Home Blog Page 126

३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर ४० पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर

*नवी दिल्ली – पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात.राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईक नवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ आज जाहीर करण्यात आली. यासह राज्यातील ३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण ७६ पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे.*

*👉🟥🟥👉’राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष २०२३ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण ९५४ पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना समावेश आहे.*

*👉🔴🔴👉विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांचा समावेश आहे. राज्यातल्या ३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. पोलीस शौर्य पदकांमध्ये रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील,भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे,कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे.*

*👉🟥🟥👉गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ राज्यातल्या ४० पोलिसांना जाहीर झाले आहे. यामध्ये प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी, मुंबई), राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे.*

स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका; टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकले स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाच्या लोगो अनवरणाचे दृश्य

भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते गिरीश खत्री यांच्या स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका पाहायला मिळाला. भारतातील पहिली स्वच्छतेच्या बाबतीतील अशी स्पर्धा असल्याने थेट टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाच्या लोगो अनवरणाचे दृश्य झळकले आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच या स्पर्धेच्या लोगोच्या अनावरणाचा सोहळा पार पडला होता त्याची दृश्ये टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकली आहेत.

संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती करण्याचे काम केले होते. हाच वसा पुढे नेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिला आहे. हा नारा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी गिरीश खत्री हे प्रयत्न करत आहेत. यातूनच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष आणि गिरीश खत्री मित्रपरिवाराच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘ नमो करंडक स्पर्धा २०२३’या स्पर्धेचे सलग तिसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.

गिरीश खत्री यांचे जे उपक्रम असतात ते अतिशय भव्यदिव्य आणि अद्वितीय अशा स्वरूपाचे असतात. सातत्याने नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून ते अनेक लोकाभिमुख असे अनेक उपक्रम राबवत असतात याच साठी त्यांचा कर्वेनगर आणि कोथरूड परिसरात लौकिक आहे. स्वच्छतेचा नमो करंडक हि स्पर्धा देखील अशी एक अभिनव अशी सपर्धा असून या स्पर्धेत प्रामुख्याने सोसायटी आणि अपार्टमेंटच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जातो. यानंतर तज्ञ परीक्षक त्या सोसायटीला प्रत्यक्ष भेट देवून परीक्षण करतात. यानंतर सर्वात स्वच्छ सोसायट्यांना बक्षीसदेत गौरव केला जातो. या स्पर्धेला आता मोठा प्रतिसाद मिळू लागला या स्पर्धेत पहिल्या वर्षी ४२ सोसायट्यांनी सहभाग नोंदवला होता तर या वर्षी तब्बल ९० सोसायट्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. आता तिसऱ्या पर्वात कमीत कमी २०० सोसायट्या सहभागी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

याबाबत बोलताना खत्री म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश दिला. आज आपण पाहतोय की या स्वच्छ भारत अभियानाने चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. एका जनआंदोलनाच्या स्वरुपात हे सर्व सुरु आहे. स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे आणि तोच उपक्रम किंवा त्याच माध्यमातून हे काम आम्ही पुढे नेत आहोत. ज्याप्रमाणे आपण गणेशोत्सव, नवरात्र उत्सव साजरे करतो त्याप्रमाणेच स्वच्छतेचा जागर व्हावा हीच यामागील संकल्पना आहे. आज आमच्या या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाच्या लोगो अनवरणाचे दृश्य टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकणे हि निश्चितच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जो हेतू डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत त्याची अशा पद्धतीने जागतिक स्तरावर दखल घेतली जात असेल तर आमच्यासाठी हि बाब अभिमानास्पद आहे.

