Home Blog Page 119

केंद्र सरकार… #9YearsOfSeva #Modi@9 #MaanKiBaat

🌼 केंद्र सरकार…
#9YearsOfSeva
#Modi@9
#MaanKiBaat

img 20230829 wa0014

🌼”पीएम_मोदीजी ने आज, 28 अगस्त को वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से सरकारी विभागों और संगठनों में चयनित 51,000 कर्मियों को नियुक्ति-पत्र प्रदान किया”
🌼”आसमान में सिर उठाकर
घने बादलों को चीरकर
रोशनी का संकल्प ले
अभी तो सूरज उगा है।…
चंद्रयान-3 की सफलता पर #प्रधानमंत्री_मोदीजी ने पढ़ी कविता”
🌼”भारत का मिशन चंद्रयान, नारी शक्ति का भी जीवंत उदाहरण है,इस पूरे मिशन में अनेकों Women Scientists और Engineers सीधे तौर पर जुड़ी रही हैं”- #पीएम_मोदीजी
🌼”सितम्बर में होने जा रही G-20 Summit के लिए भारत पूरी तरह से तैयार है,G-20 Summit के इतिहास में ये अब तक की सबसे बड़ी भागीदारी होगी”- #पीएम_मोदीजी
🌼”कुछ ही दिनों पहले चीन में world University Games हुए थे,इन खेलों में इस बार भारत की Best Ever Performance रही है, हमारे खिलाड़ियों ने कुल 26 पदक जीते, जिनमें से 11 Gold Medal थे”- #पीएम_मोदीजी
🌼”इस बार 15 अगस्त के दौरान देश ने ‘सबका प्रयास’ का सामर्थ्य देखा,सभी देशवासियों के प्रयास ने ‘हर घर तिरंगा अभियान’ को वास्तव में ‘हर मन तिरंगा अभियान’ बना दिया”- #पीएम_मोदीजी
🌼”अविश्वास के इस माहौल में पूरी संवेदनशीलता और विनम्रता के साथ ”विश्वास का झंडा” लेकर जो देश आपके सामने खड़ा है, वह है भारत”- #पीएम_मोदीजी
🌼”9 साल पहले आज के ही दिन #प्रधानमंत्री_जन_धन_योजना लॉन्च की गई थी,इस योजना ने गांव और गरीब के आर्थिक सशक्तिकरण के साथ ही रोजगार निर्माण में भी बहुत बड़ी भूमिका निभाई है”- #पीएम_मोदीजी
🌼”मोदीजी ने कहा – संस्कृत को लेकर गर्व का भाव बढा है, इस बात की बडी खुशी है की लोगों के मन में संस्कृत को लेकर जागरूकता बढी है और इसके प्रति गौरव का भाव भी बडा है,मोदीजी ने आने वाले विश्व संस्कृत दिवस पर लोगों को बधाई भी दि है”
🌼”29अगस्त को तेलुगु भाषा दिवस के रूप में मनाया जाएगा”
– #पीएम_मोदीजी
🌼”ईवाई- पार्थेनॉन की पार्टनर #अवंतिका_तोमर का कहना है कि भारत की शिक्षा पर विश्वास है और 2047 में भारत की उच्च शिक्षा वर्ल्ड क्लास स्टॅंडर्ड के साथ न्यायसंगत, समावेशी और सुलभ होनी चाहिए”
🌼”9 साल में 47 साल के बराबर आगे बढा भारत…
पिछले कई वर्षों में भारत के डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ने बहुत बडा बदलाव लाया है और आर्थिक विकास का एक नया मॉडल तैयार किया है”- #नंदन_नीलेकणी, आधार के संस्थापक

28 AUGUST 2023

#Modi@9
#प्रधानमंत्री_मोदीजी का मूलमंत्र – “सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास और
सबका प्रयास… से होगा देश का विकास!
“नीयत साफ, सोच ईमानदार
काम शानदार, बात दमदार”
#तेज_रफ्तार…
#मोदी_सरकार!
#NarendraModi ji

