Home Blog Page 277

*एका भाल्याचा प्रवास.* विनीत वर्तक

*एका भाल्याचा प्रवास.*
@विनीत वर्तक ©*
🥇®️🥇®️🥇®️🥇®️🥇®️🥇
७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलम्पिक मधे सुभेदार नीरज चोप्रा ने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून भारताला ऑलम्पिक च्या इतिहासात मैदानी खेळात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. १२१ वर्ष एक स्वप्न जे भारतीयांनी आणि भारताचे दिग्गज मैदानी खेळाडू मिल्खा सिंग आणि पी.टी. उषा यांनी बघितलेलं होतं ते काल प्रत्यक्षात साकार झालं. नीरज ने त्या स्वप्नांचा मान ठेवताना आपलं पदक स्वर्गीय मिल्खा सिंग यांना समर्पित असल्याचं सांगून एक आदरांजली भारताच्या एका सर्वश्रेष्ठ खेळाडूला वाहिली. कालच त्याच यश किती महत्वाचं आहे असेल याचा अंदाज कदाचित पी.टी.उषा यांना आला असेल ज्याचं पदक १९८४ च्या लॉस अँजेलिस ऑलम्पिक मधे अक्षरशः १ शतांश सेकंदांनी हुकलं होतं. त्या क्षणापासून गेल्या ३५ वर्षापेक्षा जास्त काळात त्या स्वतः आणि भारतीय नागरिक ऑलम्पिक पदकाचं एक स्वप्न बघत होते ज्याची पूर्तता काल नीरज ने आपल्या भाल्या ने केली. नक्कीच ही वेळ आनंद साजरा करायची आहे. नक्कीच ही वेळ नीरज च्या कामगिरीचं कौतुक करण्याची आहे. पण त्याच वेळी ही वेळ त्या भाल्याचा प्रवास समजून घेण्याची सुद्धा आहे.

नीरज चोप्रा च्या भाल्याचा हा प्रवास सुरु होतो हरयाणा राज्यातील पानिपत जवळ असणाऱ्या खंडारा या गावापासून. साधारण ५०० लोकवस्ती असणाऱ्या या गावात नीरज च बालपण गेलं. अवघ्या १२ व्या वर्षी नीरज च वजन ९० किलोग्रॅम इतकं आभाळाला टेकलं होतं. त्याच्या स्थूलतेमुळे तो गावातील चेष्टेचा विषय बनत चालला होता आणि हेच कुठेतरी त्याच्या आई-वडिलांना खटकत होतं. त्यांनी छोट्या नीरज ला जिम मधे जाऊन व्यायाम करून वजन कमी करण्याचा सल्ला दिला. पण अवघी ५०० लोकवस्ती असणाऱ्या गावात कुठून आली जिम? नीरज जिम साठी ६ किलोमीटर लांब जिम मधे जायला लागला. तिकडेही आपल्या अवाढव्य वजनामुळे त्याची चेष्टा झाली आणि वजन कमी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि वजने ही त्याला मिळत नव्हती. शेवटी कुटुंबाने त्याला स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या पानिपत इथल्या सेंटर मधे जायला सांगितलं. इकडेच त्याची ओळख भाला फेक शिकवणाऱ्या जयवीर सिंग यांच्याशी झाली. कोणतंही प्रशिक्षण नसताना नीरज ने ४० मीटर भाला फेकून जयवीर सिंग यांच्यावर आपल्यातील प्रतिभेचा ठसा उमटवला. तिकडेच सुरु झाला एका भल्याचा प्रवास….

नीरज ने मग मागे वळून बघितलं नाही. आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीवर त्याने मेहनत घ्यायला सुरवात केली आणि भाला फेक या खेळाचे प्राथमिक धडे घ्यायला सुरवात केली. २०१६ मधे पोलंड इकडे झालेल्या अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावलं आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा तारा उदयास येत असल्याची वर्दी दिली. त्याच वर्षी साऊथ एशियन स्पर्धेत सुवर्ण पदक त्याने पटकावलं. १५ मे २०१६ रोजी त्याने भारतीय सेनेत प्रवेश केला. २०१७ साली एशियन एथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदकाला गवसणी घातली. नीरज ने जागतिक मंचावर आपल्या येण्याची वर्दी दिली. नोव्हेंबर २०१७ मधे भारत सरकारने भाला फेक स्पर्धेत उदयोन्मुख खेळाडूंसाठी २०२० साली होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेच महत्व लक्षात घेऊन त्यांना जागतिक दर्जाचे कोच नेमण्याच ठरवलं. त्यांच नाव होतं ‘उवे हान’.