राष्ट्रपती पोलिसपदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 14 :- राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील 76 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कायदा-सुव्यवस्था, गुप्तवार्ता, गुन्ह्यांचा तपास, आपत्कालीन परिस्थितीतील मदतकार्य, नागरिकांशी संवाद-सौहार्द अशा अनेक आघाड्यांवर जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दलांपैकी असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची क्षमता, गुणवत्ता, दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. पदकविजेत्या पोलिसांचा राज्याला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक केलं असून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पदक’ विजेत्या प्रवीण साळुंखे, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलीस अधिकाऱ्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील 954 पोलिसपदकांची घोषणा केली. राज्यातील 76 पोलिसांना ही पदकं जाहीर झाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, महाराष्ट्र पोलीसांना शौर्याची, त्यागाची, देशसेवेची, बलिदानाची प्रदीर्घ, गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्र पोलिसांची देशसेवेची ही गौरवशाली परंपरा पुढे नेणाऱ्या राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 33 अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘पोलीस शौर्यपदक’, तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 40 अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. पदकविजेत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्राला अभिमान असून यापुढील काळातही त्यांच्याकडून अशीच देशसेवा घडत राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील 76 पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर

महाराष्ट्रातील 76 पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर
3 पोलिस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर
33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर
नवी दिल्ली, 14 : पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ आज जाहीर करण्यात आली. यासह राज्यातील 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण 76 पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे.
‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 954 पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 76 पोलिसांना समावेश आहे.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांचा समावेश आहे.
राज्यातल्या 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. पोलीस शौर्य पदकांमध्ये रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील,भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे,कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे.
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ राज्यातल्या 40 पोलिसांना जाहीर झाले आहे. यामध्ये प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी, मुंबई), राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे. सविस्तर यादीचा तपशील www.mha.gov.in आणि https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा : http://twitter.com/MahaGovtMic
मपकेंनदि /वृत्त क्र.150 / 14.08.2023

युवकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी करावी-श्रीकांत देशपांडे

पुणे, दि. १४: युवकांनी वृक्षारोपण करून वनसंपदा जतन करण्यासोबतच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, वर्शिप अर्थ फाऊंडेशन, विल्लो पूनावाला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व ममोज पांडा यांच्या सहकार्याने वन देवी उद्यान कोथरूड येथे आयोजित वृक्षारोपण मोहिमेत श्री. देशपांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, २१० कोथरूड विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी अंजली कुलकर्णी, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे तेजस गुजराथी, अल्ताफ पिरजादे, ममोज पांडाचे संचालक यश पावले, निवडणूक साक्षरता क्लब पुणे विभागाचे समन्वयक सूरज शिराळे, नेहा गवळी, आशिष जगनाडे, राज चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले, भारत हा युवकांचा देश आहे. देशाचे भवितव्य हे युवांच्या हाती आहे. पुण्यात युवा मतदारांची संख्या कमी आहे. युवा पिढीने वृक्षारोपण, नदी सवर्धन यासारख्या विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासोबत नव मतदार बनून सामाजिक बांधिलकी जपावी. पुण्याला भरपूर टेकड्यांच्या वारसा लाभलेला आहे. तो वारसा आपण वृक्षारोपण करुन जपला पाहिजे.

मतदारांमुळे आज भारतीय लोकशाही जिवंत आहे. पुणे विभागातील निवडणूक साक्षरता क्लबची संकल्पना मतदानापुरती मर्यादित नसून ती लोकशाही मुल्यांच्या दिशेने वाढली आहे. त्या लोकशाही मुल्यांअंतर्गत अनेक सामाजिक विषय आहेत. ज्यामध्ये वृक्षारोपण आणि पर्यावरण असे महत्वाचे विषय आहेत. लोकशाहीमध्ये खुप आव्हाने आहेत. जोपर्यंत मतदार आपले अधिकार बजावतात तोपर्यंत लोकशाहीला धोका नाही. आजच्या युवांमध्ये सर्जनशीलता खूप असून त्याचा त्यांनी वापर करावा, ‘माझे झाड माझी जबाबदारी’ ही संकल्पना पूर्णत्वास आणावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्रीमती कळसकर यांनी वृक्षारोपणामागचा हेतू सांगितला. त्या म्हणाल्या, पुणे जिल्ह्यात ४ लोकसभा आणि २१ विधानसभा मतदार संघ आहेत. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त ८० लाख मतदार आहेत. त्यामध्ये युवा मतदारांचे प्रमाण खुपच कमी आहे. वृक्षारोपणासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघाच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले. हे वृक्ष संगोपनाची जबाबदारी रोटरी आणि लायन्स क्लब यांनी घेतली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी २१० कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्यावतीने मतदार प्रक्रियेसंबंधी नमुना अर्ज क्रमांक ६, ७, आणि ८ भरुन घेण्यात आले. या विशेष अभियानाची पाहणी श्री.देशपांडे यांनी केली.