💗🇮🇳”हमें वो भारत बनाना है…
जो पूज्य बाबू के सपनों का था,
जो हमारे स्वतंत्रता सेनानियों का सपना था,
जो हमारे वीर शहीदों का था,
जो हमारी वीरांगनाओं का था”
– #पीएम_मोदीजी

💗🇮🇳”हमें इन तीन बुराइयों से लड़ना होगा…
• भ्रष्टाचार के खिलाफ,
• परिवारवाद के खिलाफ,
• तुष्टिकरण के खिलाफ…”
– #पीएम_मोदीजी
– (15 AUGUST 2023)

💗🇮🇳”#प्रधानमंत्री_नरेंद्र_मोदी जी ने कहा कि भारत में दुनिया के विश्वास के पीछे कई कारण हैं और इनमें…
1.केंद्र में एक निर्णायक सरकार का होना
2. इसके द्वारा बुनियादी ढांचे के विकास में अद्वितीय निवेश करना,
3. जनसांख्यिकीय लाभांश प्राप्त करने के लिए निवेश करना,
4. युवाओं को कुशल बनाना,
5. ‘जीवन जीने की सुगमता’ और ‘व्यवसाय की सुगमता’ के लिए केंद्र सरकार की प्रतिबद्धता शामिल है…”

💗🇮🇳”भाजपा के विजय अभियान का रहस्य छिपा है ‘#त्रिवेणी’ में…
इसकी पहली शक्ति है- *भाजपा सरकारों के कार्य*
दूसरी शक्ति है- *भाजपा सरकारों की कार्य संस्कृति*
तीसरी शक्ति है- *भाजपा कार्यकर्ताओं का सेवा-भाव*
– #पीएम_मोदीजी

💗🇮🇳”भारत को आकार देने वाले रुझानों के आधार पर बजट में पांच Transformative Strategies पर ध्यान दिया गया…
पांच प्रमुख ट्रेंड …
1.शहरीकरण,2.इन्फ्रास्ट्रक्चर, 3.डिजिटलीकरण,4.ग्रीन ग्रोथ, 5.महिलाओं के नेतृत्व में विकास”

💗🇮🇳आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने आजादी के ‘अमृत काल’ में ‘पंच प्रण’ का आह्वान किया…
अमृतकाल के पंच प्रण…
1. विकसित भारत का लक्ष्य
2.गुलामी के हर अंश से मुक्ति
3. अपनी विरासत पर गर्व
4. एकता और एकजुटता
5. नागरिकों में कर्तव्य की भावना
-(15 AUGUST 2022)
💗🇮🇳💗

💗🇮🇳 “वैश्विक मंदी के बीच भारत की चमक बनाये रखने में मदत करने वाले पाच कारक…
1.भारत का कम विदेशी कर्ज
2.वित्तीय बचत में बदलाव
3.कम कॉरपोरेट कर्ज
4.डीबीटी की सफलता और
5.सरकार का कैपैक्स पर जोर”

पुणे हे निसर्गोपचाराचे विद्यापीठ – ना. चंद्रकांतदादा पाटील

img 20230827 wa0026
क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे ऑटोमॅटिक थर्मल मसाज बेड व गोल्ड मॅट चे लोकार्पण*

