Home Blog Page 162

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती बैठक संपन्न व्यवसायाच्या फायद्यासाठी दुभाजक तोडल्याचे आढळल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी

 

पुणे, दि. १६: पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज घेतला. दरम्यान रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांनी सेवारस्ता आणि मुख्य मार्गिका यामधील दुभाजक (डिव्हायडर) तोडल्याचे आढळून आल्यास संबंधिताचा व्यवसाय परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीस पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*खेड शिवापूर ते नवले पूलदरम्यान दररोज सरासरी ३०० वाहनांवर कारवाई*
यापूर्वी झालेल्या समितीच्या निश्चित करण्यात आल्याप्रमाणे कात्रज नवीन बोगद्याच्या अलिकडे जांभूळवाडीनजीक पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे. या रस्त्यावर २४ तास पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून १० अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पोलीस वाहनांद्वारे गस्त घालण्यात येत असून त्याचा चांगला परिणाम झाला आहे. या टप्प्यात विविध वाहतूक नियमांचे उल्लंघनाबद्दल दररोज सरासरी ३०० वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त श्री. मगर यांनी दिली.

दरम्यान व्यवसायाला लाभ व्हावा यासाठी काही हॉटेलचालक तसेच अन्य व्यावसायिक मुख मार्गिका आणि सेवारस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवारस्त्यावरील वाहन अचानक थेट मुख्य मार्गिकेवर तसेच मार्गिकेवरील वाहन अचानक वळत असल्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस करावी. गरज पडल्यास संबंधितांचे व्यवसाय परवानेही रद्द करण्यात येतील, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

वेगमर्यादा तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलीस आणि शहर वाहतूक विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे इंटरसेप्टर वाहनासाठीचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. या रस्त्यावर प्रत्येक मार्गिकेमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले असून ते पोलीस विभागाच्या सॉफ्टवेअरशी जोडावेत, जेणेकरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येईल, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

*जड वाहनांची वेगमर्यादा ४० कि.मी. प्रतितास करणार*
कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा ६० कि.मी. वरुन ४० कि.मी. प्रतितास इतकी घटवण्याची अधिसूचना तात्काळ काढण्याचे निश्चित करण्यात आले. खेड शिवापूर पथकर प्लाझा येथे सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी सतत उद्घोषणा करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

विविध यंत्रणांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या रस्त्यावर ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्यासाठी इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण (एक्झिट रॅम्प) तयार करण्याबाबत पाहणी केली असल्याचे एनएचएआयचे प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी सांगितले. याबाबत आवश्यक तो अभ्यास करुन तात्काळ प्रस्तावाला संबंधित यंत्रणेची मान्यता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

*शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती*
सर्व शासकीय कार्यालयात दुचाकीने येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी परिवहन विभाग तसेच पोलीसांनी संयुक्तपणे जनजागृती करावी. ‘एक दिवस डोक्यासाठी’ अशा स्वरुपाची मोहीम राबवत हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रबोधन तसेच दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. हेल्मेटचे महत्व पटवून देण्यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करावेत, असेही ते म्हणाले.

यावेळी अहमदनगर रस्त्यावरील अपघात रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली. या रस्त्यावरील अपघाताची ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित करण्यात आली असून उपाययोजनांविषयी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 16 मई 2023 दिन – मंगलवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 16 मई 2023*
*⛅दिन – मंगलवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ (गुजरात एवं महाराष्ट्र में वैशाख)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – द्वादशी रात्रि 11:36 तक तत्पश्चात त्रयोदशी*
*⛅नक्षत्र – उत्तर भाद्रपद सुबह 08:15 तक तत्पश्चात रेवती*
*⛅योग – प्रीति रात्रि 11:16 तक तत्पश्चात आयुष्मान*
*⛅राहु काल – शाम 03:55 से 05:34 तक*
*⛅सूर्योदय – 05:59*
*⛅सूर्यास्त – 07:14*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:32 से 05:15 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:14 से 12:57 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – द्वादशी को पूतिका (पोई) खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*द्वादशी में तुलसी पत्ता तोड़ना वर्जित है ।*

