराधिष्ठित उत्तम नागरिक देशात तयार करण्याचा विचार भारताच्या शिक्षणपद्धतीत केला जातो. इतिहास, संस्कृती आणि वारसा या माध्यमातून आपला समाज प्रगल्भ झाला आहे. मात्र त्यासोबत नाविन्यता, उद्योजकता, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन कौशल्य आणि जगातील यशस्वी शिक्षण पद्धतीचा अभ्यासही आहे.

शिक्षण, संताच्या दिलेल्या विचारांच्या माध्यमातून होणारे प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कारामुळे भारतीय समाज सुसंस्कृत आहे. आपली अर्थव्यवस्था जगातली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान क्षेत्रात आपल्या युवकांनी नाव कमावले आहे. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात मिळालेले ज्ञानामुळे परिपूर्ण बनल्याने जगभरात ते आपले कार्य करू शकले. याचे श्रेय इथल्या शिक्षण संस्था, शिक्षक आणि कुटुंबाला आहे, असेही श्री.गडकरी म्हणाले.

सव्वाशे वर्षापूर्वी स्थापन झालेल्या डेक्क्न एज्युकेशन सोसायटीने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासोबत गुणवत्तेचाही विचार केला. अनेक गायक, कलाकार, साहित्यिक, समाजसुधारक, देशभक्त, राजकीय नेते या संस्थेने देशाला दिले. त्यामुळे सामाजिक परिवर्तनात आणि राष्ट्रीय पुर्ननिर्माणात या संस्थेचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

श्री.पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्वायत्त विद्यापीठ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विविध अभ्यासक्रम सुरू करता यावे यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठाना स्वायत्तता देण्यात येत आहे. असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करून समाजाची गरज पूर्ण करणारे हे विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नवीन इमारतीत बीबीएचे ८ अभ्यासक्रम आणि नाट्य व चित्रपटाचे प्रशिक्षण केंद्र होणार असल्याचे श्री.कुंटे यांनी प्रास्ताविकात सांगितले. श्री.गडकरी यांच्या हस्ते नारायण राठी अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा आणि भरतसृष्टी स्टुडीओचे उद्घाटन करण्यात आले.

तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे.मुख्यमंत्र्यांचं विठूरायाला साकडं; नगरच्या काळे दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान

img 20230629 wa0023
पंढरपूर :-आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला.भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. आज त्यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. विठ्ठलाची पूजा करण्याचा सर्वात आधी मान मिळाल्याने आम्ही धन्य झालो, असं भाऊसाहेब काळे म्हणाले. तर बा विठ्ठला… तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं.*

*👉🛑🛑👉आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे हे 25 वर्षापासून वारी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दांपत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे व्यवसायाने शेती करतात. काल आठ तास दर्शन रांगेत काळे दांपत्य उभे होते.*

*👉🔴🔴👉काळे दाम्पत्यांचा सत्कार*

*श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा झाल्यानंतर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत भरत शेठ गोगावले, मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील तसेच मानाचे वारकरि श्री व सौ भाउसाहेब काळे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.*

*👉🟥🟥👉आराखडा विश्वासात घेऊनच*

*पांडुरंगाची भक्तीभावे पूजा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. विठ्ठलाकडे राज्याच्या भल्याचं साकडं घातल्याचं ते म्हणाले. सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी पूजा करण्याची मला संधी मिळाली मी माझे भाग्य समजतो. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असं साकडं विठ्ठलाला घातलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्याचं सगळं काम सुरळीत सुरू आहे. पंढरपूरचा विकास आराखडा सगळ्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.*

*👉🛑🛑👉यामागे विठ्ठलाचाच आशीर्वाद*

*राज्यात काम करण्यासाठी आणखी बळ मिळो हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे. मुख्यमंत्री पद मिळालं यामागे खरंच विठ्ठलाचा आशीर्वाद आहे. आजच्या दिवस चांगला आहे. विरोधकांनी चुकत असेल, काही सूचना असतील तर द्याव्यात. मात्र सरकाय चांगलं काम करतंय, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.*

