Home Blog Page 165

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्रकल्पांबाबत बैठक

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत
राज्यातील प्रकल्पांबाबत बैठक
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून
प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. 9 : राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वनांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामांसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
राज्यातील विविध रस्ते प्रकल्प आणि नवीन रस्ते प्रकल्पांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, वाढते शहरीकरण त्याचबरोबर वाढत्या पायाभूत सुविधांसाठी रस्ते, महामार्ग तसेच उड्डाणपूलांचे विविध प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. त्याचबरोबर काही प्रस्तावित प्रकल्प जमीन संपादन तसेच वन विभागाची मान्यता यासाठी प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या या प्रकल्पांना तातडीने गती देण्याची आवश्यकता आहे.
जे प्रकल्प जमीन संपादन अभावी रखडलेले आहेत, त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी कालमर्यादेत जमीन संपादन करावी. या कामी वेळ जात असल्याने प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होते त्यामुळे लवकरात लवकर जमीन संपादन करून प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करावे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
१५ वर्षापूर्वीची वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार अशी वाहने मोडीत काढावी, यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करण्याची सूचना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी केली. मोठ्या आणि विकसित जिल्ह्यांमध्ये ४ आणि लहान अविकसित जिल्ह्यांत दोन अशी किमान १५० ते २०० युनिट सुरू करण्याची सूचना श्री. गडकरी यांनी यावेळी केली. यामुळे किमान १० ते १५ हजार जणांना रोजगार मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले. महामार्ग, रस्ते प्रकल्पांसाठी वेळेत जमीन संपादन करण्यात यावी, असे श्री. गडकरी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देतानाच गणपतीपूर्वी एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मुंबई विभागात चार, सहा आणि आठ पदरी मार्गिकांचे ९ प्रकल्पांच्या ४३५ कि.मी. लांबीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. ६२१ कि.मी. लांबीचे सहा न्यू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे, १७८ कि.मी. लांबीचे तळेगाव, चाकण, शिरूर, पुणे शिरूर, रावेत नाऱ्हे, हडपसर रावेत, द्वारका सर्कल ते नाशिक रोड स्टेशन अशा या ५ एलिव्हेटेड कॉरिडोअर्सचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेच्या कामांमध्ये ब्लॅकस्पॉट दूर करणे, उड्डाणपूल, सर्वीस रस्ते, पादचारी पूल यांची ६८ ठिकाणी कामे प्रस्तावित आहेत.
यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कळंबोली आणि अन्य सहा ठिकाणच्या जंक्शनच्या विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामासाठी सात कि.मी.च्या जमीन संपादनाविषयी देखील चर्चा झाली.
०००००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, अजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव तरतूद करणार

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 9 : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुरू केली असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात येईल आणि या योजनेसाठीच्या अटी यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सन २०२१ आणि २०२२ चे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार हेमंत गोडसे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी महासंचालक हेमराज बागुल यांच्यासह विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, कार्यवाह प्रवीण पुरो, कोषाध्यक्ष विनोद यादव यांची उपस्थिती होती.

शासकीय योजनांच्या प्रगतीची, राज्याच्या विकासाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विकास योजना, त्यांची अंमलबजावणी, या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील लोकांचा सहभाग जनतेपर्यंत पोहोचविणे व त्याद्वारे संबंधितांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. ही भूमिका जबाबदारीने पार पाडण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना पुरस्कार देऊन मान्यता देणे आवश्यक आहे.

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस मदत करण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचे पुनर्गठन तसेच अधिस्वीकृती समितीचा लवकरात लवकर शासन निर्णय काढला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. बदलत्या काळानुसार स्वरूप बदलत आहे. प्रिंट माध्यमांचे महत्त्व कमी झाले नसल्याचे सांगून इलेक्ट्रॉनिक माध्यमांचेही महत्त्व आहे. आता समाज माध्यम दुधारी तलवारीसारखे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ते विविध विषयाला वाचा फोडत आहे. पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी जे शक्य आहे ते करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांना जाहीर झालेला सन २०२१ चा कृ.पां. सामक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार श्री. केतकर यांच्या अनुपस्थितीत अनिकेत जोशी यांनी स्वीकारला. सन २०२२ चा ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देवून पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. यामध्ये सन २०२१ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) दै. बीड रिपोर्टर, बीडचे शेख रिजवान शेख खलील, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम) न्युज १८ लोकमत, मुंबईचे विलास बडे, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वार्ताहर संघ सदस्य) दै.भास्कर, मुंबईचे विनोद यादव यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर सन २०२२ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) दै.पुण्यनगरी, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक माध्यम )ब्युरो चिफ साम टिव्ही मुंबई च्या रश्मी पुराणिक, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वार्ताहर संघ सदस्य) दै.पुण्यनगरी मुंबईचे किशोर आपटे यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य आलोक देशपांडे, मनोज मोघे, कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण पुरो यांनी केले. सूत्रसंचालन रिताली तपासे आणि राजेंद्र हुंजे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष महेश पवार यांनी मानले