‘उवे हान’ हे नाव भाला फेक स्पर्धेत अतिशय मानाने घेतलं जाते. जर्मन असणाऱ्या हान नी या खेळात असा पराक्रम गाजवला आहे जो आजवर कोणालाही गाठता आलेला नाही. २० जुलै १९८४ रोजी हान यांनी तब्बल १०४.८० मीटर लांब भाला फेकून जागतिक विक्रम केलेला आहे जो कोणालाही आजवर मोडता आलेला नाही. किंबहुना जगाच्या पाठीवर १०० मीटर पेक्षा जास्त दूरवर भाला फेक करणारा अजून दुसरा कोणताही खेळाडू नाही. त्यामुळेच अश्या दिग्गज खेळाडू ची कोच म्हणून भारतीय सरकारने ३ वर्षासाठी नेमणूक केली. नीरज चोप्रा च्या यशाचा आलेख हान यांच्या हाताखाली अतिशय वेगाने वाढला. नीरज सोबत अन्नू राणी, शिवपाल सिंग, रोहित यादव या सर्व खेळाडूंच्या कामगिरीत फरक पडला. नीरज ने २०१८ च्या एशियन आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. पण कदाचित जे भारतीय क्रिकेट संघाच्या बाबतीत ग्रेग चॅपल हे प्रकरण घडलं अगदी तसेच हान यांच्या बाबतीत घडलं. २०२० मधे त्यांचा करार संपता संपता हान आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया चे वाद चव्हाट्यावर आले. मानधना वरून हान यांनी भारताच्या एकूणच सिस्टीम बद्दल नापसंती व्यक्त केली तसेच खेळाडूंना योग्य मदत मिळत नसल्याचं उघडपणे स्पष्ट केलं तर तिकडे त्यांच्या हाताखाली तयार होणाऱ्या खेळाडूंनी हान हे पैश्यासाठी कोरोना काळात विदेशी खेळाडूंना शिकवत असल्याचं तसेच आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट केलं. नीरज ने ही याबाबतीत ट्विट करत भारत सरकारची बाजू उचलून धरली. हान यांनी ऑलम्पिक स्पर्धेच्या आधी नीरज वर झालेल्या खांद्याच्या शस्त्रक्रियेवर ही तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तर तिकडे नीरज ने यामुळे आपल्या खांद्याला जीवनदान मिळाल्याचं म्हंटल होतं. या वादात कोण बरोबर कोण चुकीचं यात मला जायचं नाही. पण एकूणच या सर्व गोष्टींचा परीणाम नीरज चोप्रा सारख्या खेळाडूंच्या खेळावर होणं हे अपेक्षित होतं.

अंत्यंत महत्वाच्या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर सुद्धा नीरज ने आपल्या ऑलम्पिक तयारीकडे लक्ष केंद्रित केलं. कोच आणि फेडरेशन च्या वादात न पडता त्याने शांतपणे जे त्याला हान यांच्याकडून शिकायला मिळालं त्यावर मेहनत घ्यायला सुरवात केली. भाला फेक स्पर्धेत सगळ्यात महत्वाचं असते ते भाला ज्या कोनातून फेकला जातो आणि त्याला जास्तीत जास्त वेग मिळण्यासाठी शरीराच्या वजनाचा भार सुद्धा आपल्या फेकीला द्यावा लागतो. इकडेच मला वाटते नीरज ने ऑलम्पिक स्पर्धेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मात दिली. नीरज ने अंतिम फेरीत जे पहिले दोन्ही भाला फेक ८७ मीटर च्या पुढे केले. त्या वेळेस त्याने उडी मारून आपल्या संपूर्ण शरीराचा भार खांद्यातून आपल्या भाल्या पर्यंत पोहचवला. जे १-२ मीटर जास्ती त्याच्या भाल्याने गाठलं त्यामागे निर्णायक भूमिका ही त्याच्या भाला फेकीत होती.