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा पदवीदान समारंभ संपन्न

img 20230814 wa0023

जगाची कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी तयार रहा- राज्यपाल*पुणे, दि. १४: जगातील अनेक देश त्यांना असलेली डॉक्टर, परिचारिका, अभियंते, कुशल कामगार अशा कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. स्नातकांनी या संधीचा फायदा घेत जगाच्या कोणत्याही भागात काम करण्यास तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १४ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रीज लि. चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि बेंगळुरू येथील रामय्या संस्था समूहाच्या गुणवत्ता हमी व उत्कृष्टता कक्षाचे प्रधान सल्लागार डॉ. पी. एन. राजदान यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र. कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपण क्रांतिकारी असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारत आहोत. या धोरणाद्वारे अध्ययन प्रक्रीयेत गतिमानता आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध झाली आहे. भारत देश २०३५ पर्यंत शिक्षणासाठी सकल नोंदणी गुणोत्तराचे (जीईआर) ५० टक्के हे अपेक्षित लक्ष्य गाठेल, असा विश्वास आहे. आपल्या लोकसंख्येचे रुपांतरण संपत्तीमध्ये करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.

डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठातून विद्यार्थी आरोग्य विज्ञान, दंतचिकित्सा, जैवतंत्रज्ञान, बायोइन्फॉरमॅटिक्स, पूरक वैद्यकशास्त्र, नर्सिंग, आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे पदवीधर इतर नियमित अभ्यासक्रमांसह पदवी मिळवत असल्याचा आनंद आहे. रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांमधील वैद्यकीय सेवेचा अनुभव स्नातकांना निष्णात डॉक्टर बनवेल, असा विश्वासही राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला.

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) आणि मशीन लर्निंगच्या उदयाच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतच बदल होणार आहेत. आज केवळ साक्षर असणे पुरेसे नाही तर एआय साक्षर असणे आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ते शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धती, रोगाचे निदान आणि उपचार या दोन्हींवर परिणाम करणार आहे.

उर्वरित जगाच्या तुलनेत आपण एआयमध्ये मागे आहोत. परंतु देशातील युवा पिढी तंत्रज्ञानातील बदलांशी सहज जुळवून घेणारी असल्याने त्याचा भविष्यात लाभ होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या येणाऱ्या युगात आयुष्यभर आणि सतत शिकत रहावे लागेल. पुढे राहण्यासाठी आपल्या लोकांना कौशल्य, पुन: कौशल्यप्राप्ती आणि कौशल्ये उन्नत करण्यासाठी तयार असले पाहिजे. एकापेक्षा अनेक कौशल्ये शिकणे भारतीयांना एआय आणि मशीन लर्निंगमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून वाचण्यास मदत करेल, असेही राज्यपाल म्हणाले.

विद्यापीठाने आपले शिक्षण एआय आणि मशीन लर्निंगशी कशाप्रकारे अनुरूप करता येईल यासाठी पुढाकार घ्यावा. मानवी बुद्धिमत्ता कोणत्याही एआय प्रणालीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. एआयला सहानुभूती, प्रेमभावना नाहीत, ज्या मानवाकडे आहेत. या भावनांमुळेच तुम्ही समाजाची आणि देशाची सेवा करू शकता, असेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले. प्रत्येक तरुणाने जगातील एक तरी भाषा शिकली पाहिजे. देशातील कोणत्याही राज्यात आणि जगातील कोणत्याही भागात प्रवास करण्यासाठी सज्ज व्हावे, असा संदेशही त्यांनी दिला.