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा

मुंबई, दि. 9 : शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार ज्ञानराज चौगुले यांचेसह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या उद्दिष्टाने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतून ६ हजार कृषि फीडर्स सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत असे सांगून शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलासाठी वीज पुरवठा खंडीत करु नये असे निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सव्वा दोन लाख सौर कृषि पंप देण्याचे उद्दिष्ट असून गेल्या वर्षी ७५ हजार सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. ज्यांना वीजेची जोडणी नाही त्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्याचे धोरण असून ज्यांच्याकडे वीजजोडणी आहे, त्यांनी मागणी केल्यास त्यांनाही सौर कृषिपंप देण्यासाठी सविस्तर कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

केवळ एक रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असा निर्णय अर्थसंकल्पात घेतला असून विम्याच्या हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे, त्यासाठी ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक अशा विविध योजना शासन राबवित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला जागतिक बॅंकेने मान्यता दिली आहे. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल. प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना जाहीर केली आहे, यात प्रतिवर्ष प्रति शेतकरी ६ हजार रुपये अतिरिक्त राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत, त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अवकाळी, गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७ हजार कोटी रुपये वाटप केले आहे, सिंचनाच्या २८ योजना मंजूर केल्या आहेत, त्यातून ५ लाख हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

कर्जवसुलीसाठी मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष द्या, छोट्या शेतकऱ्यांच्या मागे लागू नका, त्यांना त्रास देऊ नका अशा सूचना जिल्हा बॅंकांना देण्यात आल्या आहेत. हे सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 09 मई 2023 दिन – मंगलवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 09 मई 2023*
*⛅दिन – मंगलवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ (गुजरात एवं महाराष्ट्र में वैशाख)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – चतुर्थी शाम 04:08 तक तत्पश्चात पंचमी*
*⛅नक्षत्र – मूल शाम 05:45 तक तत्पश्चात पूर्वाषाढा*
*⛅योग – सिद्ध रात्रि 09:16 तक तत्पश्चात साध्य*
*⛅राहु काल – शाम 03:53 से 05:32 तक*
*⛅सूर्योदय – 06:02*
*⛅सूर्यास्त – 07:11*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:35 से 05:19 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:14 से 12:58 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – मंगलवारी चतुर्थी*
*⛅विशेष – चतुर्थी को मूली खाने से धन का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🌹मंगलवारी चतुर्थी महिमा🌹*

*🔸मंगलवारी चतुर्थी – 09 मई 2023*

*पुण्यकाल : सूर्योदय से शाम 04:08 तक*

*🌹 जैसे सूर्य ग्रहण को दस लाख गुना फल होता है वैसे ही मंगलवारी चतुर्थी को होता है । बहुत मुश्किल से ऐसा योग आता है । मत्स्य पुराण, नारद पुराण आदि शास्त्र में इसकी भारी महिमा है ।*

*🌹 इस दिन अगर कोई जप, दान, ध्यान, संयम करता है तो वह दस लाख गुना प्रभावशाली होता है, ऐसा वेदव्यास जी ने कहा है ।*

*🔹माँगलिक है तो…🔹*

*🔹छोकरी माँगलिक है, शादी नहीं होती । छोकरा माँगलिक है शादी हो के टूट जाती है । मंत्र है “अं रां अं” एक माला जप करें और हनुमानजी को थोड़ा सिंदूर और तेल का चोला चढ़ावे सात मंगलवार अथवा शनिवार, तो माँगलिक ग्रह भाग जायेगा ।*

