Home Blog Page 326

घातकि मित्र

*घातकी मित्र*
जाणीवपूर्वक आपल्याला टाळणारी व्यक्ती कितीही जवळची असली, तरी ती शत्रुपेक्षा जास्त घातक असते. आपण ज्यांना जवळचे समजतो, त्याच व्यक्तीच्या आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आपण ज्यांना जवळचे समजतो त्यांच्या मनात आपल्याबद्दल किती जवळीक आहे ? हे प्रसंगावरून आणि अनुभवावरून समजते, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
आपण ज्यांना जवळचे समजतो, त्यांच्यावर आपला विश्वास असतो, परंतु ही जवळची वाटणारी माणसे कधीकधी विरंगुळा म्हणून आपला वापर करत असतात. त्यांना आपण टाईमपास म्हणून हवे असतो, हे आपल्याला लवकर समजत नाही. कधीकधी त्यांना आपली गरज असते, त्या काळापुरते ती आपल्याला जवळ करतात.
आपले अंतःकरण प्रेमळ आणि उदार असेल, तर आपल्याला सगळीच माणसे जवळची वाटतात. हा दैवी गुण आहे, यात गैर काहीच नाही, परंतु अशा माणसांनी अखंड सावधान असले पाहिजे. ज्यांच्यावर विश्वास टाकला, ती माणसे विश्वासास पात्र नसतील, तर आपले प्रचंड नुकसान करू शकतात, जे कशानेही भरून येऊ शकत नाही कारण ही माणसे आपला विश्वासघात करत असतात.
आपल्या चुकीमुळे किंवा अकार्यक्षमतेमुळे किंवा अपुऱ्या क्षमतेमुळे आपल्या जीवनात येणारा तोटा, हा सहन करण्यासारखा असतो कारण त्याला आपण स्वतः जबाबदार असतो, परंतु विश्वासघातामुळे होणारा तोटा आपल्याला सहन करण्याच्या पलिकडे असतो कारण याची मानसिक तयारी आपण कधी केलेली नसते. जो विश्वासघात करतो त्याच्या हातात या तोट्याचे माप असते, म्हणून आपल्या शत्रूपेक्षा हा जास्त घातक असतो.
पद, प्रतिष्ठा, वैभव, गर्व, अहंकार, घमेंड या गोष्टी माणसाला जवळच्या माणसापासून खुप दूर घेउन जातात. अशा गोष्टी धारण करणारी माणसे कायम आपल्या तोऱ्यात आणि घमेंडीत असतात. ही कधीच कोणाचे खरे मित्र नसतात, यांना फक्त स्तुती करणारे भाट हवे असतात आणि अशा भाटांचा शोध ते नेहमी जवळच्या माणसात शोधतात. मग त्यातून पहिला क्रम मित्राचा लागतो, हा खरेतर मैत्री आणि मित्रत्व याचा अंत्यविधी असतो.
आपल्याला जाणीवपूर्वक टाळणाऱ्या आणि आपला फक्त वापर करणाऱ्या गोडबोल्या मित्रापासून शत्रुपेक्षा जास्त कायम सावध असावे.
*शत्रु समोरून वार करतो परंतु असा घातकी मित्र नेहमी पाठीमागून वार करतो आणि तो आपल्यासाठी निर्णायक असतो.*
अशा घातकी मित्रांनी अनेक चांगल्या माणसांचा घात केल्याचा इतिहास आहे. देशासाठी लढणाऱ्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा ठावठिकाणा चार पैशासाठी अशा घातकी मित्रांनीच इंग्रजांना दिलेला आहे.
राजे शहाजी जिंजीला वेढा देऊन प्राणपणाने लढत होते. जवळचा मित्र असलेला आदिलशाहीतील सरदार खान मोहम्मद खान यांनीच बाजी घोरपडे करावी शहाजी राजांना कैद केले होते.
*इतिहास साक्षी आहे, मित्र खरा असला तर आपल्यासाठी स्वतःचा प्राणही देऊ शकतो आणि मित्र खोटा व नाटकी असला तर आपला जीवही घेऊ शकतो.*
*आयुष्यात मित्र कमी असले तरी चालतील, अगदी एक असला तरी चालेल, पण तो खरा असावा.*
हा सुद्धा नशिबाचाच भाग आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त पुण्‍याच्‍या आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रा