*🔸भगवदप्राप्ति के १४ विघ्न🔸*

*👉 १) स्वास्थ्य के प्रति लापरवाही ।*
*👉 २) खानपान में अनियमितता ।*
*👉 ३) साधन आदि में संदेह ।*
*👉 ४) सद्गुरु का संग या सत्संग न मिलना ।*
*👉 ५) नियमनिष्ठा न होना ।*
*👉 ६) प्रसिद्धि की चाह ।*
*👉 ७) कुतर्क ।*
*👉 ८) प्राणायाम व जप का नियम छोड़ना ।*
*👉 ९) बाहरी सुख में ही संतुष्ट होना ।*
*👉 १०) भगवान को छोड़कर संसार की तुच्छ चीजों की कामना करना ।*
*👉 ११) ब्रह्मचर्य का अभाव ।*
*👉 १२) कुसंग ।*
*👉 १३) दोष दर्शन ।*
*👉 १४) साम्प्रदायिकता ।*

*🔹रोगप्रतिरोधक शक्ति (Immunity) बढाने हेतु सशक्त उपाय 🔹*

*🔸१. जो लोग सुबह की शुद्ध हवा में प्राणायाम करते हैं उनमें प्राणबल बढ़ने से रोगप्रतिकारक शक्ति बढ़ती है और इससे कई रोगकारी जीवाणु मर जाते हैं । जो प्राणायाम के समय एवं उसके अलावा भी गहरा श्वास लेते हैं उनके फेफड़ों के निष्क्रिय पड़े वायुकोशों को प्राणवायु मिलने लगती है और वे सक्रिय हो उठते हैं । फलत: शरीर की कार्य करने की क्षमता बढ़ जाती है, जिससे मन प्रसन्न रहता है ।*

*🔸२. सूर्यकिरणों में अद्भुत् रोगप्रतिकारक शक्ति है । संसार का कोई वैद्य अथवा कोई मानवी उपचार उतना दिव्य स्वास्थ्य और बुद्धि की दृढ़ता नहीं दे सकता है जितना सुबह की कोमल सूर्य-रश्मियों में छुपे ओज-तेज से मिलता है । प्रात:काल सूर्य को अर्घ्य-दान, सूर्यस्नान ( सिर को कपड़े से ढककर ८ मिनट सूर्य की ओर मुख व १० मिनट पीठ करके बैठना ) और सूर्यनमस्कार करने से शरीर ह्रष्ट-पुष्ट व बलवान बनता है ।*

*🔸३. तुलसी के १-२ पौधे घर में जरूर होने चाहिए । दूसरी दवाएँ कीटाणु नष्ट करती है लेकिन तुलसी की हवा तो कीटाणु पैदा ही नही होने देती है । तुलसी के पौधे का चहुँ ओर २०० मीटर तक प्रभाव रहता है । जो व्यक्ति तुलसी के ५-७ पत्ते सुबह चबाकर पानी पीता हैं उसकी स्मरणशक्ति बढ़ती है, ब्रह्मचर्य मजबूत होता है । सैकड़ो बीमारियाँ दूर करने की शक्ति तुलसी के पत्तों में है । तुलसी के एक चुटकी बीज रात को पानी में भिगोकर सुबह पीने से आप दीर्घजीवी रहेंगे और बहुत सारी बीमारियों को भगाने में आपकी जीवनीशक्ति सक्षम एवं सबल रहेगी ।*

*🔸४. नीम के पत्ते, फल, फूल, डाली, जड़ इन पाँचों चीजों को देशी घी के साथ मिश्रित करके घर में धूप किया जाय तो रोगी को तत्काल आराम मिलता है, रोगप्रतिकारक शक्तिवर्धक वातावरण सर्जित हो जाता है ।*

*🔸५. टमाटर, फूलगोभी, अजवायन व संतरा रोगप्रतिकारक शक्ति बढ़ाते हैं अत: भोजन में इनका उपयोग करें । हल्दी, जीरा, दालचीनी एवं धनिया का उपयोग करें । परिस्थितियों को देखते हुए अल्प मात्रा में लहसुन भी डाल सकते हैं ।*

*🔸६. १५० मि.ली. दूध में आधा छोटा चम्मच हल्दी डाल के उबालकर दिन में १-२ बार लें ।*

*🔸७. रोगप्रतिरोधक शक्ति बढ़ाने हेतु प्राणदा टेबलेट, ब्राह्म रसायन, होमियो तुलसी गोलियाँ, तुलसी अर्क (१०० मि.ली. पानी में १ से ५ बूँद आयु व प्रकृति अनुसार), होमियों पॉवर केअर आदि का सेवन लाभदायी है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार

कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५: विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पोलिस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलिस महासंचालक वाहतूक रविंद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी यावेळी उपस्थित होते.

बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२१ मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या २० हजार ८६० आहे तर त्यात ९८२९ जणांचा मृत्यू झाला आहे.

