Home Blog Page 122

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

*प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

पुणे, दि. २१ : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार (पीएमआरबीपी), 2024 करिता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्वतःच्या जीवाला धोका असताना अतुलनीय धैर्याची आणि प्रतिकूल नैसर्गिक किंवा मानवनिर्मित परिस्थिती विरुद्ध धाडसाने केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल तसेच स्वतःला किंवा समाजासाठी गंभीर धोक्याच्या वेळी मानसिक शक्ती, तीव्र व शीघ्र बुद्धी आणि समय सूचकता अशी अपवादात्मक कृती करणाऱ्या बालकांना त्यांच्या शौर्यासाठी बाल पुरस्कार दिला जातो. त्याचप्रमाणे खेळ, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती, नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बालकांना सुद्धा हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारासाठी बालक (मुलगा/मुलगी) भारतीय नागरिक आणि त्यांचे वय १८ वर्षेपर्यंत असावे. अर्जदार बालक हा पूर्वी कोणत्याही क्षेत्रातील समान पुरस्कार (मंत्रालयाने यापूर्वी प्रदान केलेल्या अपवादात्मक कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कारासह) मिळालेला नसावा. https://awards.gov.in किंवा www.wcd.nic.in या संकेतस्थळावर पुरस्कारासाठी बालकाचे नामांकन करावे, असे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी श्रीमती मोनिका रंधवे यांनी कळविले आहे.
0000

गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी कार्यवाहीला गती गिरणी कामगार घरांसाठीच्या अर्जांची छाननी 3 महिन्यात पूर्ण करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई,दि. २१:-गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता हौसिंग स्टॉक वाढविण्याची आवश्यकता आहे. रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देतानाच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.*

*👉🟥🟥👉सह्याद्री अतिथीगृह येथे गिरणी कामगारांच्या प्रश्नांसदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार धैर्यशील माने, राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, अतुल भातखळकर, सुनील राणे, प्रकाश आबिटकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश आवाडे, माजी आमदार नरसय्या आडम, मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, गोविंदराज, एमएमआरडीएचे मुख्य नियोजनकार मोहन सोनार यांच्यासह गिरणी कामगारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.*

*👉🅾️🅾️👉मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, गिरणी कामगारांना त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. त्यासाठी कार्यवाहिला गती देण्यात आली असून गेल्या काही महिन्यात दोन टप्प्यात गिरणी कामगारांना सदनिकेची चावी वाटप करण्यात आली आहे. आता पर्यंत सुमारे १ लाख ७४ हजार अर्ज गिरणीकामगार, त्यांच्या वारसांनी म्हाडा कडे केले आहेत. त्याची छाननी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले असून ही छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पात्र- अपात्र संख्या निश्चित होऊ शकेल.*

*👉🅾️🅾️👉कोन-पनवेल येथील घरांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी तसेच ठाणे राजगोळी येथील सदनिकांची दुरुस्ती एमएमआरडीएने तातडीने हाती घ्यावी जेणेकरून त्याठिकाणच्या पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोन पनवेल येथील घरांची सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यास कामगारांना दसऱ्यापर्यंत सदनिकांची चावी देण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.*

*👉🟥🟥👉मुंबईत टेक्स्टाईल मिल म्युझियमचे काम तातडीने सुरू करावे अशा सुचना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. याठिकाणी गिरणी कामगारांच्या मुला-मुलींना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.*

*👉🅾️🅾️👉मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी कल्याण तालुक्यात सुमारे २१ हेक्टर जागा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.*

*👉🟥🟥👉प्रधानमंत्री आवास योजनेतून गिरणी कामगारांना घरे देण्याच्या विकल्पाबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले.त्याचबरोबर सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, सातारा येथील मुळ रहिवासी असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांबाबत त्यांच्या इच्छेनुसार मुंबई बाहेर घरे देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. गेल्या काही महिन्यात गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी ज्या गतिमानपणे कार्यवाही सुरू आहे.त्याबद्दल उपस्थित लोकप्रतिनिधी आणि गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.*

हिमाचल प्रदेशात पुन्हा मुसळधार! देशात ७ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी

हिमाचल प्रदेशात पुन्हा मुसळधार!*देशात ७ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी*

