Home Blog Page 210

आम्ही भोंगे बंद ठेवतो पण मंदिरांवरील लाऊडस्पीकर सुरू ठेवा;* *👉👉पंढरपूर, शिर्डीतील मुस्लिम समाजाची मागणी

आम्ही भोंगे बंद ठेवतो पण मंदिरांवरील लाऊडस्पीकर सुरू ठेवा;*
*👉👉पंढरपूर, शिर्डीतील मुस्लिम समाजाची मागणी*

*👉👉आम्ही मशिदींवरील भोंगे बंद ठेवतो पण मंदिरांवरील भोंगे सुरू ठेवण्याची मागणी पंढरपूर आणि शिर्डीतील मुस्लिम समाजाने केली आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची काकड आरती पहाटे साडेचार वाजता होते. या काकड आरतीला हजारो भाविक मंदिर परिसरात असतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून काकड आरतीचा भोंगा बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. ही बाब लक्षात घेऊन पंढरपूरमधील मुस्लिम समाजाने एकत्रित बैठक घेऊन श्री विठ्ठल मंदिरावरील भोंगा सुरू ठेवा व पूर्ववत धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवा, त्यासाठी शासनाने विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.*

*👉पंढरीनगरी ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. हजारो भाविक दररोज पंढरपूरमध्ये येतात; परंतु सर्वांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या काकड आरतीला उपस्थित राहता येत नाही. म्हणून हजारो भाविक हे मंदिर परिसरात उभारून काकड आरती ऐकून समाधान व्यक्त करतात. म्हणून शासनाने विशेष बाब म्हणून पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या काकड आरतीला परवानगी द्यावी. आम्ही मशिदींवरील भोंगे सुरू करणार नाही; पण मंदिरांवरील भोंगा सुरू ठेवा, अशी मागणी इब्राहिम बोहरी यांनी केली आहे.*

*👉दरम्यान, साईमंदिरावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता पूर्ववत सुरू ठेवावेत, अशी मागणी येथील जामा मशीद ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात एक निवेदनही पोलिसांना देण्यात आले आहे. गेल्या अनेक कर्षांच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदिरातील रात्रीची व सकाळची आरती लाऊडस्पीकरशिवाय झाली, हे अतिशय वेदनादायक आहे. साईबाबा देवस्थान हे जागतिक कीर्तीचे व सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. रामनवमी उत्सवात रामजन्माच्या कार्यक्रमाबरोबरच संदलचीही मिरवणूक असते. रोज सकाळी दहा वाजता हिंदू-मुस्लिम समाजबांधव एकत्रितपणे साईसमाधीवर फुले वाहतात. त्यामुळे देवस्थानावरील लाऊडस्पीकर बंद न ठेवता ते सुरू ठेवावेत व विशेष बाब म्हणून त्यास मान्यता देण्यात यवी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.*

पाचव्या राष्ट्रीय लोक अदालतीला उत्फूर्त प्रतिसाद *लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा* *-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख

पाचव्या राष्ट्रीय लोक अदालतीला उत्फूर्त प्रतिसाद लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा*-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख

पुणे,दि.7: लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने सलग चार वेळा आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे. सामंजस्य व तडजोडीने वाद मिटवत सुखी जीवन जगण्यासाठी लोक अदालत महत्त्वाची आहे. लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवादही तेवढाच महत्त्वाचा आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यात पुण्याचे अग्रस्थान कायम राहील ,असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी व्यक्त केला.

जिल्हा व सत्र न्यायालयात आज राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायधीश एस.एस.गोसावी, जिल्हा न्यायधीश के. पी. नांदेडकर, न्यायधीश श्री.सुनील वेदपाठक, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रताप सावंत, जिल्हा सरकारी वकील एन.डी.पाटील, पुणे वकील बार आसोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, लोक अदालतीच्या  माध्यमातून  प्रकरणांचा निपटारा गतीने करू शकल्यामुळे लोक अदालतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक  प्रकरणे निकाली कसे निघतील यासाठी प्रयत्न करावे. यापूर्वी झालेल्या चारही लोक अदालतीमध्ये पुणे प्रथम क्रमांकावर आहे. हेच अग्रस्थान आजची लोक अदालत कायम ठेवेल. एका दिवसात न्याय देणे हे अत्यंत मोठे कार्य आहे, त्याकामी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे ठरतील.

श्री. सावंत म्हणाले, लोक अदालतीमध्ये  पुणे येथील ४३ हजार ८४८ प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व ८७ हजार १८३ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत.   लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुण्यात १२४ पॅनल उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी न्यायाधीश, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी होणार

अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी होणार*!