पुणे हे निसर्गोपचाराचे विद्यापीठ झाले असून येथे विविध थेरपींच्या माध्यमातून नागरिकांच्या व्याधी दूर करण्याचे मोठे कार्य चालते असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि वेस्टर्न इंडिया फोर्जिंग च्या वतीने हैप्पी मेडिकेयरच्या ऑटोमॅटिक थर्मल मसाज बेड, जर्मेनियम गोल्ड मॅट आणि वेस्ट बेल्ट च्या सुविधाचे कोथरूड येथे अंतर्नाद योग केंद्रात लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग लि.चे सी. एम. डी अरुण जिंदल, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मा. नगरसेवक शाम देशपांडे, मा.दीपक पोटे,मा.जयंत भावे,मा. दिलीप उंबरकर, आर पी आय चे ऍड. मंदार जोशी,हैप्पी मेडिकेयर चे धनराज पाटील,भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,पतीत पावन संघटनेचे शहर पालक मनोज नायर,शहर चिटणीस प्रशांत हरसूले,डॉ. संदीप बुटाला,ऍड. मिताली सावळेकर,विश्वजित देशपांडे,उद्योजक सारंग राडकर, अक्षय मोरे, विशाल भेलके, सेवाव्रती फाउंडेशन चे प्रदीप देवकुळे,सार्थक हॉलिस्टिक हेल्थ केयर सेंटरचे सुनील ठिगळे,प्रभाग सरचिटणीस निलेश गरुडकर,ऍड.प्राचीताई बगाटे,संगीताताई आदवडे,संगीताताई शेवडे इ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांना भौतिक गरजा पूर्ण झाल्यानंतर शारीरिक व्याधीने ग्रासू नये अशी चिंता भेडसावते, धावपळीच्या दिनक्रमात विविध शारीरिक त्रास होतं असतातच, अश्या वेळी थर्मल मसाज,गोल्ड मॅट जर्मेनियम थेरपीने इतर व्याधी दूर करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. अश्या कल्पक व समाजोपयोगी उपक्रम घेऊन येणाऱ्यांसाठी माझं दार कायम उघडे असून अश्या प्रकल्पांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असेही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन नेहमीच सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन उपक्रम राबवत असते, त्यास अनुसरून गरजूना विविध आजारांवर, शारीरिक व्याधिंवर मोफत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन ने हे केंद्र सुरु केले असल्याचे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.ही सुविधा मोफत उपलब्ध केली असून त्याचा लाभ घेण्यासाठी नावं नोंदणी आवश्यक असून गरजू व्यक्तींनी 9850999995 ह्या क्रमांकावर संपर्क केल्यावर, नोंदणी करून त्यांना ही सोय पूर्णपणे मोफत उपलब्ध केली जाईल असेही संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.तसेच पुणे परिसरातील विविध उद्योजकांनी लोकोपयोगी उपक्रमासाठी आपला सी एस आर निधी सढळपणे खर्च करावा व नागरिकांच्या गरजा ओळखून त्याचे नियोजन करावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले.
यापुढील काळात क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विविध लोकोपयोगी प्रकल्पांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे उद्योजक अरुण जिंदल म्हणाले. समाजातील उणीवा दूर करण्यासाठी व सामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा मोफत उपलब्ध करण्यासाठी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग आपल्या सी एस आर निधीचा विनियोग करत असते त्यातून संदीप खर्डेकर सारख्या सामान्यांसाठी झटणाऱ्यांना मदत करताना विशेष आनंद होतो असेही अरुण जिंदल म्हणाले.
मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व वस्ती विभागातील घरेलू कामगार महिलांना प्राधान्याने ही सुविधा उपलब्ध केली जाईल असे सांगितले.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष – क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पुणे, दि. २९ : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सूर्यफूल या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पीकस्पर्धा राबविण्यात येते.

*स्पर्धेसाठी अटी व शर्ती*: स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी ३०० रूपये व आदिवासी गटासाठी १५० रूपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी व ती जमीन तो स्वत: कसत असावा. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल.

पीकस्पर्धेत सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार असून स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

*अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे* :-
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खात्याच्या चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील.

सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय बक्षीस तालुका पातळीवर प्रथम क्रमांकासाठी ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये, जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम ५० हजार द्वितीय ४० हजार तसेच तृतीय ३० हजार रुपये बक्षीस असेल.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. 29 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील महार, नवबौद्ध, बुरूड, वाल्मिकी, मेहतर, खाटीक या समाजातील वंचित घटकातील नागरिकांसाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसएफडीसी) यांच्या विविध कर्ज योजना ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या सर्व योजना व राज्य शासनाच्या अनुदान बीज भांडवल प्रशिक्षणासाठी अर्जदारांनी एनबीआर पोर्टलवरून अर्ज करावेत. तसेच राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसकेएफडीसी) यांच्या योजनेसाठी https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जदारांना अर्ज करता येतील.