*👉🅾️🅾️👉अतिवृष्टी, भूस्खलन यामुळे उध्वस्त झालेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.विभागाने या सात राज्यांसाठी 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.*

*👉🔴🔴👉हवामान विभागाने हिमाचल आणि उत्तराखंड येथे 115.6 ते 204.4 मि मिमीपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या काळात बाधित भागात पूर आणि भूस्खलनाची शक्यता असल्याचे सांगितले. याशिवाय वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही आठवड्यांत मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.*

*👉🟥🟥👉या राज्यांमध्ये 250 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातही 22 आणि 23 ऑगस्ट रोजी 115.6 ते 204.4 मिमी पर्यंत अतिवृष्टी अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. 4 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. 4 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 21 ते 24 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो.*

*👉🔴🔴👉ईशान्येकडील राज्यांमध्येही जोरदार पाऊस*

*हवामान विभागाने राजस्थानसह इशान्येकडील मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मिझोराममध्येही पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विभागानुसार काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.*

*👉🟥🟥👉केंद्र हिमाचलला देणार 200 कोटी*

*रविवारी केंद्र सरकारने हिमाचल प्रदेशसाठी मदत म्हणून 200 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, केंद्राने 10 आणि 17 जुलै रोजी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या केंद्रीय हिश्श्यातून 360.80 कोटी रुपये आगाऊ मंजूर केले आहेत. तसेच एनडीआरएफच्या 20 तुकड्या, लष्कराच्या 9 तुकड्या आणि हवाई दलाची 3 हेलिकॉप्टर बचाव आणि मदतकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.*

धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक – उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २१ :- धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. यादृष्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या.

राज्यातील धनगर, मेंढपाळ समाजाच्या समस्या सोडवणे तसेच विकासयोजनांच्या अंमलबजावणीबाबत आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार दत्तात्रय भरणे, मेंढपाळ धनगर विकास मंचचे अध्यक्ष संतोष महात्मे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. एच. एस. वसेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे आदींसह वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मेंढपाळ धनगर विकास मंचाच्या वतीने धनगर बांधवांच्या समस्यांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

वाढत्या शहरीकरणामुळे गायरान जमिनी, चराऊ कुरणे आदी क्षेत्र कमी होऊ लागले आहे. चराऊ क्षेत्राची कमतरता ही धनगर समाजाची मोठी समस्या आहे. पावसाळ्यात शेतात पिके असतात आणि चारा उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत मेंढ्यांसाठी अर्धबंदिस्त निवाऱ्याची व्यवस्था प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील. अर्धबंदिस्त निवाऱ्यामुळे मेंढ्यांचं आरोग्य सुधारुन त्यांचं वजन वाढेल. मेंढ्यांच्या उत्तम संकरीत जाती निर्माण करणे शक्य होईल, यादृष्टीनं विचार करण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिला.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 21 : राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना 100 टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषित केली आहे.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत मंत्री श्री. मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास 100 कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती देखील ट्विटर द्वारे दिली आहे.

राज्य सरकारने 06 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून या अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 100 टक्के अनुदान देते.

यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

रतन टाटा उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि 20 :- रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले. ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र शासनाची आणि पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

उद्योग विभागाच्यावतीने देण्यात येणारे ‘उद्योगरत्न’, ‘उद्योग मित्र’, ‘उद्योगिनी’ आणि ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन राज्यपाल श्री. बैस बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांच्यावतीने टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी स्वीकारला. श्री. टाटा यांना काल उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना, उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी महत्त्वाचे ‘उद्योग पुरस्कार’ सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभागाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तरुण राष्ट्र म्हणून भारताला आज अभूतपूर्व अशी संधी आहे. जगातील अनेक विकसित देश त्यांच्या कामगारांचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राने कौशल्य विकास आणि उद्योजकतेला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या पुढील 25 वर्षांच्या औद्योगिक विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यापारी, उद्योगपती आणि विविध चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रमुखांची उच्चाधिकार समिती स्थापन करावी, अशी सूचना त्यांनी केली.

आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली सीरम इन्स्टिट्यूटने ‘कोविशील्ड’ ही लस विकसित करून देशाचा नावलौकिक केला आहे. किर्लोस्कर हे उद्योगक्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. गौरी किर्लोस्कर यांना देण्यात येणारा ‘उद्योगिनी’ पुरस्कार सर्व महिला उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. तर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना दिला जाणारा मराठी उद्योजक पुरस्कार हा महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा पुरस्कार आहे, असे राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी नमूद केले.

रतन टाटा म्हणजे माणसातला देव माणूस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपण कुणीही देव पाहिलेला नाही. पण, देव चराचरात आहे. गरजूंच्या मदतीला देव नेहमी धावतो. यंदाच्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी आपण अशाच एका माणसातल्या देवमाणसाची निवड केली आहे. टाटा म्हणजे अढळ विश्वास, गुणवत्तेची खात्री आणि प्रचंड सामाजिक भान असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

आपण विविध क्षेत्रात विशेष असे योगदान दिलेल्या मान्यवर व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करत असतो. त्याच धर्तीवर उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी आपण उद्योग पुरस्कारांची सुरवात केली असल्याचे ते म्हणाले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या औद्योगिक प्रगतीचं ग्रोथ इंजिन आहे. या ग्रोथ इंजिनाची सगळ्यात मोठी शक्ती उद्योग क्षेत्र आहे. म्हणूनच हे उद्योग पुरस्कार देऊन राज्यातील उद्योग विश्वाचा सन्मान करण्याचे शासनाने ठरविल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगरत्न पुरस्कारासोबतच ‘उद्योग मित्र’, ‘उद्योगिनी’ आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक या चारही सत्कारमुर्तीमधील मोठे साम्य म्हणजे विश्वास हे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आपल्या राज्याला उद्योगपतींच्या अनेक पिढ्यांनी घडविले. अगदी पारतंत्र्यापासून उद्योगांनी या देशासाठी योगदान दिले आहे. आज मोठ्या प्रमाणावर सेवाक्षेत्र, आयटी क्षेत्र राज्यात आणि देशात विकसित झाले आहे. उद्योग क्षेत्राने आजवर अब्जावधी हातांना रोजगार दिला आहे. आपल्याला कृषी आधारित उद्योगांना देखील राज्यात प्रोत्साहन द्यायचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर्सचे योगदान द्यायचे आहे. दावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत आम्ही 1 लाख 37 हजार कोटींचे करार केले. त्यातील 85 टक्के करारांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आज परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर आला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

सर्वोत्कृष्ट मानव संसाधन महाराष्ट्रात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टाटा ट्रस्टने आधुनिक भारताच्या विकासात अमूल्य असे योगदान दिले आहे. जगात पाचव्या क्रमांकावर असलेला टाटा समूह महाराष्ट्रात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र प्रत्यक्ष गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे नमूद करून सर्वोत्कृष्ट मानव संसाधन महाराष्ट्रात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले, देशाचे स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहे. स्टील इंडस्ट्रीत गुंतवणूक वाढत आहे, भविष्यातील ‘स्टील सिटी’ म्हणून गडचिरोली नावारूपाला येत आहे. ट्रीलियन इकॉनॉमीची वाटचाल करताना शासन सर्व विभागांना सोबत घेऊन पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टाटा ट्रस्ट सेवाभावी संस्था – उपमुख्यमंत्री अजित पवार

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव पुढे नेण्याचे काम हे राज्य शासन करीत आहे. टाटा ट्रस्ट ही एक सेवाभावी संस्था आहे. राज्याच्या इतिहासात उद्योग क्षेत्रातील पहिला पुरस्कार रतन टाटा यांना दिला याची नोंद ठेवली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन करून आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नवीन पिढीने उज्ज्वल काम केले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.