🔹 *कर्जे से छुटकारा के लिए* 🔹

*🔹मंगलवार चतुर्थी को सब काम छोड़ कर जप-ध्यान करना । जप, ध्यान, तप सूर्य-ग्रहण जितना फलदायी है । बिना नमक का भोजन करें, मंगल देव का मानसिक आह्वान करें । चन्द्रमा में गणपति की भावना करके अर्घ्य दें । कितना भी कर्जदार हो… काम धंधे से बेरोजगार हो… रोजी रोटी तो मिलेगी और कर्जे से छुटकारा मिलेगा ।*

*🔹सुखी खाँसी🔹*

*🔸एक चम्मच पीसी काली मिर्च को एक चम्मच देसी घी में भून करकर थोड़ा थोड़ा दिन भर चाटते रहने से सुखी खांसी में जादू सा आराम आता है ।*

*🔸 सुबह और शाम एक गिलास गुनगुने पानी में एक चम्मच नमक मिला कर अच्छे से गरारे करने से गले में कष्ट देने वाले कीटाणुओं का नाश हो जाता है और गले को आराम मिलता है ।*

*🔸 सुखी खांसी होने पर तुलसी, काली मिर्च, लौंग और अदरक की बनी मसाला चाय के सेवन से गले को बहुत आराम मिलता है । इसे पिने से गले और छाती का इन्फेक्शन दूर होता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा* *पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे महानगरपालिकेला निर्देश

पुणे दि. ८: पुणे महापालिकेतील १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवक, प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार कार्यवाही करुन फरकाची रक्कम मे अखेर अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे पुणे मनपा सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे मनपा प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत, तसेच महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष संभाजी भोसले यांच्यासह निवृत्त सेवक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे महापालिकेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील एकूण २ हजार ५५३ सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून तर सन २०१६ पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी १ हजार ९४३ आहेत. १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत एकूण ३५० सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विवरणपत्रे तयार केलेली आहेत. त्याअनुषंगाने तांत्रिक अडचणी, वेतन निश्चितीतील त्रुटी पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर सर्व अडचणी मेअखेरपर्यंत दूर करुन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिल्या.

महापालिकेअंतर्गत सेवकांची एकूण १०७ निवृत्तीवेतन प्रकरणे असून त्यातील त्रुटीची पूर्तता करून निवृत्तीवेतन धारकांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत २०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १० महिन्याचा फरक व वेतन आयोगाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्याप्रमाणे २०१६ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्व लाभ देण्यात आले आहेत, अशीही माहिती मनपाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. सदरचे कामदेखील तातडीने पूर्ण करुन हे अखेरपर्यंत ७ वा वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी. तसेच दोन महिन्यांनंतर सेवा उपदानाची रक्कम देखील अदा करावी, अशा सुचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्व प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.

पुणे महसूल विभागाची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न शेतकऱ्यांना वेळेत गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खते मिळतील याकडे लक्ष द्या- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

img 20230508 wa0018

पुणे, दि. ८: आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशकांची अजिबात कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी; बियाणे, कृषि निविष्ठांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे आणि भरारी पथके कार्यान्वित करुन चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करत गैरप्रकारांना आळा घालावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित पुणे महसूल विभाग खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक कौतुभ दिवेगावकर, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी, सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ज्ञानेश्वर खिलारी, संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी कृषि विभागाने आणि विद्यापीठांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे सांगून कृ‍षिमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कृषि विद्यापीठांनी पिकांचे नवनवीन वाण तयार करुन त्यांचा प्रचार प्रसार करावा. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पौष्टिक तृणधान्य लागवडीला चालना द्यायची असून ज्वारी, बाजरी, नाचणी आदींना लागवडीला वाढ आणि उत्पादकता वाढीसाठी उपाययोजना कराव्या. तेलबियांच्या लागवडीला चालना द्यावी. पारंपरिक पिकांऐवजी पर्यायी पिकांकडे कसे वळता येईल याचा विचार करावा, असेही ते म्हणाले.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले, कमीत कमी खते वापरुन नवीन प्रयोगाद्वारे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत. नैसर्गिक शेतीला चालना द्यायची असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव कार्यरत रहावे. शेतकऱ्यांना वेळेत खत, बियाणे मिळेल यासाठी प्रयत्न कराव. बँकांनी शेतकरी बांधवांना वेळेवर कर्ज देण्यासाठी प्रयत्न करावा. महावितरणने कृषिपंपांची प्रलंबित वीजजोडणी लवकरात लवकर द्यावी. शेतकऱ्यांना अडचण होणार नाही हे पहा, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी विक्रमी पीक घेण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांच्या यशकथा करुन कृषि विभागाने त्या इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल यासाठी समाजमाध्यमातून प्रसारित कराव्यात, असेही श्री. सत्तार म्हणाले.