जर आपण नीरज चा दुसरा थ्रो पुन्हा एकदा बघितला तर नीरज ने भाला किती अंतर गाठतो आहे याचा विचार न करता आपण आपली कामगिरी फत्ते केली आहे या विश्वासाने मागे वळून दोन्ही हात उंचावून आनंद व्यक्त केला होता. हा आत्मविश्वास एखाद्या खेळाडूच्या मनात तेव्हाच असतो जेव्हा त्याला त्याच्या क्षमतेची संपूर्ण कल्पना असते. त्यामुळेच जेव्हा पडद्यावर ८७.५८ मीटर चा आकडा दिसला तेव्हा नीरज ला हे कळून चुकलं होतं की पदकावर आपलं नाव कोरलं आहे आता फक्त त्याचा रंग निश्चित व्हायचा आहे. नीरज च्या सोबत वेटर च्या रूपात तगडा प्रतिस्पर्धी होता. ज्याने कित्येक वेळा लिलया ९० मीटर च्या पुढे भाला फेक केलेली होती. पण अंतिम सामन्यात त्याची लय चुकली आणि भारताच १२१ वर्षाच स्वप्न प्रत्यक्षात उतरलं.

आज सुभेदार नीरज चोप्रा ने सुवर्ण पदक जिंकल्यावर त्याच श्रेय घेण्यासाठी अनेक दावेदार पुढे येतील. पण ज्यांनी हा भाल्याचा प्रवास केला आहे तेच त्याचे खरे हकदार आहेत. अगदी त्याचे पहिले कोच जयवीर सिंग ते हान आणि त्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि त्याचे इतर कोच या सोबत त्याचे कुटुंबीय आणि भारत सरकार. कारण प्रत्येकाने थोडा थोडा वाटा त्याच्या यशात उचललेला आहे. सगळ्यात जास्ती श्रेय नक्कीच सुभेदार नीरज चोप्रा च आहे ज्याने एका शतकापेक्षा जास्ती वेळ भारतीयांनी बघितलेल्या स्वप्नांला मूर्त स्वरूप दिलं आहे. त्याचा हा भाल्याचा प्रवास अनेक भारतीय खेळाडूंना आणि तरुणांना प्रोत्साहन देणारा असेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्याच्या अविस्मरणीय कामगिरीला माझा कडक सॅल्यूट. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

https://vartakvinit.blogspot.com/2021/08/blog-post_8.html

🥇®️🥇®️🥇®️🥇®️🥇®️🥇

सुभेदार नीरज चोप्रा

विशिष्ठ सेवा मेडल, ४ राजपुताना रायफल्स,

भारतीय सेना…

जय हिंद!!!

🥇®️🥇®️🥇®️🥇®️🥇®️🥇

रामायण में उल्लेखित रावण द्वारा सीताहरण करके श्रीलंका जाते समय पुष्पक विमान का मार्ग अर्थात …

रामायण में उल्लेखित रावण द्वारा सीताहरण करके श्रीलंका जाते समय पुष्पक विमान का मार्ग
अर्थात …

विश्लेषण :
उस मार्ग में कौन सा वैज्ञानिक रहस्य छुपा हुआ है..?
उस मार्ग के बारे में लाखों साल पहले कैसे जानकारी थी..?

पढ़िए इन प्रश्नों के उत्तर, जो आपको आश्चर्य में डाल देंगे ।

मित्रों !
रावण ने माँ सीता का अपहरण पंचवटी (नासिक, महाराष्ट्र) से किया और पुष्पक विमान द्वारा हम्पी (कर्नाटक), लेपक्षी (आँध्रप्रदेश ) होते हुए श्रीलंका पहुंचा ।
आश्चर्य होता है जब हम आधुनिक तकनीक से देखते हैं कि नासिक, हम्पी, लेपक्षी और श्रीलंका बिलकुल एक सीधी लाइन में हैं । अर्थात ये पंचवटी से श्रीलंका जाने का सबसे छोटा रास्ता है ।

अब आप ये सोचिये उस समय Google Map नहीं था जो Shortest Way बता देता । फिर कैसे उस समय ये पता किया गया कि सबसे छोटा और सीधा मार्ग कौनसा है ?

या अगर हम इसे कपोल कल्पित मानने वालों की अहम् संतुष्टि के लिए मान भी लें कि चलो रामायण केवल एक महाकाव्य है जो वाल्मीकि ने लिखा तो फिर ये बताओ कि उस ज़माने में भी गूगल मैप नहीं था तो रामायण लिखने वाले वाल्मीकि को कैसे पता लगा कि पंचवटी से श्रीलंका का सीधा छोटा रास्ता कौनसा है ?

महाकाव्य में तो किन्ही भी स्थानों का ज़िक्र घटनाओं को बताने के लिए आ जाता ।
लेकिन क्यों वाल्मीकि जी ने सीता हरण के लिए केवल उन्ही स्थानों का ज़िक्र किया जो पुष्पक विमान का सबसे छोटा और बिलकुल सीधा रास्ता था ?

