Home शैक्षणिक चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया मध्ये अविष्कार स्पर्धेचे आयोजन

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया मध्ये अविष्कार स्पर्धेचे आयोजन

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया मध्ये अविष्कार स्पर्धेचे आयोजन

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया मध्ये अविष्कार स्पर्धेचे आयोजन

संपादक:-

मंगळवार दि. ०४ नोव्हेंबर रोजी, चेतना फाऊंडेशन चेतना फार्मसी कॉलेज इंदापूर मध्ये , विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संशोधन क्षमतेचे प्रदर्शन करत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ” आयोजित महाविद्यालयीन स्तर अविष्कार स्पर्धा अयोजित केले होते. या स्पर्धेतून महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची “विद्यापीठस्तरीय अविष्कार-२०२५” स्पर्धेसाठी निवड झाली.

 

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सांगितले की, “संशोधन हेच नावीन्य आणि प्रगतीचे मूळ आहे; विद्यार्थी अशा स्पर्धांद्वारे जागतिक दर्जाचे संशोधक बनतील, असा विश्वास आहे.”या यशामुळे महाविद्यालयाने विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करेल असे म्हणाले.

दिवसेंदिवस होणाऱ्या नवनवीन संशोधनांमुळे राष्ट्र उभारणीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले जात आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारे देखील संशोधनासाठी विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहेत. या स्पर्धामध्ये विविध प्रकारच्या संशोधनांसाठी सहा प्रमुख श्रेणी तयार करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये मानवता, भाषा आणि ललित कला; वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा; शुद्ध विज्ञान; कृषी आणि पशुसंवर्धन; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान; तसेच औषध आणि फार्मसी यांचा समावेश होता. चेतना महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच औषध आणि फार्मसी या श्रेणींसाठी पुढील फेरीसाठी निवड झाली, ही महाविद्यालयासाठी एक अभिमानाची बाब ठरली.

चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

 

स्पर्धाचे आयोजन प्रा. अनिकेत सुर्वे, प्रा. शिवानी भापकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!