यावेळी प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले, केंद्र शासनाचा पीक विविधीकरण (क्रॉप डायव्हर्सिफिकेशन) हा प्राधान्याचा कार्यक्रम असून त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी प्रयत्न करावेत. तृणधान्य आणि सूर्यफूल, जवस, करडई, मोहरी आदी तेलबियांकडे क्षेत्र वळवले पाहिजे. तूरीच्या लागवडीस चालना द्यायची आहे. जेथे यापूर्वी लागवड होत नव्हती अशा अपारंपरिक क्षेत्रात नाचणी लागवडीला प्रोत्साहन द्यावे, असेही ते म्हणाले.

विभागीय आयुक्त श्री. राव यांनी नैसर्गिक शेती, आरोग्यवर्धक खाद्यपदार्थांना चालना देण्यासह कृषि निविष्ठांच्या गुणवत्तेवर भर देण्याची गरज व्यक्त केली. पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा बनवून जास्तीत जास्त प्रसार करावा, असे ते म्हणाले.

कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद कृषि विभागाकडे अधिक काम देण्याच्या अनुषंगाने शिफारसी करण्यात येतील. पुणे जिल्ह्यात मागेल त्याला पाचट कुट्टी यंत्राच्या अनुषंगाने महा-डीबीटीमध्ये आवश्यक त्या तांत्रिक सुधारणांबाबत शिफारसी करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

बैठकीत पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे व कोल्हापूरचे विभागीय कृ‍षि सह संचालक, जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी जिल्ह्याचा खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा सादर केला. यामध्ये बियाणे, खते, किटकनाशकांची मागणी, उपलब्धता आणि पुरवठ्याचे नियोजन, यांत्रिकीकरण अंतर्गत कृषि अवजारांसाठी अर्थसहाय्य, फळबाग लागवड, ठिबकसह सूक्ष्म सिंचन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना तसेच अन्य योजनांचा, कृषिपंप वीजजोडणी, धरण प्रकल्पातील पाणीपरिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी भात रोपे लागवडीच्या अनुषंगाने विद्यापीठाने ‘एसओपी’ निश्चित करण्याची गरज व्यक्‍त केली. पुणे जिल्हा पीएमएफएमईच्या अंमलबजावणीमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस पाचट न जाळता कुजविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत असून गतवर्षी ४८ हजार हेक्टरवर पाचट कुजवले. यावर्षी ७५ हजार हेक्टरवरील पाचट कुजविण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे डॉ.देशमुख म्हणाले. जिल्ह्यात सलग दोन वर्षे पीक कर्जाचे विक्रमी वाटप करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्याच्या पर्वतीय क्षेत्रात नाचणी आणि रेशीम उत्पादनाला चालना दिल्याचे सांगितले. राज्यातील पहिले नाचणी खरेदी केंद्र हमी भावाने खरेदीसाठी सुरू केल्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला असून प्रत्येक तालुक्यात असे केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. ई-पंचनामे आणि ई-पीक पहाणीची जोडणी केली असल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देता येणे शक्य झाले आहे. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन, दुग्धव्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी पीएमएफएमईमध्ये जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. जिल्ह्यात डाळींब आणि द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने प्रमाणीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून सांगलीत एकात्मिक पीक तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिबड जमीन लागवडीखाली आणण्याच्या दृष्टीकोनातून बांबू लागवडीचा प्रयोग करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सातारा जिल्हाधिकारी यांनी महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राला लवकर मान्यता मिळण्याची गरज व्यक्त केली. स्ट्रॉबेरी बरोबरच मलबेरी, रास्पबेरी, ब्ल्यूबेरी लागवडीला चालना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जावळीसह पश्चिम पट्टयात नाचणी लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. महाबळेश्वरसह इतर तालुक्यात मधमाशी पालनाचा चालना देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम केळी लागवड मोठ्या प्रमाणात होत असून त्याला चालना देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बेदाणा साठवणुकीसाठी शीतगृह उभारणीसाठी आर्थिक मदतीची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी खरीप हंगाम २०२१ २२ पीक स्पर्धेतील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविलेल्या पुणे विभागातील शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. कीड रोग व्यवस्थापन बाबत तयार घडीपत्रिकांचे प्रकाशनही कार्यक्रमात करण्यात आले.