ये ठीक वैसे ही है कि जैसे आज से 500 साल पहले गोस्वामी तुलसीदास जी को कैसे पता कि पृथ्वी से सूर्य की दूरी क्या है ? (जुग सहस्त्र जोजन पर भानु = 152 मिलियन किमी – हनुमानचालीसा),
जबकि नासा ने हाल ही कुछ वर्षों पूर्व में ही इस दूरी का पता लगाया है ।

अब आगे देखिये…
पंचवटी वो स्थान है जहां प्रभु श्री राम, माता जानकी और भ्राता लक्ष्मण वनवास के समय रह रहे थे ।
यहीं शूर्पणखा आई और लक्ष्मण से विवाह करने के लिए उपद्रव करने लगी । विवश होकर लक्ष्मण ने शूपर्णखा की नाक यानी नासिका काट दी ।
और आज इस स्थान को हम नासिक (महाराष्ट्र) के नाम से जानते हैं । आगे चलिए…

पुष्पक विमान में जाते हुए सीता ने नीचे देखा कि एक पर्वत के शिखर पर बैठे हुए कुछ वानर ऊपर की ओर कौतुहल से देख रहे हैं तो सीता ने अपने वस्त्र की कोर फाड़कर उसमें अपने कंगन बांधकर नीचे फ़ेंक दिए, ताकि राम को उन्हें ढूढ़ने में सहायता प्राप्त हो सके ।
जिस स्थान पर सीताजी ने उन वानरों को ये आभूषण फेंके वो स्थान था ‘ऋष्यमूक पर्वत’ जो आज के हम्पी (कर्नाटक) में स्थित है ।

इसके बाद, वृद्ध गिद्धराज जटायु ने रोती हुई सीता को देखा, देखा कि कोई राक्षस सीता माता को अपने विमान में ले के जा रहा है ।
जटायु ने सीता को छुड़ाने के लिए रावण से युद्ध किया । रावण ने तलवार से जटायु के पंख काट दिए ।
इसके बाद जब राम और लक्ष्मण सीता को ढूंढते हुए पहुंचे तो उन्होंने दूर से ही जटायु को सबसे पहला सम्बोधन ‘हे पक्षी’ कहते हुए किया और उस जगह का नाम दक्षिण भाषा में ‘लेपक्षी’ (आंधप्रदेश) है ।

अब क्या समझ आया आपको ? पंचवटी—हम्पी—लेपक्षी—श्रीलंका । सीधा रास्ता । सबसे छोटा रास्ता ।

अपने ज्ञान-विज्ञान, संस्कृति को भूल चुके भारतबन्धुओं रामायण कोई मायथोलोजी नहीं है ।
ये महर्षि वाल्मीकि द्वारा लिखा गया सत्य इतिहास है । जिसके समस्त वैज्ञानिक प्रमाण आज उपलब्ध हैं ।
इसलिए जब भी कोई हमारे इतिहास, संस्कृति, साहित्य को मायथोलोजी कहकर लोगो को भ्रमित करने का या खुद को विद्वान दिखाने का प्रयास करे तो उसको पकड़कर बिठा लेना और उससे इन सवालों के जवाब पूछना । विश्वास करो एक का भी जवाब नहीं दे पायेगा ।
अब इस सबमे आपकी ज़िम्मेदारी क्या है ?
आपके हिस्से की ज़िम्मेदारी ये है कि अब जब टीवी पर रामायण देखें तो ये ना सोचें कि कथा चल रही है बल्कि निरंतर ये ध्यान रखें कि ये हमारा इतिहास चल रहा है । इस दृष्टि से रामायण देखें और समझें ।

विशेष आवश्यक ये है कि यही दृष्टि हमारे बच्चों को दें, बच्चों को ये बात ‘बोलकर’ कहें कि ‘बच्चो ये कथा कहानी नहीं है, ये हमारा इतिहास है, जिसको मिटाने की कोशिश की गई है ।
🙏🏻