यावेळी कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, एका संस्थेपासून प्रारंभ करुन संस्थेन ९ हून अधिक संस्था स्थापन केल्या. वैद्यकशास्त्र, नर्सिंग, दंतचिकित्सा, आयुर्वेद, होमिओपॅथी आदी अनेक विद्याशाखांचा विस्तार केला. उच्च गुणवत्तेमुळे विद्यापीठाला नॅक ‘ए++’ अधिस्वीकृती प्राप्त झाली आहे. विद्यापीठाच्या रुग्णालयाला अवयव प्रत्यारोपणाचा परवाना असून आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना आता अनेक संधी उपलब्ध झाल्या असून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांनी स्वागत करून विद्यापीठ अहवाल सादर केला. त्यांनी सांगितले, विद्यापीठाने राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत चांगली कामगिरी केली आहे. विद्यापीठ क्रमवारीमध्ये देशात ४६ वा क्रमांक तर वैद्यकीय क्षेत्रात १५ वा आणि दंतशास्त्र मध्ये ३ रा क्रमांक आहे. १ हजार ४०० पेक्षा अधिक संशोधन अहवाल विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. २६ पेटंट प्रसिद्ध झाले आहेत. २ स्टार्टअप नोंदणीकृत झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. फिरोदिया, डॉ. चौधरी आणि डॉ. राजदान यांनीही मनोगत व्यक्त केले.

या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या ३३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेतील ४ हजार ९५ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १४ विद्यावाचस्पती (पीएच.डी.), ३ हजार १५ पदव्युत्तर पदवी, १ हजार ५५ पदवी आणि ११ पदविका या अशा एकूण ८ विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

तिरंग्याचे ध्वजारोहण करण्याकरिता काय आहेत नियम?जाणून घ्या ध्वजारोहणाशी सर्व नियम

*👉🅾️🅾️👉15 ऑगस्ट रोजी देशभरात 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. देशातील ध्वजारोहणाबाबत भारतीय ध्वज संहितेत काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत.तिरंगा ध्वज उतरवताना आणि फडकवताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.*

*👉🔴🔴👉15 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण देश 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रध्वज फडकवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपला ध्वज हे राष्ट्राभिमानाचे प्रतिक आणि प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रतीकांपैकी एक आहे. देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा म्हणून ओळखला जातो, जो भगवा, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांचा असतो. यात पांढर्‍या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. या अशोक चक्रात 24 आरै आहेत.*

*👉🛑🛑👉नियम पाळणे अनिवार्य :-*

*आपल्या देशात तिरंग्याला खूप मान दिला जातो. देशाचा तिरंगा फडकवणे हे समान ध्वज फडकवण्यासारखे नाही. देशात ध्वजारोहणासाठी अनेक नियम व तत्त्वे आहेत, हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने ध्वजारोहण केले पाहिजे. हर घर तिरंगा मोहिमेसोबतच, गृह मंत्रालयाने भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये सुधारणा केली आहे. राष्ट्रध्वजाच्या प्रदर्शनासाठी सर्व कायदे, अधिवेशने, पद्धती आणि सूचना एकत्र आणण्यासाठी भारतीय ध्वज संहिता लागू करण्यात आली. हे खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी संस्थांमध्ये फडकलेल्या ध्वजांवरही लक्ष ठेवते. 26 जानेवारी 2002 रोजी भारताचा ध्वज संहिता लागू झाली. 30 डिसेंबर 2021 रोजी काही सुधारणा करण्यात आल्या. यात आम्ही तुम्हाला त्या नियमांबद्दल सांगणार आहोत, जे सर्व नागरिकांनी पाळणे अनिवार्य आहे. ध्वज संहिता, 2002 नुसार, भारतीय ध्वज बनवण्याचे नियम आहेत. भारतीय ध्वज कोणत्याही आकारात आणि प्रमाणात डिझाइन करू शकत नाही. संहितेनुसार, राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असावा, त्याचे गुणोत्तर ३:२ असावे.*

*👉🛑🛑👉भारतीय ध्वज संहितेनुसार, भारतीय ध्वजासंदर्भात अनेक नियम आणि तत्त्वे आहेत, जी खालीलप्रमाणे आहेत…*

*♦️♦️जेव्हा तिरंगा दुसऱ्या देशाच्या राष्ट्रध्वजासोबत फडकवला जातो तेव्हा तो दुसऱ्या देशाच्या ध्वजाच्या डावीकडे लावावा. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ध्वजाच्या शेजारी तिरंगा फडकवताना त्याच्या दोन्ही बाजूला फडकता येईल.*

*♦️♦️कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला सलाम करताना भारतीय ध्वज खाली करू नये.*