बैठकीस सर्व कृषी संचालक, महावितरण, जलसंपदा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुलाच्या मालमत्तेवर आईचा की पत्नीचा सर्वात जास्त अधिकार आहे? जाणून घ्या कायद्यानुसार योग्य उत्तर

देशात संपत्ती वादाची अनेक प्रकारे समोर येत असतात. अशा वेळी कायद्यानुसार तुम्हाला संपत्तीविषयी कोणता अधिकार आहे हे माहित असणे गरजेचे आहे.दरम्यान,मुलाच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार आहे?*

*👉🅾️🅾️👉आई जिवंत असताना मुलाचा मृत्यू झाला तरी खूप दुःख होते. हे असे कधीच घडू नये, मात्र तरीही असे कोणाच्या बाबतीत घडले तर त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.आजच्या काळात अनेक कारणांमुळे आईला स्वतःच्या मुलाच्या मालमत्तेत हक्क मिळत नाही, त्यामुळे प्रत्येक आईला तिच्या मुलाच्या मालमत्तेतील हक्क (मृत मुलाच्या मालमत्तेवर आईचा हक्क) माहिती असणे आवश्यक आहे.याबाबत हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 मध्ये मुलाच्या मालमत्तेवरील अधिकाराबाबत तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये, विवाहित आणि अविवाहित असताना मुलाच्या मृत्यूवर मालमत्तेची वेगवेगळ्या प्रकारे विभागणी केली जाते.*

*👉🟥🟥👉भारताचा कायदा काय म्हणतो?*

*अशी अनेक प्रकरणे समोर येतात ज्यात मृत मुलाच्या मालमत्तेत आईला हक्क दिला जात नाही, जे कायद्याच्या विरोधात आहे, परंतु अनेक मातांना याची माहितीही नसते आणि ती वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करू लागते. पण भारतीय कायद्याच्या मदतीने ती तिच्या हक्कांसाठी लढू शकते, ज्यामुळे तिच्या मृत मुलाच्या मालमत्तेमध्ये तिचा हक्कही मिळेल.*

*👉🅾️🅾️👉मृत मुलाच्या मालमत्तेवर आईचा हक्क जाणून घ्या*

*आईला तिच्या मृत मुलाच्या मालमत्तेत तितकाच हिस्सा मिळतो जो तिची पत्नी आणि मुलांना मिळतो. यासोबतच जर पतीच्या मालमत्तेची विभागणी केली असेल, तर त्या मालमत्तेत पत्नीलाही तिच्या मुलांइतकाच हक्क मिळतो.*

*👉🅾️🅾️👉हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 8 नुसार, मुलाच्या मालमत्तेवर पालकांचे हक्क परिभाषित केले आहेत. या अंतर्गत, आई मुलाच्या मालमत्तेची पहिली वारस असते, तर वडील मुलाच्या मालमत्तेचे दुसरे वारसदार असतात. जर मृत व्यक्तीच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि मुले असतील तर मालमत्तेची आई, पत्नी आणि मुले यांच्यात समान वाटणी केली जाते.*

*👉🟥🟥👉विवाहित आणि अविवाहित*

*हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, जर पुरुष अविवाहित असेल तर त्याची मालमत्ता पहिल्या वारसाला, त्याच्या आईला आणि दुसऱ्या वारसाला, त्याच्या वडिलांना हस्तांतरित केली जाईल. जर आई हयात नसेल तर मालमत्ता वडील आणि त्यांच्या सह-वारसांना हस्तांतरित केली जाईल.*

*👉🟥🟥👉जर मृत व्यक्ती हिंदू विवाहित पुरुष असेल आणि मृत्युपत्राशिवाय मरण पावला असेल, तर त्याच्या पत्नीला हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 नुसार मालमत्तेचा वारस मिळेल. अशा परिस्थितीत त्याची पत्नी वर्ग 1 वारस म्हणून गणली जाईल. ती मालमत्ता इतर कायदेशीर वारसांसोबत समान वाटून घेईल.*