नमोन्यूजनेशन :-

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त पुण्‍याच्‍या आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रा

पुणे, दिनांक 12- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ येथील आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रेने (हेरिटेज वॉक )करण्‍यात आला. हरियाणा सरकारच्‍या आर्थिक आयोगाचे सल्‍लागार मदन मोहन गोयल, आमदार तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय पुरातत्‍व विभागाचे राजेंद्र यादव, राजेश पांडे, नेहरु युवा केंद्राचे यशवंत मानखेडकर, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, माजी आमदार जगदीश मुळीक, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, नीलम महाजन आदी उपस्थित होते.

भारतीय पुरातत्‍व विभाग, सांस्‍कृतिक मंत्रालय, नेहरु युवा केंद्र, राष्‍ट्रीय सेवा योजना, जिल्‍हाधिकारी कार्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ पदयात्रेचे आयोजन करण्‍यात आले होते. पदयात्रा आगाखान पॅलेस, शांतीनगर चौक, एअरपोर्ट रोड (अंडरग्राऊंड ब्रीज), मोरिगा शॉपी, हयात हॉटेल, नगर रोड, आगाखान पॅलेस या मार्गावरुन काढण्‍यात आली. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्‍यात आले होते. प्रारंभी नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी प्रास्‍ताविक केले.

हरियाणा सरकारच्‍या आर्थिक आयोगाचे सल्‍लागार मदन मोहन गोयल यांनी देशाला राजकीय स्‍वातंत्र्य मिळाले तथापि, प्रत्‍येकाला आर्थिक स्‍वातंत्र्य मिळण्‍याची गरज प्रतिपादन केली. स्‍वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शहिदांना त्‍यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी आमदार तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सर्वांना शुभेच्‍छा देवून भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्‍याचे आवाहन केले. पदयात्रेत राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

भारतीय जनता युवामोर्चा महाराष्ट्र च्या आंदोलनाला यश.

पुणे –
भारतीय जनता युवामोर्चा चा  एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश…

काल विद्यार्थ्यांची परीक्षा ठरलेल्या वेळी घेण्यात यावी या विषयासाठी पुणे येथे उग्र आंदोलन करण्यात आले …या विषयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी लढाई लढत असताना सरकारने आम्हाला अटक करून गोपीचंद जी पडळकर तसेच आमच्या सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत.

# पण अखेर सरकार ला नमावे लागले…
या आंदोलनामुळे सरकारला पुढे ढकललेल्या एमपीएससी परीक्षा त्वरित घेण्यासाठी निर्णय करावा लागला आणि 21 मार्चला या परीक्षा घेतल्या जातील असा निर्णय तातडीने जाहीर करावा लागला आहे.

जर 21 मार्चला परीक्षा झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी पुढील आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चा ताकतीने सहभागी होईल…

विक्रांत बाळासाहेब पाटील
प्रदेश अध्यक्ष
भारतीय जनता युवा मोर्चा

मा. विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांची पत्रकार परिषद कौन्सिल हॉल ,दिनांक १२.०३.२१.

मा. विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांची पत्रकार परिषद कौन्सिल हॉल ,दिनांक १२.०३.२१.

नमोन्यूजनेशन :- रामवर्मा आसबे

वेबसाईटवर डिझाईन चे शिक्षण आता आपल्या मोबाईल वर

वेबसाईटवर डिझाईन चे शिक्षण आता आपल्या मोबाईल वर

महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदाच वेबसाईटवर बनवण्याचे शिक्षण आँनलाइन व आपल्या मोबाईल वरति व कमित कमि खर्च , कमीतकमी वेळेमध्ये व खुपच कमि व माफक आशा फि मध्ये

संपर्क
डिजिटल पुष्कराज
मो. नं 091680 90365

बाभुळगाव चे युवा उद्योजक राजाभाऊ इंगळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाभुळगाव चे युवा उद्योजक राजाभाऊ इंगळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