*♦️♦️तिरंग्याचा वापरय कोणत्याही ड्रेस, रुमाल किंवा गणवेशासाठी करता येणार नाही.*

*♦️♦️ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे नसावीत.*

*♦️♦️कोणताही पुतळा किंवा स्मारक झाकण्यासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही.*

*♦️♦️ध्वज जाणूनबुजून जमिनीला स्पर्श करू नये किंवा पाण्यात बुडवू नये.*

*♦️♦️तिरंगा ध्वज फडकवताना त्याचा भगवा रंग फक्त वरच्या दिशेने असावा याची विशेष काळजी घ्यावी.*

*♦️♦️शाळा, विद्यापीठे आणि गैर-सरकारी संस्थांसाठी नियम आणि तत्त्वे*

*♦️♦️खराब झालेला आणि विस्कटलेला ध्वज अजिबात प्रदर्शित करू नये.*

*♦️♦️ध्वज एकाच ध्वजस्तंभावर इतर कोणत्याही ध्वजासह फडकवू नये.*

*♦️♦️स्पीकरच्या व्यासपीठाजवळ ध्वज फडकवताना ध्वज स्पीकरच्या मागे आणि उंच असावा याची काळजी घ्यावी.*

*♦️♦️कोणत्याही संघटनेच्या किंवा देशाच्या ध्वजासह भारतीय ध्वज फडकवताना तो तिरंग्यापेक्षा उंच आणि मोठा नसावा.*

*♦️♦️ध्वज कोणत्याही प्रकारची सजावट किंवा चिन्ह म्हणून वापरू नये.*

*♦️♦️ध्वज बांधताना त्याची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.*

*♦️♦️राष्ट्रगीतानंतर ध्वज वंदन करावे. या कार्यक्रमादरम्यान, परेड काळजीपूर्वक स्थितीत असावी.*

*♦️♦️सरकारी आणि संरक्षण आस्थापनांवर ध्वजारोहणाची तत्त्वे*

*♦️♦️ध्वज फडकवताना ते स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी आदरपूर्वक फडकावा.*

*♦️♦️ध्वज फडकवताना किंवा उतरवताना बिगुल वाजवला जात असेल, तर बिगुलासह ध्वज खाली आणि उंच करावा, याची विशेष काळजी घ्यावी.*

*♦️♦️जर ध्वज इमारतीच्या किंवा बाल्कनीच्या किंवा खिडकीच्या समोरच्या बाजूस आडवा किंवा तिरपे फडकत असेल तर, ध्वजाचा भगवा रंगाचा भाग मास्टच्या शेवटी असेल जो खिडकीच्या चौकटीपासून, बाल्कनीपासून किंवा समोरील बाजूस सर्वात दूर असेल.*

*♦️♦️जेव्हा ध्वज भिंतीच्या आधाराने तिरपे फडकवला जातो तेव्हा भगवा भाग वरच्या बाजूला असेल आणि जेव्हा तो उभा फडकवला जाईल तेव्हा भगवा भाग ध्वजाच्या उजव्या बाजूला असेल, म्हणजेच तो वर असेल. समोरून ध्वज पाहणाऱ्या व्यक्तीची डावी बाजू.*

*♦️♦️पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी ध्वजाला महत्त्व देऊन स्वतंत्रपणे फडकवले जाईल.*

*♦️♦️मोटारगाडीवर ध्वज एकट्याने फडकवायचा असेल, तर तो कारच्या समोर उजव्या बाजूला घट्ट बसलेल्या कर्मचार्‍यांवर फडकावा.*

*♦️♦️मिरवणुकीत किंवा परेडमध्ये नेल्यावर, ध्वज मिरवणुकीच्या किंवा परेडच्या उजवीकडे असेल, म्हणजे, ध्वजाच्याच उजवीकडे किंवा, जर इतर ध्वजांनी बनलेली एक ओळ असेल तर, राष्ट्रध्वज असेल. त्या ओळीच्या केंद्रापासून दूर.*

*👉🔴🔴👉अशा प्रकारे ध्वज वापरणे चुकीचे मानले जाते…*

*♦️♦️फाटलेला किंवा मातीचा झेंडा फडकवू नये.*

*♦️♦️कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला अभिवादन करण्यासाठी ध्वज खाली करता येणार नाही.*

*♦️♦️ध्वजाचा वापर बंडनवार, रिबन किंवा ध्वज बनवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी केला जाणार नाही.*