*पुण्यात ६ मे रोजी राज्यस्तरीय कार्यशाळाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन*
————————————–
पुणे दि.४- महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा पारित केला असून या कायद्याच्या प्रचार, प्रसिद्धी व अंमलबजावणीसाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी ६ मे रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सकाळी ११:३० वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसिद्धी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव मार्गदर्शन करणार आहेत. समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे यावेळी उपस्थित राहतील.

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ शासनाने पारित केला आहे. त्याअंतर्गत विविध समित्या शासनाने गठीत केल्या असून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रचार प्रसिद्धी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्यावतीने समाज कल्याण विभागातील संपूर्ण राज्यात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एक दिवसाची कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी दिली आहे. पुणे येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ११:३० ते सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोविड रुग्णांस जादा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा : डॉ. नीलम गोऱ्हे

कोविड रुग्णांस जादा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा : डॉ. नीलम गोऱ्हे*
*पुणे येथील उस्मानाबाद जिल्हा कोविड आढावा बैठकीत दिले आदेश*

पुणे, दि.4 ( जिमाका ) : कोविडने निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबाला 50 हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. याबरोबरच महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन अशा एकल महिलांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्या. तसेच कोविड रुग्णांना जादा बिले आकारणाऱ्या रुणालयांवर कारवाई करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिले.
पुणे येथील विधान भवनात आयोजित उस्मानाबाद जिल्ह्याच्या कोविड आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी कृषी, महसूल, पशुसंवर्धन, वनीकरण विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (दूरदृश्यप्रणालीद्वारे), उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे उपस्थित होत्या.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भूकंप पुनर्वसनाचा एक मोठा अनुभव पाठीशी आहे. कोविड विधवांच्या विकासासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांवर आधारित प्रकल्प तयार करावा. एकल शेतकरी विधवा महिलांना प्राधान्याने बी -बियाणे , खते उपलब्ध करून द्यावीत. जिल्हा स्तरावर एकल महिला समिती स्थापन करून विविध शासकीय महामंडळे आणि माविम उमेद महिलांविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांची मदत घ्यावी. आठवडी बाजार, धार्मिक स्थळे येथे लसीकरण केंद्र सुरु करावे. लोकशाही दिनाचे आयोजन करुन एकल महिला, महिला शेतकरी यांच्या अडचणी सोडविण्यात याव्यात. शिक्षकांनी दिलेल्या निधीबाबत लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या .
एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी समिती तयार करुन 50 हजार रुपयांची मदत मिळण्याबाबत आलेल्या 1 हजार 29 अर्जांपैकी शेतकरी महिला ज्यांची मुले लहान आहेत किंवा ज्यांच्या मुली 12 ते 15 वयाची आहेत , अशा महिलांना प्राधान्याने मदत देण्यात यावी. बालविवाह रोखण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अशा कुटूंबाचे समुपदेशन करावे, एकल महिला शेतकऱ्यांच्या शेतजमीनींबाबत काही अडचणीअसल्यास त्या सोडविण्यासाठी तसेच शासकीय प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी समाधान शिबिरे आयोजित करावीत, असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून लसीकरण, कृषी तज्ञांची मदत घेऊन शेळी पालनासाठी मर्यादित कुरणाची व्यवस्था करावी , करार पद्धतीने काम करत असलेल्या वाहन चालकांचे वेतन, 50 हजाराची मदत मिळालेल्या महिलांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात लावणे आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
बैठकीला कृषी, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकरी, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांच्या भेटी*

*360 अंश सेल्फीचे आकर्षण*

पुणे दि.५: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित ‘दोन वर्षे जनसेवेची,महाविकास आघाडीची’ या प्रदर्शनाला
विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह
शेतकरी, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

*शेतकरी, ग्रामीण भागातील, युवक नागरिकांच्या चांगल्या प्रतिक्रिया*

कोरोना महामारी तसेच संकटाच्या काळात सरकारने राबविलेल्या योजना दिलासा देणाऱ्या आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाने शासनाच्या योजना चित्रमय प्रदर्शनातून लोकांसमोर आणल्या आहेत. प्रदर्शन पाहून आम्हा गावशिवारातील शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी सरकारच्या योजना पाहता आल्या, अशा शब्दात प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले शेतकरी, ग्रामस्थ यांनी व्यक्त केल्या. तर युवकांनी आपल्या मोबाईलमध्ये माहिती टिपून घेतली.

*मान्यवरांच्या प्रदर्शनाला भेटी*
पाच दिवसाच्या कालावधीत अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या.उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदर्शनाला विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्ष विद्याधर अनास्कर,माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह आमदार सुनील शेळके, दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप यांनी भेट दिली.

*३६० अंश सेल्फीचे आकर्षण*

प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वांनीच प्रदर्शन पाहून झाल्यानंतर ३६० अंश सेल्फी घेतली. आपल्या कॅमेऱ्यात सेल्फी घेत समाज माध्यमातून पाठविण्यात आल्याचेही दिसून आले.