नमोन्यूजनेशन

राम मंदिरासाठी जमा झाला २.५ हजार कोटींचा निधी!घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं आता बंद

नमोन्यूजनेशन
*👉👉राम मंदिरासाठी जमा झाला २.५ हजार कोटींचा निधी!👉घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं आता बंद*

*अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोमाने काम सुरू असून राम मंदिराच्या उभारणीसाठी भारतभरातून जनतेकडून देणगी देखील स्वीकारल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर आता अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यासोबतच, आत्तापर्यंत राम मंदिरासाठी अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.*

*👉३ वर्षांत मंदिर तयार होणार*

*राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात एएनआयशी बोलताना माहिती दिली आहे. ते म्हणाले, “राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली आहे. लोकांना जर देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी. त्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईटवर ते जाऊ शकतात. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पण येत्या ३ वर्षांमध्ये राम मंदिराची उभारणी पूर्ण होईल.”*

*👉४ मार्चपर्यंत अडीच हजार कोटींचा निधी!*

*दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणगीची रक्कम अडीच हजार कोटींपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे. “४ मार्चपर्यंत बँकांमध्ये जमा झालेल्या चेकनुसार राम मंदिरासाठी सुमारे अडीच हजार कोटींची देणगी जमा झालेली आहे”, असं विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आल्याचं एएनआयने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.*

Farmers Friends and Fellow Consumers:

Farmers Friends and Fellow Consumers:
*रासायनिक शेतीचे दुष्परीणाम*
➖➖➖➖➖➖➖
1) जर्मन रसायनशास्त्रज्ञ “जस्टस लेबिग” यांनी नत्र,
स्फुरद आणि पालाश (NPK), या त्रिसूत्रीचा
शोध लावला.
2) सन 1905 मध्ये “ फ्रिट्‌झ हेबर” या
शास्त्रज्ञाने,हवेतील नायट्रोजनपासून
अमोनिया वायू तयार केला.
2) 1915 मध्ये “कार्ल बॉश” या शास्त्रज्ञाने,
कृत्रिम अमोनिया तयार केला.
त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात,
“कैसरच्या” लढाईमध्ये सुमारे आठ लाख
लोकांचा बळी घेतला.
युद्ध संपल्यावर, मग पिकाची वाढ
करण्यासाठी,तो शेतकऱ्यांना पुरवायला सुरवात
झाली.
नंतर पुन्हा “आय. जी. फ्राबेन” या कंपनीने,
दुसऱ्या महायुद्धात, लोकांना मारण्यासाठी,
मोठ्या प्रमाणावर “अमोनियाची” निर्मिती केली.
3) महायुद्धाच्या शेवटी, या वायूची निर्मिती करणाऱ्या
अमेरिकन कंपन्यांचा, हा अमोनिया, तसेच
युद्धभूमीवर, डास, माश्‍या, चिलटे मारण्यासाठी
तयार केलेली डी.डी.टी.,शेतीकडेच वळविण्यात
आली.
रासायनिक खतांनी, रोगप्रतिकारक शक्ती कमी
झालेल्या पिकांवर, नवनवीन किडींचा प्रादुर्भाव
वाढू लागला.
या किडींच्या नियंत्रणासाठी, क्‍लोरडेन, डेल्ड्रीन,
एन्ड्रीन, पॅराथिऑन, मॅलेथिऑन, यांसारख्या,
कीडनाशकांची निर्मिती झाली.
खते, कीडनाशके, बियाणे, अवजारे, तणनाशके ही आधुनिक शेतीची तंत्रे होती.
ही तंत्रे शेतकऱ्याने स्वीकारण्यासाठी, अधिक उत्पादनाचे आमिष दाखविण्यात आले.
सुरवातीला या तंत्राचे परिणामही तसेच होते.
त्यामुळे शेतकरी ते स्वीकारू लागले.
त्यासाठी शेतकरी बॅंका व या तंत्रांचे उत्पादक, यांच्याकडून कर्जही स्वीकारू लागले.