*♦️♦️केसरीचा भाग खाली ठेवून ध्वज फडकावू नये.*

*♦️♦️ध्वज जमिनीला किंवा जमिनीला स्पर्श करू देऊ नये किंवा पाण्यात ओढू देऊ नये.*

*♦️♦️राज्य/लष्कर/केंद्रीय निमलष्करी दलांद्वारे केल्या जाणार्‍या अंत्यसंस्कारांशिवाय ध्वजाचा वापर कोणत्याही स्वरूपात केला जाणार नाही.*

*♦️♦️ध्वज कोणत्याही वाहनाच्या, रेल्वेच्या गाडीच्या किंवा बोटीच्या हूडवर, टोकांवर, बाजूने किंवा मागील बाजूस लावला जाऊ नये.*

*♦️♦️ध्वज कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींसाठी वापरला जाणार नाही किंवा ज्या खांबावर ध्वज फडकवला जाईल त्यावर लावला जाऊ नये.*

*👉🟥🟥👉ध्वज संहिता 2002 मध्ये ट्रेन आणि विमानासाठी ध्वज संदर्भात काही नियम आणि तत्त्वे देखील आहेत :-*

*♦️♦️राष्ट्रपती जेव्हा देशांतर्गत विशेष ट्रेनमधून प्रवास करतात तेव्हा ड्रायव्हरच्या केबिनवर ज्या प्लॅटफॉर्मवरून ट्रेन सुटते त्या दिशेने राष्ट्रध्वज फडकावावा. याशिवाय स्पेशल ट्रेन थांबल्यावर किंवा जिथे थांबायची आहे तिथे पोहोचल्यावर राष्ट्रध्वजही फडकावा.*

*♦️♦️परदेश दौऱ्यावर असताना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांच्या विमानावर राष्ट्रध्वज फडकवावा. तसेच, भेट देत असलेल्या देशाचा ध्वज देखील राष्ट्रध्वजासह फडकावला पाहिजे, परंतु जेव्हा विमान कोणत्याही देशात उतरेल तेव्हाच.*

*♦️♦️याशिवाय, सौजन्य आणि सद्भावना म्हणून, त्या देशांचे ध्वज त्याच्या जागी फडकवले जावेत, जेथे विमान उतरावे किंवा थांबावे.*

*♦️♦️राष्ट्रपती जेव्हा देशाच्या दौऱ्यावर जातात तेव्हा राष्ट्रध्वज ज्या विमानातून उतरतो किंवा उतरतो त्या विमानाच्या बाजूला राष्ट्रध्वज फडकवला जातो.*

*♦️♦️या उच्चभ्रू व्यक्ती गरज पडल्यास त्यांच्या गाड्यांवर राष्ट्रध्वज फडकावू शकतात. जेव्हा एखादा विदेशी प्रतिष्ठित व्यक्ती सरकारने उपलब्ध करून दिलेल्या कारमधून प्रवास करतो तेव्हा कारच्या उजव्या बाजूला राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि संबंधित देशाच्या व्यक्तीचा ध्वज कारच्या डाव्या बाजूला फडकलेला असावा.*

कोल्हापुरात दहशतवादी?एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात; कोल्हापुरात खळबळ

कोल्हापूर :- स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच एनआयएने कोल्हापुरात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने कोल्हापुरात तीन ठिकाणी छापेमारी करून तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांचाही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना न सांगता एनआयएने ही कारवाई केली आहे. कोल्हापुरातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तिघांचा नेमका प्लान काय होता? अशी चर्चा आता कोल्हापुरात रंगली आहे.*

*👉🅾️🅾️👉एनआयएने 5 राज्यात 14 ठिकाणी छापेमारी केली आहे. राज्यातही पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. राज्यात कोल्हापूर आणि नाशिकमध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे. एकट्या कोल्हापुरातच तीन ठिकाणी छापे मारले आहेत. कोल्हापुरातील कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरीत एनआयएने छापेमारी केली. पोलिसांना न सांगता अचानक ही छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणी एनआयएने तीनजणांना ताब्यात घेतले आहे. हे तिघे संशयित दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा एनआयएचा संशय आहे.*

error: Content is protected !!