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ मंत्रिमंडळात घेण्यात आला निर्णय

मुंबई:-संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.*

*👉🔴🔴👉या दोन्ही योजनांत सध्या एक हजार रुपये इतके मासिक अर्थसहाय्य करण्यात येते. आता त्यात पाचशे रुपये वाढ झाल्याने ते दिड हजार रुपये इतके होईल. एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थींना सध्या १ हजार १०० तर दोन अपत्ये असलेल्या लाभार्थींना १ हजार २०० इतके मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. यात अनुक्रमे ४०० रुपये व ३०० रुपये अशी वाढ देखील करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही योजनांत मिळून ४० लाख ९९ हजार २४० लाभार्थी आहेत. निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे २ हजार ४०० कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.*

देशभर पावसाचा कहर! कुठे भूस्खलन,तर कुठे साचलं पाणी

देशभर पावसाचा कहर! 👉🅾️🅾️👉कुठे भूस्खलन,*
*☂️🌧️☂️तर कुठे साचलं पाणी*

*👉🅾️🅾️👉हवामान खात्याने देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेकडील 25 राज्यांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विभागनिहाय अरुणाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.*

*👉🔴🔴👉उत्तराखंडमध्ये चंबा, उत्तरकाशी, रुद्रप्रयागमध्ये पावसाची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे, त्यामुळे उत्तराखंडमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.हिमाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक भागांत मोठं नुकसान होत आहे. मुसळधार पावसामुळे सतलज नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, झारखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, गुजरात प्रदेश, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगडमध्ये पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.*

*👉🔴🔴👉हवामान खात्याने छत्तीसगडमधील 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील 8 जिल्ह्यांमध्ये 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.कर्नाटक, केरळ, माहे, लक्षद्वीप, पूर्व राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबईतही पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे, त्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत.*

तीन राज्यांतील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर; असा असेल निवणूक कार्यक्रम

img 20230628 wa0005
नवी दिल्ली :-राज्यसभेच्या तीन राज्यांमधील १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील या जागांवरील सदस्य जुलै-ऑगस्टमध्ये निवृत्त होत असल्यानं निवडणूक घेण्यात येणार आहे.पुढील महिन्यात २४ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे, निवडणूक आयोगानं याची घोषणा केली आहे.*

*👉🔴🔴👉केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही गुजरातमधील जागेवरील खासदारकीचा कार्यकाळ संपणार आहे. त्याचबरोबर दिनेशचंद्र जेमलभाई अनवादिया आणि लोखंडवाला जुगलसिंह माथुरजी या भाजपच्या गुजरातमधील तीन खासदारांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट रोजी संपणार आहे.त्याचबरोबर गोव्यातील भाजपचे खासदार विनय डी तेंडुलकर यांचा कार्यकाळ २८ जुलै संपणार आहे. तर पश्चिम बंगालमधून सर्वाधिक ६ जागांवरील खासदारांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या खासदारांमध्ये तृणमुल काँग्रेसचे खासदार देरेक ओब्रिअन, डोला सेन, सुश्मिता देव, शांता छेत्री, सुखेंदू शेखर राय आणि काँग्रेस खासदार प्रदीप भट्टाचार्य यांचा समावेश आहे.*