मुलाच्या मालमत्तेवर आईचा की पत्नीचा सर्वात जास्त अधिकार आहे? जाणून घ्या कायद्यानुसार योग्य उत्तर

देशात संपत्ती वादाची अनेक प्रकारे समोर येत असतात. अशा वेळी कायद्यानुसार तुम्हाला संपत्तीविषयी कोणता अधिकार आहे हे माहित असणे गरजेचे आहे.दरम्यान,मुलाच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार आहे?*

*👉🅾️🅾️👉आई जिवंत असताना मुलाचा मृत्यू झाला तरी खूप दुःख होते. हे असे कधीच घडू नये, मात्र तरीही असे कोणाच्या बाबतीत घडले तर त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.आजच्या काळात अनेक कारणांमुळे आईला स्वतःच्या मुलाच्या मालमत्तेत हक्क मिळत नाही, त्यामुळे प्रत्येक आईला तिच्या मुलाच्या मालमत्तेतील हक्क (मृत मुलाच्या मालमत्तेवर आईचा हक्क) माहिती असणे आवश्यक आहे.याबाबत हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 मध्ये मुलाच्या मालमत्तेवरील अधिकाराबाबत तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये, विवाहित आणि अविवाहित असताना मुलाच्या मृत्यूवर मालमत्तेची वेगवेगळ्या प्रकारे विभागणी केली जाते.*

*👉🟥🟥👉भारताचा कायदा काय म्हणतो?*

*अशी अनेक प्रकरणे समोर येतात ज्यात मृत मुलाच्या मालमत्तेत आईला हक्क दिला जात नाही, जे कायद्याच्या विरोधात आहे, परंतु अनेक मातांना याची माहितीही नसते आणि ती वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करू लागते. पण भारतीय कायद्याच्या मदतीने ती तिच्या हक्कांसाठी लढू शकते, ज्यामुळे तिच्या मृत मुलाच्या मालमत्तेमध्ये तिचा हक्कही मिळेल.*

*👉🅾️🅾️👉मृत मुलाच्या मालमत्तेवर आईचा हक्क जाणून घ्या*

*आईला तिच्या मृत मुलाच्या मालमत्तेत तितकाच हिस्सा मिळतो जो तिची पत्नी आणि मुलांना मिळतो. यासोबतच जर पतीच्या मालमत्तेची विभागणी केली असेल, तर त्या मालमत्तेत पत्नीलाही तिच्या मुलांइतकाच हक्क मिळतो.*

*👉🅾️🅾️👉हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 8 नुसार, मुलाच्या मालमत्तेवर पालकांचे हक्क परिभाषित केले आहेत. या अंतर्गत, आई मुलाच्या मालमत्तेची पहिली वारस असते, तर वडील मुलाच्या मालमत्तेचे दुसरे वारसदार असतात. जर मृत व्यक्तीच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि मुले असतील तर मालमत्तेची आई, पत्नी आणि मुले यांच्यात समान वाटणी केली जाते.*

*👉🟥🟥👉विवाहित आणि अविवाहित*

*हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, जर पुरुष अविवाहित असेल तर त्याची मालमत्ता पहिल्या वारसाला, त्याच्या आईला आणि दुसऱ्या वारसाला, त्याच्या वडिलांना हस्तांतरित केली जाईल. जर आई हयात नसेल तर मालमत्ता वडील आणि त्यांच्या सह-वारसांना हस्तांतरित केली जाईल.*

*👉🟥🟥👉जर मृत व्यक्ती हिंदू विवाहित पुरुष असेल आणि मृत्युपत्राशिवाय मरण पावला असेल, तर त्याच्या पत्नीला हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 नुसार मालमत्तेचा वारस मिळेल. अशा परिस्थितीत त्याची पत्नी वर्ग 1 वारस म्हणून गणली जाईल. ती मालमत्ता इतर कायदेशीर वारसांसोबत समान वाटून घेईल.*

माझ्या नावाने बनावट खातं,सावध रहा  IPS अधिकारी विश्वास नांगरे – पाटलांनी केलं आवाहन