अनुदान-कर्जामध्ये गुंतली शेती.
आधुनिक तंत्रे, अनुदान, कर्ज यांनी, अमेरिकन शेतकरी, सरकार यांच्यावर, जणू ताबा मिळविला. त्यानंतर कंपन्यांची दृष्टी, अधिक फायद्यासाठी, तिसऱ्या जगाकडे वळली.
जागतिक बॅंक व अमेरिकी सरकारने, ही तंत्रे स्वीकारण्यासाठी, भारतावर दडपण आणले. त्यासाठी प्रचंड पैसा पुरविण्यात आला.
त्याच सुमारास, भारतात दुष्काळाने थैमान घातल्याने, भारत सरकारने, जनतेचे पोट भरण्यासाठी,
या सर्वांचा स्वीकार केला.
1) अनुदान, कर्ज या आकर्षक वेष्टनांतून आलेल्या कीडनाशकांचा, भारतातील वापर, झपाट्याने वाढू लागला.
1966 पासून 1978 पर्यंतच्या अवघ्या 12 वर्षांत, रासायनिक खतांचा वापर, एक दशलक्ष टनांपासून 50 दशलक्ष टनांपर्यंत वाढला.
2) हेक्‍टरी खतांचे प्रमाण 3.5 किलोपासून 50 किलोपर्यंत वाढले.
नंतर 1950 पासून 2001-02 मध्ये हे प्रमाण 170 पटींनी वाढले.
3) रासायनिक कीडनाशकांच्या वापराचे प्रमाण, 1971 ते 1994-95 पर्यंत, 100 टक्‍क्‍यांनी वाढले. या वाढत्या खर्चाबरोबर, दुर्दैवाने, शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये, तेवढी वाढ झाली नाही.
अतिप्रमाणात वापरलेली रासायनिक खते, कीडनाशकांनी नापीक झालेली जमीन आणि शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा, ही मुख्य कारणे यामागे आहेत.
4) 1977 मध्ये कर्नाटकमधील “मालनाड” येथे घडलेली घटना “हंडी सिंड्रोम’ या नावाने प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात, भातासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशके वापरली जात.
पिकावर फवारलेली कीडनाशके, पाण्याबरोबर खालच्या शेतांमध्ये जात होती.
या शेतांमधील खेकडे खाल्ल्याने, सुमारे 200 मजुरांना, “पॅरालिसीस” दिसून आला.
खेकड्यांच्या शरीरात, भातासाठी वापरलेल्या कीडनाशकांचे, अंश सापडले.
असे खेकडे या मजुरांनी खाल्ल्यामुळे,
त्यांच्यावर हा परिणाम झाला होता.
5) जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे, माणसाच्या शरीरात, जास्तीत जास्त, 1.25 पीपीएम एवढ्या प्रमाणात, डी.डी.टी.चे अंश सापडले, तर फारसा त्रास होत नाही.
पण दिल्लीमध्ये केलेल्या चाचणीत, या शहरातील नागरिकांच्या चरबीमध्ये, सुमारे 20 पीपीएम एवढे डी.डी.टी.चे अंश सापडल्याचा अहवाल,
“डाऊन टू अर्थ’ या मासिकात प्रसिद्ध झाला.
6) पंजाबमध्ये हरितक्रांतीचा उच्चांक साधला गेला. आज पंजाबमधील, “भटिंडा” जिल्ह्यातून, “गंगानगर” येथील, कर्करोगावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये, उपचारासाठी कर्करोगाने आजारी रुग्ण, रोज एक रेल्वेगाडी भरून जातात.
दुर्दैवी गाडीचे नावच लोकांनी “कॅन्सर एक्‍स्प्रेस’
असे ठेवले आहे.
☄☄☄☄☄☄☄
तर माझ्या शेतकरी बांधवानो!
आज आपणां सर्वाना गरज आहे,
ती फक्त नैसर्गिक शेतीची व नैसर्गिक खतांचीच….!
आणि
ग्राहक मित्रहो! अशा प्रकारच्या उत्पादनासाठी, तुमच्या आरोग्यासाठी,
अधिक किंमत देऊन, थेट शेतकर्यांकडून विकत घ्या

रामवर्मा आसबे

Namonewsnation.in

error: Content is protected !!