गृह विभागाच्या यासंदर्भात सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणे हा अजामिनपात्र गुन्हा करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात प्रवाशांचा होणारा मृत्यू यासाठी वाहनाचालकांविरुद्ध प्रभावी कारवाई होण्यासाठी कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करावी. विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांना त्याच्या कक्षेत आणावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग यावरील अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. मुंबई- पुणे महामार्गावर असलेल्या उतारावरील ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सूचना फलकांसोबतच रंब्लर बसविणे यासारख्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

००००

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

*चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार*

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
००००

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 15 मई 2023 दिन – सोमवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 15 मई 2023*
*⛅दिन – सोमवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ (गुजरात एवं महाराष्ट्र में वैशाख)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – एकादशी रात्रि 01:03 तक तत्पश्चात द्वादशी*
*⛅नक्षत्र – पूर्व भाद्रपद सुबह 09:08 तक तत्पश्चात उत्तर भाद्रपद*
*⛅योग – विष्कम्भ रात्रि 01:30 तक तत्पश्चात प्रीति*
*⛅राहु काल – सुबह 07:38 से 09:18 तक*
*⛅सूर्योदय – 05:59*
*⛅सूर्यास्त – 07:13*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:33 से 05:16 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:14 से 12:57 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – विष्णुपदी संक्रांति, वृषभ संक्रांति, अपरा एकादशी*
*⛅विशेष – एकादशी को शिम्बी (सेम) खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹विष्णुपदी संक्रांति : 15 मई 2023*🔹

*🌹 पुण्यकाल : सूर्योदय से दोपहर 11:58 तक*

*🌹 विष्णुपदी संक्रांति में किये गये जप-ध्यान व पुण्यकर्म का फल लाख गुना होता है । (पद्म पुराण)*

*🌹 अपरा एकादशी – 15 मई 2023 🌹*

*🔹एकादशी में क्या करें, क्या न करें ?🔹*

*🌹1. एकादशी को लकड़ी का दातुन तथा पेस्ट का उपयोग न करें । नींबू, जामुन या आम के पत्ते लेकर चबा लें और उँगली से कंठ शुद्ध कर लें । वृक्ष से पत्ता तोड़ना भी वर्जित है, अत: स्वयं गिरे हुए पत्ते का सेवन करें ।*

*🌹2. स्नानादि कर के गीता पाठ करें, श्री विष्णुसहस्रनाम का पाठ करें ।*

*🌹हर एकादशी को श्री विष्णुसहस्रनाम का पाठ करने से घर में सुख-शांति बनी रहती है ।*
*राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।*
*सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ।।*

*एकादशी के दिन इस मंत्र के पाठ से श्री विष्णुसहस्रनाम के जप के समान पुण्य प्राप्त होता है l*

*🌹3. `ॐ नमो भगवते वासुदेवाय’ इस द्वादश अक्षर मंत्र अथवा गुरुमंत्र का जप करना चाहिए ।*

*🌹4. चोर, पाखण्डी और दुराचारी मनुष्य से बात नहीं करना चाहिए, यथा संभव मौन रहें ।*

*🌹5. एकादशी के दिन भूल कर भी चावल नहीं खाना चाहिए न ही किसी को खिलाना चाहिए । इस दिन फलाहार अथवा घर में निकाला हुआ फल का रस अथवा दूध या जल पर रहना लाभदायक है ।*

*🌹6. व्रत के (दशमी, एकादशी और द्वादशी) – इन तीन दिनों में काँसे के बर्तन, मांस, प्याज, लहसुन, मसूर, उड़द, चने, कोदो (एक प्रकार का धान), शाक, शहद, तेल और अत्यम्बुपान (अधिक जल का सेवन) – इनका सेवन न करें ।*

*🌹7. फलाहारी को गोभी, गाजर, शलजम, पालक, कुलफा का साग इत्यादि सेवन नहीं करना चाहिए । आम, अंगूर, केला, बादाम, पिस्ता इत्यादि अमृत फलों का सेवन करना चाहिए ।*

*🌹8. जुआ, निद्रा, पान, परायी निन्दा, चुगली, चोरी, हिंसा, मैथुन, क्रोध तथा झूठ, कपटादि अन्य कुकर्मों से नितान्त दूर रहना चाहिए ।*

*🌹9. भूलवश किसी निन्दक से बात हो जाय तो इस दोष को दूर करने के लिए भगवान सूर्य के दर्शन तथा धूप-दीप से श्रीहरि की पूजा कर क्षमा माँग लेनी चाहिए ।*