प्रास्ताविकात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुरस्कार सुरू करण्यामागची भूमिका विषद केली. त्यांनी उद्योग मित्र व रोजगार मित्र हे नाविन्यपूर्ण प्रकल्प तसेच उद्योग मित्र व्हॅनबाबत माहिती दिली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले की, उद्योजकांना पुरस्कार हा राज्य शासनाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र हे देशातील उद्योगात अग्रेसर असलेले राज्य आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि उद्योगाच्या बाबत दूरदृष्टी असणारे राज्य म्हणूनही ओळखले जाते. श्री.पुनावाला म्हणाले, सिरम इन्स्टिट्यूट ही देशाची, महाराष्ट्राची संस्था आहे. कोविड काळात 90 टक्के लस महाराष्ट्राने पुरविली. महाराष्ट्राची कार्य संस्कृती वेगळी आहे, त्यामुळे यापुढेही आपण महाराष्ट्रातच उद्योगाला प्राधान्य देऊ. हा पुरस्कार राज्य, देश तसेच सिरम इन्स्टिट्यूट मधील कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार असल्याचे त्यांनी सांगितले. गौरी किर्लोस्कर यांनी उद्योग क्षेत्रात महिलांसाठी समान संधी निर्माण केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले. उद्योग क्षेत्रातील आजोबा व वडिलांचे योगदानाचा उल्लेख करताना भारताच्या निर्माणशक्तीवर त्यांचा विश्वास होता, असेही त्या म्हणाल्या. श्री.शिंदे म्हणाले, मी एक शेतकरी असून शासनाने मराठी उद्योजक पुरस्कार दिल्यामुळे यापुढे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळण्याकडे वाटचाल सुरू झाली, असे म्हणावे लागेल. शेतकऱ्यांनी एकीने शेती केली तर शेतीत निश्चितच बदल घडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम योजनेंतर्गत यशस्वी उद्योजकांच्या यशकथांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भुरे यांनी तर आभार डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मानले.

सुरक्षा दलाची पुलवामामध्ये मोठी कारवाई! कमांडरसह एक दहशतवादी ठार

img 20230821 wa0016
सुरक्षा दलाची पुलवामामध्ये मोठी कारवाई! 👉🟥🟥👉कमांडरसह एक दहशतवादी ठार*

*👉🅾️🅾️👉जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या हाती मोठे यश आले आहे. याचे कारण म्हणजे सोमवारी सकाळी पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर असल्याचे ही वृत्त हाती येत आहे. याच बरोबर परिसरात सुरक्षा दलातर्फे शोधमोहीम सुरू आहे. पुलवामाच्या लारो-परिगाम भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला हे यश मिळाले आहे.*

*👉🅾️🅾️👉नुकताच 7 ऑगस्ट रोजी सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यादरम्यान सुरक्षा दलांनी हिजबुलच्या एका टॉप कमांडरचा खात्माही केला होता.कमांडरच्या मृतदेहा मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आली होती. तर त्याच्या अंगरक्षकाचा मृतदेह मिळू शकलेला नाही आहे.*

*👉🔴🔴👉जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला होता. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी 5 ऑगस्ट रोजी ही कारवाई सुरू केली होती.*

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 21 अगस्त 2023 दिन – सोमवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 21 अगस्त 2023
दिन – सोमवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – श्रावण*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – पंचमी रात्रि 02:00 तक तत्पश्चात षष्ठी*
*⛅नक्षत्र – चित्रा पूर्ण रात्रि तक*
*⛅योग – शुभ रात्रि 10:21 तक तत्पश्चात शुक्ल*
*⛅राहु काल – सुबह 07:54 से 09:30 तक*
*⛅सूर्योदय – 06:18*
*⛅सूर्यास्त – 07:07*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:49 से 05:33 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:21 से 01:05 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – नागपंचमी*
*⛅विशेष – पंचमी को बेल खाने से कलंक लगता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 नागपंचमी : 21 अगस्त 2023 🌹*

*🌹 श्रावण शुक्ल पंचमी को नागपंचमी का पर्व मनाया जाता है । यह नागों की पूजा का पर्व है । मनुष्यों और नागों का संबंध पौराणिक कथाओं से झलकता रहा है । शेषनाग के सहस्र फनों पर पृथ्वी टिकी है, भगवान विष्णु क्षीरसागर में शेषशैय्या पर सोते हैं, शिवजी के गले में सर्पों के हार हैं, कृष्ण जन्म पर नाग की सहायता से ही वसुदेवजी ने यमुना पार की थी । जनमेजय ने पिता परीक्षित की मृत्यु का बदला लेने हेतु सर्पों का नाश करने वाला जो सर्पयज्ञ आरम्भ किया था, वह आस्तीक मुनि के कहने पर इसी पंचमी के दिन बंद किया गया था । यहाँ तक कि समुद्र-मंथन के समय देवताओं की भी मदद वासुकि नाग ने की थी । अतः नाग देवता के प्रति कृतज्ञता व्यक्त करने का दिन है – नागपंचमी ।*