माझ्या नावाने बनावट खातं,सावध रहा
IPS अधिकारी विश्वास नांगरे – पाटलांनी केलं आवाहन
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid032sGCQ92VZfc8VWGfdmvhZANDNjBuvHCEQjP2TYCiJr9X8YL2ADMWwafM6apgNNigl&id=1187029518&mibextid=CDWPTG
*मुंबई:-सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एखाद्याचा मोबाईल हॅक करून किंवा सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून लुटण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांना सायबर भामट्याने दणका दिलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस महासंचालक असणाऱ्या विश्वास नांगरे-पाटील यांचे बनावट खाते साबयर गुन्हेगाराने तयार केल्याचं उघडकीस आलं आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत: माहिती देताना आपले बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याचं सांगितलंय. तसंच त्या अकाउंटवरून लोकांशी संबंधित व्यक्ती बोलत असून चॅट करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.*

*👉🟥🟥👉याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. पण बनावट खात्यावरून येणाऱ्या मेसेजेसना रिप्लाय करू नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका. यातून फसणुकीचा प्रयत्न होऊ शकतो असंही विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलंय.*

*👉🅾️🅾️👉ऑनलाइन फसवणूक टाळायची कशी?*

*एखाद्या व्यक्तीच्या नावाने बनावट खाते तयार करून सायबर गुन्हेगार त्यामाध्यमातून फसवणूक करतात.बनावट खाते ज्या व्यक्तीच्या नावे तयार करण्यात आलंय त्यांच्या ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवून पैशांची मागणीही केली जाते किंवा इतर माहिती मागण्यात येते. त्यामुळे अशा प्रकारे ऑनलाइन माहिती शेअर करणं टाळलं पाहिजे. बनावट खात्याच्या माध्यमातून फसवणूक होत असल्यास ज्याच्या नावाने मेसेज येत आहेत त्याच्याशी फोनवरून किंवा थेट संपर्क साधून याबाबत विचारणा करून घ्या. बनावट खात्याच्या माध्यमातून फसवणूक केली जातेय असं निदर्शनास आल्यास याबाबत पोलिसात रितसर तक्रार दिल्यास फसवणूक टाळता येऊ शकते.*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 07 मई 2023 दिन – रविवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 07 मई 2023*
*⛅दिन – रविवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ (गुजरात एवं महाराष्ट्र में वैशाख)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – द्वितीया रात्रि 08:15 तक तत्पश्चात तृतीया*
*⛅नक्षत्र – अनुराधा रात्रि 08:21 तक तत्पश्चात ज्येष्ठा*
*⛅योग – परिघ रात्रि 02:53 तक तत्पश्चात शिव*
*⛅राहु काल – शाम 05:21 से 07:10 तक*
*⛅सूर्योदय – 06:03*
*⛅सूर्यास्त – 07:10*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:36 से 05:20 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:14 से 12:58 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🔹युवाधन सुरक्षा (वीर्यरक्षा के उपाय)🔹*

*🔸1. सादा रहन-सहन बनायें – लाल रंग के भड़कीले एवं रेशमी कपड़े नहीं पहनो । तेल-फुलेल और भाँति-भाँति के इत्रों का प्रयोग करने से बचो । जीवन में जितनी तड़क-भड़क बढ़ेगी, इन्द्रियाँ उतनी चंचल हो उठेंगी, फिर वीर्यरक्षा तो दूर की बात है ।*

*🔸2. उपयुक्त आहार – आप स्वादलोलुप नहीं बनो । जिह्वा को नियंत्रण में रखो । क्या खायें, कब खायें, कैसे खायें और कितना खायें इसका विवेक नहीं रखा तो पेट खराब होगा, शरीर को रोग घेर लेंगे, वीर्यनाश को प्रोत्साहन मिलेगा और अपने को पतन के रास्ते जाने से नहीं रोक सकोगे ।*

*🔸3. शिश्नेन्द्रिय स्नान – शौच के समय एवं लघुशंका के समय साथ में गिलास अथवा लोटे में ठंड़ा जल लेकर जाओ और उससे शिश्नेन्द्रिय को धोया करो । कभी-कभी उस पर ठंड़े पानी की धार किया करो । इससे कामवृत्ति का शमन होता है और स्वप्नदोष नहीं होता ।*