*🌹10. एकादशी के दिन घर में झाडू नहीं लगायें । इससे चींटी आदि सूक्ष्म जीवों की मृत्यु का भय रहता है ।*

*🌹11. इस दिन बाल नहीं कटायें ।*

*🌹12. इस दिन यथाशक्ति अन्नदान करें किन्तु स्वयं किसीका दिया हुआ अन्न कदापि ग्रहण न करें ।*

*🌹13. एकादशी की रात में भगवान विष्णु के आगे जागरण करना चाहिए (जागरण रात्र 1 बजे तक) ।*

*🌹14. जो श्रीहरि के समीप जागरण करते समय रात में दीपक जलाता है, उसका पुण्य सौ कल्पों में भी नष्ट नहीं होता है ।*

*🔹 इस विधि से व्रत करनेवाला उत्तम फल को प्राप्त करता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

सीबीआय संचालकपदी आयपीएस प्रवीण सूद यांची नियुक्ती!

img 20230515 wa0004
आयपीएस प्रवीण सूद यांची सीबीआयच्या नवीन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सुबोध कुमार जैस्वाल यांची जागा घेतील. आयपीएस प्रवीण सूद 25 मे रोजी ते पदभार स्वीकारतील.*

*👉🔴🔴👉पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सीबीआय प्रमुखासाठी तीन नावांची निवड केली होती, त्यापैकी आयपीएस प्रवीण सूद यांच्या नावाला मान्यता देण्यात आली असून त्यांची सीबीआय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांची नियुक्ती ही दोन वर्षासाठी असणार आहे.*

*👉🅾️🅾️👉सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ 25 मे 2023 रोजी समाप्त होत आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीची दि.13 (शनिवार) रात्री बैठक झाली.त्यामध्ये सीबीआयच्या संचालकपदासाठी 3 वरिश्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या नावांवर विचार करण्यात आला. आता अखेर प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. प्रवीण सूद हे सन 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.*

महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकात लावली होती प्रचाराला हजेरी,तिथे काय लागला निकाल?

*मुंबई – कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा निकाल काल शनिवारी (ता. 13 मे) जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपला धूळ चारली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी सुद्धा कर्नाटकात प्रचार सभांना हजेरी लावली होती.*

*👉🔴🔴👉कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आणि राजकीय पक्षांनी निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली. या निवडणुकीचा निकाल काल शनिवारी (ता. 13 मे) जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपला धूळ चारली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी सुद्धा कर्नाटकात प्रचार सभांना हजेरी लावली होती.*

*👉🟥🟥👉राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांनी कर्नाटकात जाऊन आपापाल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार केला.*

*👉🅾️🅾️👉उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुबळी, धारवाड आणि इंडी या मतदारसंघात प्रचार केला होता. यातील हुबळी तालुक्यातील तीनपैकी दोन जागांवर भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. तर इंडी आणि धारवाडच्या जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापू आणि उडुपी या मंतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झालेला आहे.*

*👉🔴🔴👉निपाणी मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला होता. पण त्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील निपाणीत हजेरी लावली होती. पण त्यांच्या देखील उमेदवाराचा येथे पराभव झाला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये प्रचार केला होता. तेथे काँग्रेसने बाजी मारली असून ते खानापूर येथेही गेले होते, खानापूरमध्ये मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले असून या ठिकाणी भाजपचा विजय झाला.*

*👉🟥🟥👉कर्नाटकातील बंडखोरही झाले पराभूत*

*2019 मध्ये बेळगाव – कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) सरकारविरोधात 17 आमदारांनी बंड केले होते. या 17 पैकी 11 आमदारांचा या निवडणुकीत जोरदार पराभव झाला आहे. पक्षांतर केलेल्या १७ मतदारसंघांपैकी फक्त ६ ठिकाणी उमेदवारांना आपली आमदारकी वाचवता आली आहे. 11 ठिकाणी काँग्रेस, जनता दलाने विजय मिळवत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवला आहे.*

*👉🅾️🅾️👉महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव*

*बेळगाव-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला पाहायला मिळत आहे. कर्नाटकात असलेली महाराष्ट्र एकीकरण समिती ही कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी कन्नड वासियांशी आणि राज्य सरकारशी कायम लढा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील आपले काही उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते. यातील तिन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती.*

महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकात लावली होती प्रचाराला हजेरी,तिथे काय लागला निकाल?

