चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
संपादकीय,
इंदापूर: येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.फार्मसी च्या विद्यार्थिनी सुप्रिया पांढरे आणि राजनंदिनी गंगावणे यांनी प्रभावीपणे पार पाडले.
कार्यक्रमात सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर प्रा. स्वप्निल पाटील सर यांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असून समानतेसाठी ते अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. पुढे प्रा. किरण सातपुते सर यांनी विद्यार्थ्यांना महान व्यक्तींचे विचार आचरणात आणण्याचे, शिक्षण, कष्ट व प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवण्याचे तसेच समतामूलक समाज घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यानंतर प्रा. अस्मिता चव्हाण मॅडम यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवास व संघर्षाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अकॅडमिक डीन प्रा. गीतांजली कांबळे मॅडम यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, या दोन्ही महान व्यक्तींचा समान उद्देश म्हणजे शिक्षणाचा प्रसार हा होता.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, आपण सर्वांनी या महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करून त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रथम वर्ष बी.फार्मसी विद्यार्थिनी वेदिका शिंदे हिने केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सोशल अँड एक्स्टेंशन अॅक्टिव्हिटी विभागामार्फत करण्यात आले असून या विभागाचे प्रभारी प्रा. किरण सातपुते आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सामाजिक सहभागाच्या दृष्टीने NSS संबंधित उपक्रमांचाही समावेश करण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन भविष्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.