*🌹श्रावण मास में ही क्यों मनाते हैं नागपंचमी ? 🌹*

*🌹 वर्षा ऋतु में वर्षा का जल धीरे-धीरे धरती में समाकर साँपों के बिलों में भर जाता है । अतः श्रावण मास के काल में साँप सुरक्षित स्थान की खोज में बाहर निकलते हैं । सम्भवतः उस समय उनकी रक्षा करने हेतु एवं सर्पभय व सर्पविष से मुक्ति के लिए हमारी भारतीय संस्कृति में इस दिन नागपूजन, उपवास आदि की परम्परा रही है ।*

*🌹 सर्प हैं खेतों के ʹक्षेत्रपालʹ 🌹*

*🌹 भारत देश कृषिप्रधान देश है । साँप खेती का रक्षण करते हैं, इसलिए उसे ʹक्षेत्रपालʹ कहते हैं । जीव-जंतु, चूहे आदि जो फसल का नुकसान करने वाले तत्त्व हैं, उनका नाश करके साँप हमारे खेतों को हराभरा रखते हैं । इस तरह साँप मानवजाति की पोषण व्यवस्था का रक्षण करते हैं । ऐसे रक्षक की हम नागपंचमी को पूजा करते हैं ।*

*🌹 कैसे मनाते हैं नागपंचमी ? 🌹*

*🔸इस दिन कुछ लोग उपवास करते हैं । नागपूजन के लिए दरवाजे के दोनों ओर गोबर या गेरुआ या लेपन (पिसे हुए चावल व हल्दी का गीला लेप) से नाग बनाया जाता है । कहीं-कहीं मूँज की रस्सी में 7 गाँठें लगाकर उसे साँप का आकार देते हैं। पटरे या जमीन को गोबर से लीपकर, उस पर साँप का चित्र बना के पूजा की जाती है । गंध, पुष्प, कच्चा दूध, खीर, भीगे चने, लावा आदि से नागपूजा होती है । जहाँ साँप की बाँबी दिखे, वहाँ कच्चा दूध और लावा चढ़ाया जाता है । इस दिन सर्पदर्शन बहुत शुभ माना जाता है ।*

*🔸नागपूजन करते समय इन 12 प्रसिद्ध नागों के नाम लिये जाते हैं – धृतराष्ट्र, कर्कोटक, अश्वतर, शंखपाल, पद्म, कम्बल, अनंत, शेष, वासुकि, पिंगल, तक्षक, कालिय और इनसे अपने परिवार की रक्षा हेतु प्रार्थना की जाती है । इस दिन सूर्यास्त के बाद जमीन खोदना निषिद्ध है ।*

*🌹 नागपंचमी का सदभावना संदेश 🌹*

*🌹 यह उत्सव प्रकृति-प्रेम को उजागर करता है । हमारी भारतीय संस्कृति हिंसक प्राणियों में भी अपना आत्मदेव निहारकर सदभाव रखने की प्रेरणा देती है । नागपंचमी का यह उत्सव नागों की पूजा तथा स्तुति द्वारा नागों के प्रति नफरत व भय को आत्मिक प्रेम व निर्भयता में परिणत करने का संदेश देता है ।*

*🌹 काल सर्प योग विशेष 🌹*

*🌹 नाग पंचमी के दिन, जिन को काल सर्प योग है, वे शांति के लिए ये उपाय करें । पंचमी के दिन पीपल के नीचे, एक कटोरी में कच्चा दूध रख दीजिये, घी का दीप जलाएं, कच्चा आटा, घी और गुड़ मिला कर एक छोटा लड्डू बना के रख दें और ये मंत्र बोल कर प्रार्थना करें :-*

*🌹 ॐ अनंताय नमः*
*🌹 ॐ वासुकाय नमः*
*🌹 ॐ शंख पालाय नमः*
*🌹 ॐ तक्षकाय नमः*
*🌹 ॐ कर्कोटकाय नमः*
*🌹 ॐ धनंजयाय नमः*
*🌹 ॐ ऐरावताय नमः*
*🌹 ॐ मणि भद्राय नमः*
*🌹 ॐ धृतराष्ट्राय नमः*
*🌹 ॐ कालियाये नमः*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

error: Content is protected !!