*नेटके आणि देखणे आयोजन*

माहिती महासंचालक तथा प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शन अत्यंत नेटके आणि देखणे झाल्याचे अनेकांनी सांगितले. माहिती थोडक्यात आणि मुद्देसूद मांडल्याने ती समजून घेणे नागरिकांना शक्य झाले. काहींनी प्रदर्शित योजनेचा तपशील जाणून घेण्यातही रस दाखविला. एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयाचा सुंदर परिसर आणि प्रदर्शनाचे तेवढेच सुंदर प्रवेशद्वार यामुळे परिसरात येणाऱ्या नागरिकांची पाऊले प्रदर्शनाकडे वळली.

शेवटच्या दिवशी दुपारून नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजली भागवत आणि संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांनीदेखील प्रदर्शनाच्या नेटक्या आयोजनाविषयी कौतुक केले.

पुणे विभागाचे माहिती उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख*
पुणे दि.४-संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करण्यात यावे आणि पालखी मार्गाच्या केलेल्या पाहणीत आढळलेल्या तृटींबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे पालखी सोहळ्याबाबत आयोजित प्राथमिक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते. तर संबंधित तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतेबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे. स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. पालखी महामार्गाची कामे सुरू असल्याने वाटेत अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. संबंधित विभागांकडून आवश्यक कामे तातडीने करून घ्यावीत.

सासवड पालखी मुक्कामाच्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी. पुढील १० दिवसात संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे पालखी सोहळा न झाल्याने यावर्षी अधिक संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने सुविधांचे नियेाजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 04 मई 2022 दिन – बुधवार

🌞 ~ *आज का हिन्दू पंचांग* ~ 🌞
⛅ *दिनांक – 04 मई 2022*
⛅ *दिन – बुधवार*
⛅ *विक्रम संवत – 2079 (गुजरात-2078)*
⛅ *शक संवत -1944*
⛅ *अयन – उत्तरायण*
⛅ *ऋतु – ग्रीष्म ऋतु*
⛅ *मास – वैशाख*
⛅ *पक्ष – शुक्ल*
⛅ *तिथि – तृतीया सुबह 07:32 तक तत्पश्चात चतुर्थी*
⛅ *नक्षत्र – मृगशिरा पूर्ण रात्रि तक*
⛅ *योग – अतिगणड शाम 05:08 तक तत्पश्चात सुकर्मा*
⛅ *राहुकाल – दोपहर 12:36 से दोपहर 02:13 तक*
⛅ *सूर्योदय – 06:7*
⛅ *सूर्यास्त – 19:03*
⛅ *दिशाशूल उत्तर दिशा में*
⛅ *व्रत पर्व विवरण – विनायक चतुर्थी*
💥 *विशेष – तृतीया को पर्वल खाना शत्रुओं की वृद्धि करने वाला है। (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞

🌷 *गर्मियों में बलप्रद व स्वास्थ्यवर्धक आम* 🌷
🍋 *पका आम बहुत ही पौष्टिक होता है | इसमें प्रोटीन,विटामिन व खनिज पदार्थ, कार्बोहाइड्रेट तथा शर्करा विपुल मात्रा में होते हैं |*
🍋 *आम मीठा, चिकना, शौच साफ़ लानेवाला, तृप्तिदायक, ह्रदय को बलप्रद, वीर्य की शुद्धि तथा वृद्धि करनेवाला है | यह वायु व पित्त नाशक परंतु कफकारक है तथा कांतिवर्धक, रक्त की शुद्धि करनेवाला एवं भूख बढ़ानेवाला है | इसके नियमित सेवन से रोगप्रतिकारक शक्ति बढती है |*
🍋 *शुक्रप्रमेह आदि विकारों के कारण जिनको संतानोत्पत्ति न होती हो, उनके लिए पका आम लाभकारक है | कलमी आम की अपेक्षा देशी आम जल्दी पचनेवाला, त्रिदोषशामक व विशेष गुणयुक्त है | रेशासहित, मीठा, पतली या छोटी गुठलीवाला आम उत्तम माना जाता है | यह आमाशय, यकृत, फेफड़ों के रोग तथा अल्सर, रक्ताल्पता आदि में लाभ पहुँचाता है | इसके सेवन से रक्त,मांस आदि सप्तधातुओं तथा वासा की वृद्धि और हड्डियों का पोषण होता है | यूनानी डॉक्टरों के मतानुसार पका आम आलस्य दूर करता है, मूत्र साफ़ लाता है, क्षयरोग (टी.बी.)मिटाता है तथा गुर्दें व मूत्राशय के लिए शक्तिदायक है |*
💊 *औषधि-प्रयोग* 💊
🍋 *भूखवृद्धि : आम के रस में घी और सौंठ डालकर सेवन करने से जठराग्नि प्रदीप्त होता है | वायु रोग या पाचनतंत्र की दुर्बलता : आम के रस में अदरक मिलाकर लेना हितकारी है |*
🍋 *शहद के साथ पके आम के सेवन से प्लीहा, वायु और कफ के दोष तथा क्षयरोग दूर होता है |*
🍋 *आम का पना : केरी (कच्चा आम ) को पानी में उबालें अथवा गोबर के कंडे की आग में दबा दें | भुन जाने पर छिलका उतार दें और गूदा मथकर उसमें गुड, जीरा, धनिया, काली मिर्च तथा नमक मिलाकर दोबारा मथें | आवश्यकता अनुसार पानी मिलायें और पियें |*
🍋 *लू लगने पर : उपरोक्त आम का पना एक-एक कप दिन में २ – ३ बार पियें |*
🍋 *भुने हुए कच्चे आम के गूदेको पैरों के तलवों पर लगाने से भी लू से राहत मिलती है |*
🍋 *वजन बढ़ाने के लिए : पके और मीठे आम नियमित रूप से खाने से दुबले – पतले व्यक्ति का वजन बढ़ सकता है |*
🍋 *दस्त में रक्त आने पर : छाछ में आम की गुठली का २ से ३ ग्राम चूर्ण मिलाकर पीने से लाभ होता है |*
🍋 *पेट के कीड़े : सुबह चौथाई चम्मच आम की गुठलियों का चूर्ण गर्म पानी के साथ लेने से पेट के कीड़े मर जाते है |*
🍋 *प्रदर रोग : आम की गुठली का २ से ३ ग्राम चूर्ण शहद के साथ चाटने से रक्त-प्रदर में लाभ होता है |*
🍋 *दाँतों के रोग : आम के पत्तों को खूब चबा-चबाकर थूकते रहने से कुछ ही दोनों में दाँतों का हिलना और मसूड़ों से खून आना बंद हो जाता है | आम की गुठली की गिरी के महीन चूर्ण का मंजन करने से पायरिया ठीक होता है |*
🍋 *घमौरियाँ : आम की गुठली के चूर्ण से स्नान करने से घमौरियाँ दूर होती है |*
🍋 *पुष्ट और सुडौल शरीर : यदि एक वक्त के आहार में सुबह या शाम केवल आम चूसकर जरा-सा अदरक लें तथा डेढ -दो घंटे के बाद दूध पियें तो ४० दिन में शरीर पुष्ट व सुडौल हो जाता | आम और दूध एक साथ खाना आयुर्वेद की दृष्टि से विरुद्ध आहार है | इससे आगे चलकर चमड़ी के रोग होते हैं |*
🔥 *सावधानी : खाने के पहले आम को पानी में रखना चाहिए | इससे उसकी गर्मी निकल जाती है | भूखे पेट आम नहीं खाना चाहिए | अधिक आम खाने से गैस बनती है और पेट के विकार पैदा होते हैं | कच्चा, खट्टा तथा अति पका हुआ आम खाने से लाभ के बजाय हानि हो सकती है | कच्चे आम के सीधे सेवन से कब्ज व मंदाग्नि हो सकती है |*
💥 *बाजार में बिकनेवाला डिब्बाबंद आम का रस स्वास्थ्य के लिए हितकारी नहीं होता है | लम्बे समय तक रखा हुआ बासी रस वायुकारक, पचने में भारी एवं ह्रदय के लिए अहितकर है |*
🙏🏻
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🙏🏻🌷💐🌸🌼🌹🍀🌺💐🙏🏻🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩

राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, 👉भोंग्यांबाबत पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक*

राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, 👉भोंग्यांबाबत पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक*

*मुंबई:-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेरच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर दुप्पट पटीनं लाऊडस्पीकरवर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेतून दिला आहे. ४ मे पासून मनसेच्या आंदोलनाला सुरुवात होईल असं त्यांनी जाहीर केलं होतं. आज रमजान ईद असल्यामुळे आणि राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे राज ठाकरेंच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.*

*👉राज ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेतही भोंग्यांबाबतची आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आज अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून राज्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण अचानक राज ठाकरेंनी काल पत्रक जारी करुन आजचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. तसंच भोंग्यांबाबतच्या निर्णयावर आपली भूमिका आज जाहीर करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी नऊ वाजता मनसेच्या महत्वाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे ‘शिवतीर्थ’वर बैठक घेत आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.राज ठाकरेंच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते आता कोणती नवी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दुसरीकडे राज्याचं पोलीस खातं अलर्ट मोडवर असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसंच राज्याच्या गृहखात्याच्या वतीनं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास राज्य सरकार सक्षम असल्याचं सांगण्यात आलं आहे. कायदा व सुव्यवस्थेचं पालन न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही गृहखात्यानं म्हटलं आहे.*

error: Content is protected !!