*👉🅾️🅾️👉असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?*

*🔺🔺नोटिफिकेशन निघणार – गुरुवार, ६ जुलै २०२३*

*🔺🔺अधिसुचित करण्याची शेवटची तारीख – गुरुवार, १३ जुलै २०२३*

*🔺🔺अधिसुचत नावांची छाननी – शुक्रवार, १४ जुलै २०२३*

*🔺🔺नाव मागे घेण्याची शेवटची तारीख – सोमवार, १७ जुलै २०२३*

*🔺🔺निवडणुकीची तारीख – सोमवार, २४ जुलै २०२३*

*🔺🔺निवडणुकीची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत*

*🔺🔺🔺मतमोजणीचा दिनांक – सोमवार, २४ जुलै २०२३. सायं. ५ वाजेपर्यंत*

*🔺🔺निवडणुक कार्यक्रम समाप्त – बुधवार, २६ जुलै २०२३*

तीन राज्यांतील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर; असा असेल निवणूक कार्यक्रम

img 20230628 wa0005
नवी दिल्ली :-राज्यसभेच्या तीन राज्यांमधील १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील या जागांवरील सदस्य जुलै-ऑगस्टमध्ये निवृत्त होत असल्यानं निवडणूक घेण्यात येणार आहे.पुढील महिन्यात २४ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे, निवडणूक आयोगानं याची घोषणा केली आहे.*

*👉🔴🔴👉केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही गुजरातमधील जागेवरील खासदारकीचा कार्यकाळ संपणार आहे. त्याचबरोबर दिनेशचंद्र जेमलभाई अनवादिया आणि लोखंडवाला जुगलसिंह माथुरजी या भाजपच्या गुजरातमधील तीन खासदारांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट रोजी संपणार आहे.त्याचबरोबर गोव्यातील भाजपचे खासदार विनय डी तेंडुलकर यांचा कार्यकाळ २८ जुलै संपणार आहे. तर पश्चिम बंगालमधून सर्वाधिक ६ जागांवरील खासदारांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या खासदारांमध्ये तृणमुल काँग्रेसचे खासदार देरेक ओब्रिअन, डोला सेन, सुश्मिता देव, शांता छेत्री, सुखेंदू शेखर राय आणि काँग्रेस खासदार प्रदीप भट्टाचार्य यांचा समावेश आहे.*

*👉🅾️🅾️👉असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?*

*🔺🔺नोटिफिकेशन निघणार – गुरुवार, ६ जुलै २०२३*

*🔺🔺अधिसुचित करण्याची शेवटची तारीख – गुरुवार, १३ जुलै २०२३*

*🔺🔺अधिसुचत नावांची छाननी – शुक्रवार, १४ जुलै २०२३*

*🔺🔺नाव मागे घेण्याची शेवटची तारीख – सोमवार, १७ जुलै २०२३*

*🔺🔺निवडणुकीची तारीख – सोमवार, २४ जुलै २०२३*

*🔺🔺निवडणुकीची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत*

*🔺🔺🔺मतमोजणीचा दिनांक – सोमवार, २४ जुलै २०२३. सायं. ५ वाजेपर्यंत*

*🔺🔺निवडणुक कार्यक्रम समाप्त – बुधवार, २६ जुलै २०२३*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 28 जून 2023 दिन – बुधवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 28 जून 2023*
*⛅दिन – बुधवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – आषाढ़*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – दशमी 29 प्रातः 03:18 तक तत्पश्चात एकादशी*
*⛅नक्षत्र – चित्रा शाम 04:01 तक तत्पश्चात स्वाती*
*⛅योग – परिघ सुबह 06:09 तक तत्पश्चात शिव*
*⛅राहु काल – दोपहर 12:43 से 02:24 तक*
*⛅सूर्योदय – 05:57*
*⛅सूर्यास्त – 07:29*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:33 से 05:15 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:22 से 01:04 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – दशमी को कलंबी शाक त्याज्य है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 आध्यात्मिक कोष भरने का काल – चतुर्मास 🌹*
*(चतुर्मास : 29 जून से 23 नवम्बर 2023 )*

*🔸देवशयनी एकादशी से देवउठी एकादशी तक के ४ महीने भगवान नारायण ध्यानमग्न रहते हैं । (पुरुषोत्तम मास [श्रावण] होने से इस बार लगभग ५ महीने का चातुर्मास है ।) अत: ये मास सनातन धर्म के प्रेमी लोगों के बीच आराधना-उपासना के लिए विशेष महत्त्वपूर्ण माने जाते हैं । चतुर्मास में अन्न, जल, दूध, दही, घी, मट्ठा व गौ का दान तथा वेदपाठ, हवन आदि महान फल देते हैं ।*