*मुंबई – कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा निकाल काल शनिवारी (ता. 13 मे) जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपला धूळ चारली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी सुद्धा कर्नाटकात प्रचार सभांना हजेरी लावली होती.*

*👉🔴🔴👉कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आणि राजकीय पक्षांनी निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली. या निवडणुकीचा निकाल काल शनिवारी (ता. 13 मे) जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपला धूळ चारली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी सुद्धा कर्नाटकात प्रचार सभांना हजेरी लावली होती.*

*👉🟥🟥👉राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांनी कर्नाटकात जाऊन आपापाल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार केला.*

*👉🅾️🅾️👉उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुबळी, धारवाड आणि इंडी या मतदारसंघात प्रचार केला होता. यातील हुबळी तालुक्यातील तीनपैकी दोन जागांवर भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. तर इंडी आणि धारवाडच्या जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापू आणि उडुपी या मंतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झालेला आहे.*

*👉🔴🔴👉निपाणी मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला होता. पण त्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील निपाणीत हजेरी लावली होती. पण त्यांच्या देखील उमेदवाराचा येथे पराभव झाला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये प्रचार केला होता. तेथे काँग्रेसने बाजी मारली असून ते खानापूर येथेही गेले होते, खानापूरमध्ये मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले असून या ठिकाणी भाजपचा विजय झाला.*

*👉🟥🟥👉कर्नाटकातील बंडखोरही झाले पराभूत*

*2019 मध्ये बेळगाव – कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) सरकारविरोधात 17 आमदारांनी बंड केले होते. या 17 पैकी 11 आमदारांचा या निवडणुकीत जोरदार पराभव झाला आहे. पक्षांतर केलेल्या १७ मतदारसंघांपैकी फक्त ६ ठिकाणी उमेदवारांना आपली आमदारकी वाचवता आली आहे. 11 ठिकाणी काँग्रेस, जनता दलाने विजय मिळवत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवला आहे.*

*👉🅾️🅾️👉महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव*

*बेळगाव-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला पाहायला मिळत आहे. कर्नाटकात असलेली महाराष्ट्र एकीकरण समिती ही कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी कन्नड वासियांशी आणि राज्य सरकारशी कायम लढा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील आपले काही उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते. यातील तिन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती.*

पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात साजरी करणार* *किल्ले पुरंदर येथील शासकीय जयंती कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

img 20230514 wa0036

पुणे दि.१४- पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

किल्ले पुरंदर येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी अधिकारी मिनाज मुल्ला , उप विभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील . गटविकास अधिकारी अमर माने, पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज जयंती नियमितपणे साजरी केल्याबद्दल पंचायत समिती,पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडचे अभिनंदन करून पालकमंत्री पाटील म्हणाले, परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे.

छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार जगताप म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज कुशल प्रशासक होते. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यात येणार आहे. नागरिकांनी यात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

श्री.शिवतारे म्हणाले,छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केले. स्वराज्य आणि स्वधर्म प्रेमाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि विचारांचे अनुसरण करण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक लढाई जिंकली. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढू बुद्रुक येथे उभारण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल.

कार्यक्रमपूर्वी सुवासिनींनी बाल शंभुराजेंचा पाळणा म्हटला. मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले. तत्पूर्वी पालकमंत्री श्री.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कोथरूडमधील महिला व तरुणींना ‘द केरल स्टोरी’चे मोफत स्क्रिनिंग पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम

img 20230514 wa0012
img 20230514 wa0012

सध्या बहुचर्चित द केरल स्टोरी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला असून, समाजातील ज्वलंत विषय अधिकाधिक माहिला आणि तरुणींनी हा विषय समजून घ्यावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष उपक्रम घेतला आहे. नामदार पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडमधील दहा हजार पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, आजपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त महिलांनी हा सिनेमा पाहिला आहे.

समाजातील ज्वलंत विषय मांडण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. द केरल स्टोरीज हा असाच समाजातील ज्वलंत विषय मांडणारा सिनेमा असून, सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला आहे. हजारो तरुणी आणि तरुणी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

कोथरूड मतदारसंघातील सर्व महिलांना ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील सत्य परिस्थितीची जाणीव व्हावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला असून, हा सिनेमा मोफत दाखवण्यात येत आहे. जवळपास दहा हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहावा यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. गेल्या आठ दिवसांत पाच हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहिला आहे.

error: Content is protected !!