आजचा कृषी सल्ला* *मका* कीड व्यवस्थापन

*आजचा कृषी सल्ला*
*मका*🌽
कीड व्यवस्थापन
⭕अमेरिकन लष्करी अळी – अळी आपली उपजीविका पानांवर करते. सुरुवातीच्या अवस्था कोवळ्या पानांवर उपजीविका करतात. नंतर पोंग्यात छिद्र पडून आत शिरून आतील भागावर उपजीविका करतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी काहीवेळा पानांच्या कडापासून आतल्या भागापर्यंत खातात. नंतरच्या अवस्था या प्रामुख्याने पीकवाढीचा भाग खातात, जेणेकरून तुरा बाहेर येत नाही. कोवळी कणसे खातात. 🛡️एकात्मिक नियंत्रण
👉भौतिक नियंत्रण शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. एकरी १५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा. किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी. असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही. पिकाच्या सुरवातीच्या ३० दिवसांपर्यंत पोंग्यात वाळू व चुना ९:१ या प्रमाणात टाकावे. एकरी १० पक्षीथांबे लावावेत.
👉प्रतिबंधात्मक उपाय पिकाचे आणि इतर पर्यायी कीड वाढणाऱ्या झाडांचे अवशेष नष्ट करावेत. तसेच सुप्तावस्थेत अळी असलेले खोड छाटावे.
👉जैविक नियंत्रण अंड्यांवर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची एकरी ५०,००० अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीनवेळा शेतात सोडावीत. नोमुरीया रायली ३ ग्रॅम किंवा मेटारायझिअम ॲनिसोप्ली ५ ग्रॅम यापैकी एका बुरशीजन्य कीटकनाशकाची प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) अळीच्या वाढीच्या लवकरच्या (१ ते ३) अवस्था – ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५ मि.लि. थायमेथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ०.५ मि.लि. किंवा स्पिनोटोराम (११.७ एससी) ०.९ मि.लि. किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.४ मि.लि.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ हड़पसर विभाग में कुमावत संपर्क प्रमुख तो देवासी बने संगठन मंत्री*

*पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ हड़पसर विभाग में कुमावत संपर्क प्रमुख तो देवासी बने संगठन मंत्री*

महाराष्ट्र : पुणे में दिनांक 8 अगस्त 2021 को पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ की पदग्रहन प्रोग्राम परिणय मंगल कार्यालय सिंहगड रोड में CAIT प्रमुख vc भारतीया जी व PJRVS प्रमुख सचिन भाऊ निवगुणे जी की उपस्थिति में सम्पन्न हुआ,उसमे हड़पसर विभाग की नियुक्ति इस प्रकार हुई अध्यक्ष बापू गायकवाड़,
उपाध्यक्ष रिजवान खान,
संपर्क प्रमुख दयाराम कुमावत, संगठन मंत्री जितेंद्रकुमार देवासी,
सचिव प्रेमारामजी चौधरी की नियुक्ति हुई,
साथ ही दयाराम कुमावत ने कहा कि हम सभी व्यापारियो को एक बनाकर जोड़ने का काम करेंगे,
जितेंद्रकुमार देवासी ने कहा कि में संघटन को मजबूत करने का काम करूंगा

*🕉️कर्माचा सिद्धांत🕉️*

*🕉️कर्माचा सिद्धांत🕉️*

कोणाची ही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परीणाम भोगावे लागतात.

काही लोकांना नाही पटणार हा विषय,
पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, ….

अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, …

जसे की शारिरीक, मानसिक, आर्थिक,…..
अपमानास्पद वागणुक,…
कोणांचे मन दुखावले असू शकते….,कोणावर अन्याय केला गेलेला असतो, …..
कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते,…..
छळ केलेला असेल, शारिरीक दुखापत केलेली असेल, …….
किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ……
त्रासाचे कुठलेही कारण असो…

वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो,
जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल,

पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही,किंवा देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते,मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळटळाट असे म्हटले जाते,

मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयश येणे घरात आजारपण येणे काही ही घटना घडू शकतात,….

आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे जगात फक्त दोनच व्यक्तिंना माहित असते,एक म्हणजे

“अंतरात्मा”

दुसरा

“परमात्मा”

समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परत फेड याच जन्मात करावी लागते,

तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा अगर नका ठेऊ तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक,

चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,

मी एका पुस्तकात वाचले होते,

राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले,
तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?
माझ्या संबंध जिवनात मी असे कोणते ही महान पातक केलेलं नाही,
की ज्याच्या परीणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुखः सोसणे माझ्या नशिबी यावे?

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व जन्म पहाण्याची दिव्य दृष्टि दिली,

धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणी पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षाची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली, धृतराष्ट्र राजाची त्या वेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.

कर्म हे फल देऊनच शांत होते,

प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच,
हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे,
चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते, फक्त वेळ आणी काळ पुढे मागे होऊ शकतो,
हाच कर्माचा सिद्धांत आहे,

आता आपण ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे,

“जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥

क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट”.

पवित्र श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा*

*पवित्र श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा*
🌿®️🌱®️☘️®️🍀®️🌴
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला

फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे

देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

error: Content is protected !!