*स्कंद पुराण ( ब्राह्म खंड, चातुर्मास्य माहात्म्य : ३.११) में लिखा हैं :*

*सद्धर्म: सत्कथा चैव सत्सेवा दर्शनं सताम ।*
*विष्णुपूजा रतिर्दाने चातुर्मास्यसुदुर्लभा ।।*

*‘सद्धर्म (सत्कर्म), सत्कथा, सत्पुरुषों की सेवा, संतों का दर्शन-सत्संग, भगवान का पूजन और दान में अनुराग – ये सब बातें चौमासे में दुर्लभ बतायी गयी हैं ।’*

*🔹चतुर्मास में करणीय🔹*

*🔸चतुर्मास में प्रतिदिन सुबह नक्षत्र दिखे उसी समय उठ जाय और नक्षत्र-दर्शन करे । इन दिनों २४ घंटे में के बार भोजन करनेवाले व्यक्ति को अग्निष्टोम यज्ञ का फल मिल जाता है । यज्ञ में जो आहुति दे सकें सात्विक भोजन की, वैसा ही यज्ञोचित भोजन करें । ब्रह्मचर्य का पालन करें । चतुर्मास में पलाश की पत्तल पर भोजन बड़े-बड़े पातकों का नाशक है, ब्रह्मभाव को प्राप्त करनेवाला होता है । वटवृक्ष के पत्तों या पत्तल पर भोजन करना भी पुण्यदायी कहा गया है । पुरे चतुर्मास में पलाश की पत्तल पर भोजन करें तो धनवान, रूपवान और मान योग्य व्यक्ति बन जायेगा ।*

*🔸पंचगव्य का शरीर के सभी रोगों और पापों को मिटाने तथा प्रसन्नता देने में बड़ा प्रभाव है । चातुर्मास में केवल दूध पर रहनेवाले को साधन-भजन में बड़ा बल मिलता है अथवा केवल फल-सेवन बड़े-बड़े पापों को नष्ट करता है ।*

*🔸इस समय पित्त-प्रकोप होता है । गुलकंद या त्रिफला का सेवन, मुलतानी मिट्टी से स्नान, दूध पीना पित्त-शमन करता है । हवन आदि में यदि तिल-चावल की आहुति देते हैं तो आप निरोग हो जाते हैं ।*

*🔹चतुर्मास में त्यागने योग्य🔹*

*🔸चतुर्मास में गुड़ व भोग-सामग्री का त्याग कर देना चाहिए । जो दही का त्याग करता है उसको गोलोक की प्राप्ति होती है । नमक का त्याग कर सकें तो अच्छा है । परनिंदा त्यागने की बहुत प्रशंसा शास्त्रों में लिखी है । चतुर्मास में परनिंदा महापाप है, महाभय को देनेवाली है । इन ४ महीनों में शादी और सकाम यज्ञ, कर्म आदि करना मना है ।*

*🔹आध्यात्मिक कोष अवश्य भरें🔹*

*🔸 चतुर्मास में बादल, बरसात की रिमझिम, प्राकृतिक सौंदर्य का लहलहाना यह सब साधन-भजनवर्धक है, उत्साहवर्धक है । अत: तपस्या, साधन-भजन करने का यह मौका चूकना नहीं चाहिए । अपनी योग्यता के अनुसार व्यक्ति कोई-न-कोई छोटा-बड़ा नियम ले सकता है । इन दिनों ज्यादा भूख नहीं लगती । उपवास, ध्यान, जप, शांति, आनंद, मौन, भगवत्स्मृति,सात्विक खुराक, स्नान-दान ये विशेष हितकारी, पुण्यदायी, साफल्यदायी है । चतुर्मास में संकल्प कर लें कि ८ महीने तो संसार का धंधा-व्यवहार करते हैं, सर्दी में शरीर की तंदुरुस्ती और दिनों में धन का कोष भरा जाता है किंतु इन ४ महीनों में साधना का खजाना, आध्यात्मिक कोष भरेंगे ।’*