*🔸4. उचित आसन एवं व्यायाम करो – जिसका शरीर स्वस्थ नहीं रहता, उसका मन अधिक विकारग्रस्त होता है । इसलिये रोज प्रातः व्यायाम एवं आसन करने का नियम बना लो । रोज प्रातः काल 3-4 मिनट दौड़ने और तेजी से टहलने से भी शरीर को अच्छा व्यायाम मिल जाता है । सूर्यनमस्कार 13 अथवा उससे अधिक किया करो तो उत्तम है । इसमें आसन व व्यायाम दोनों का समावेश होता है ।*

*🔸5. ब्रह्ममुहूर्त में उठो – स्वप्नदोष अधिकांशतः रात्रि के अंतिम प्रहर में हुआ करता है । इसलिये प्रातः चार-साढ़े चार बजे यानी ब्रह्ममुहूर्त में ही शैया का त्याग कर दो । जो लोग प्रातः काल देरी तक सोते रहते हैं, उनका जीवन निस्तेज हो जाता है ।*

*🔸6.दुर्व्यसनों से दूर रहो – शराब एवं बीड़ी-सिगरेट-तम्बाकू का सेवन मनुष्य की कामवासना को उद्यीप्त करता है । नशीली वस्तुओं के सेवन से फेफड़े और हृदय कमजोर हो जाते हैं, सहनशक्ति घट जाती है और आयुष्य भी कम हो जाता है ।अमरीकी डॉक्टरों ने खोज करके बतलाया है कि नशीली वस्तुओं के सेवन से कामभाव उत्तेजित होने पर वीर्य पतला और कमजोर पड़ जाता है ।*

*🔸7.सत्संग करो – आप सत्संग नहीं करोगे तो कुसंग अवश्य होगा । इसलिये मन, वचन, कर्म से सदैव सत्संग का ही सेवन करो ।*

*🔸8. शुभ संकल्प करो – दृढ़ संकल्प करने से वीर्यरक्षण में मदद होती है और वीर्यरक्षण से संकल्पबल बढ़ता है । विश्वासो फलदायकः । जैसा विश्वास और जैसी श्रद्धा होगी वैसा ही फल प्राप्त होगा । ब्रह्मज्ञानी महापुरुषों में यह संकल्पबल असीम होता है । वस्तुतः ब्रह्मचर्य की तो वे जीती-जागती मुर्ति ही होते हैं ।*

*🔸9. त्रिबन्धयुक्त प्राणायाम और योगाभ्यास करो –  त्रिबन्ध करके प्राणायाम करने से विकारी जीवन सहज भाव से निर्विकारिता में प्रवेश करने लगता है । मूलबन्ध से विकारों पर विजय पाने का सामर्थ्य आता है । उड्डियानबन्ध से आदमी उन्नति में विलक्षण उड़ान ले सकता है । जालन्धरबन्ध से बुद्धि विकसित होती है ।*

*🔸10. स्त्री-जाति के प्रति मातृभाव प्रबल करो श्री रामकृष्ण परमहंस कहा करते थे : “ किसी सुंदर स्त्री पर नजर पड़ जाए तो उसमें माँ जगदम्बा के दर्शन करो । ऐसा विचार करो कि यह अवश्य देवी का अवतार है, तभी तो इसमें इतना सौंदर्य है | माँ प्रसन्न होकर इस रूप में दर्शन दे रही है, ऐसा समझकर सामने खड़ी स्त्री को मन-ही-मन प्रणाम करो । इससे तुम्हारे भीतर काम विकार नहीं उठ सकेगा ।*

*🔹 रविवार विशेष🔹*

*🔹 रविवार के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🔹 रविवार के दिन मसूर की दाल, अदरक और लाल रंग का साग नहीं खाना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75.90)*

*🔹 रविवार के दिन काँसे के पात्र में भोजन नहीं करना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75)*

*🔹 रविवार सूर्यदेव का दिन है, इस दिन क्षौर (बाल काटना व दाढ़ी बनवाना) कराने से धन, बुद्धि और धर्म की क्षति होती है ।*

*🔹 रविवार को आँवले का सेवन नहीं करना चाहिए ।*

*🔹 स्कंद पुराण के अनुसार रविवार के दिन बिल्ववृक्ष का पूजन करना चाहिए । इससे ब्रह्महत्या आदि महापाप भी नष्ट हो जाते हैं ।*

*🔹 रविवार के दिन पीपल के पेड़ को स्पर्श करना निषेध है ।*

*🔹 रविवार के दिन तुलसी पत्ता तोड़ना वर्जित है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

error: Content is protected !!