*🌹 देवशयनी एकादशी – 29 जून 2023 🌹*

*🔸एकादशी 29 जून प्रातः 03:18 से रात्रि 02:42 तक*

*🔸एकादशी व्रत के लाभ🔸*

*👉 एकादशी व्रत के पुण्य के समान और कोई पुण्य नहीं है ।*

*👉 जो पुण्य सूर्यग्रहण में दान से होता है, उससे कई गुना अधिक पुण्य एकादशी के व्रत से होता है ।*

*👉 जो पुण्य गौ-दान, सुवर्ण-दान, अश्वमेघ यज्ञ से होता है, उससे अधिक पुण्य एकादशी के व्रत से होता है ।*

*👉 एकादशी करनेवालों के पितर नीच योनि से मुक्त होते हैं और अपने परिवारवालों पर प्रसन्नता बरसाते हैं । इसलिए यह व्रत करने वालों के घर में सुख-शांति बनी रहती है ।*

*👉 धन-धान्य, पुत्रादि की वृद्धि होती है ।*

*👉 कीर्ति बढ़ती है, श्रद्धा-भक्ति बढ़ती है, जिससे जीवन रसमय बनता है ।*

*👉 परमात्मा की प्रसन्नता प्राप्त होती है । पूर्वकाल में राजा नहुष, अंबरीष, राजा गाधी आदि जिन्होंने भी एकादशी का व्रत किया, उन्हें इस पृथ्वी का समस्त ऐश्वर्य प्राप्त हुआ । भगवान शिवजी ने नारद से कहा है : एकादशी का व्रत करने से मनुष्य के सात जन्मों के पाप नष्ट हो जाते हैं, इसमे कोई संदेह नहीं है । एकादशी के दिन किये हुए व्रत, गौ-दान आदि का अनंत गुना पुण्य होता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना

पुणे, दि. २७: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येत असून त्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत अनुदान योजना, बीज भांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना अशा तीन योजना राबविण्यात येतात. थेट कर्ज योजनेचा लाभ मातंग समाज व त्यामध्ये अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादिग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या १२ पोट जातींना घेता येणार आहे. अर्जदार पुणे जिल्ह्यातील रहिवासी असावा. वय १८ वर्षे पूर्ण व ५० वर्षाच्या आत असावे. सीबील क्रेडिट स्कोअर किमान ५०० असावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. वेळोवेळी महामंडळाने घातलेल्या अटी, शर्ती बंधनकारक राहतील.

योजनेअंतर्गत १ लाख रुपयांच्या प्रकल्प मूल्यासाठी महामंडळाचे बीजभांडवल ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये असून बीजभांडवल रक्कमेवर ४ टक्के व्याजदर असणार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भौतिक उदिष्ट ९० प्रकरणांचे प्राप्त झाले आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.

अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्डची छायांकित प्रत, व्यवसायासाठी आवश्यक जागेचा पुरावा, तीन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान, कर्जाचा लाभ न घेतल्याबाबतचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र, आधार क्र. जोडणी केलेल्या बँक खात्याचा तपशील, ग्रामसेवकाचे शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, दुकाने अनुज्ञप्ती/ उद्योग आधार जोडणे आवश्यक आहे.

इच्छुक व पात्र अर्जदारांनी अटी व शर्ती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, विहित नमुन्यातील अर्ज आदींबाबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३,१०४ मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे दूरध्वनी क्र. ०२०-२९७०३०५७ येथे संपर्क साधून माहिती घ्यावी, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी कळवले आहे.
0000

error: Content is protected !!