एनएसकेएफडीसी यांच्या अंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी अर्जदारांनी नवयुग बेनीफिशरी रजिस्ट्रेशन (एनबीआर) पोर्टल https://nbrmahapreit.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं.१०३/१०४, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे – ४११०१५, दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०३०५८ वर संपर्क साधावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. एम. माने यांनी केले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गांधीनगर (गुजरात) येथे पश्चिम_क्षेत्रीय_परिषद च्या २६ व्या बैठकीस प्रारंभ

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गांधीनगर (गुजरात) येथे पश्चिम_क्षेत्रीय_परिषद च्या २६ व्या बैठकीस प्रारंभ झाला आहे.

img 20230828 wa0019

या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरात, गोवा या राज्यांचे मुख्यमंत्री आणि दादरा व नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक, महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित आहेत.*
*बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री श्री. शाह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.*

पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कठोर कायदे करण्याची गरज पद्मभूषण अण्णा हजारे.

img 20230828 wa0005
पारनेर :-पत्रकार हा सुध्दा एक समाजसेवक आहे.तो समाज मनाचा आरसा असून,आज पत्रकारांवरच हल्ले होताना दिसत आहेत.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर असे हल्ले होत असतील तर हा देश हे राज्य सुरक्षित कसे राहणार..असा सवाल अण्णा हजारे यांनी केला.लोकशाहीचा चौथा स्तंभ जर सुरक्षित असेल तरच लोकशाही सुरक्षित राहील.पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने विधीमंडळ तसेच संसदेत कठोर कायदे संमत करून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.*

*👉🅾️🅾️👉राळेगण सिद्धी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर यांच्यावतीने समाजातील विविध गुणवंतांचा सन्मान,पत्रकारांना रेनकोट वाटप व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे बोलत होते.यावेळी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे तसेच राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डाॅ.विश्वासराव आरोटे यांचे अध्यक्षतेखाली सर्व पत्रकार बांधवांना रेनकोट तसेच ओळखपत्र व एक वृक्षभेट देण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते,राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव व शिवसंवाद न्युजचे संपादक गाडगे उपस्थित होते.*

*👉🔴🔴👉यावेळी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे,डाॅ.विश्वासराव आरोटे,दत्ता पाचपुते व दत्ता गाडगे आदी मान्यवरांचे उपस्थितीमध्ये प्राथमिक शिक्षक आनंद झरेकर,तुकाराम आडसुळ, पीएसआय ( केंद्रिय पोलीस दल) तुषार ढवण,लोकशाहीर दत्ता करंदीकर, नुतन चौधरी मुंबई पोलीस,लोककलावंत मनिषा चव्हाण आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह तसेच शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.*

*👉🟥🟥👉यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंढे,मुख्य संघटक संजय भोकरे, सचिव डाॅ. विश्वासराव आरोटे,यांनी राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटीत करत अनेक सामाजिक उपक्रम राबवून पत्रकारांना न्याय देण्याचे पवित्र कार्य केले.झोपलेल्या सरकारला नेहमी जागे राहण्यास भाग पाडले. पत्रकारीता करत असताना नियमीत सेवाभाव जपण्याचे काम केले आहे. राज्यातील ग्रामिण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पत्रकारांवर हल्ले होत आहेत.झोपलेल्या सरकारला हे कधी कळणार? लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आल्यामुळे लोकशाहीवरच हा हल्ला असुन, सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पहायला हवे.यासाठी राज्य व केंद्र सरकारने विधीमंडळ आणी संसदेत पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी कठोर कायद्याची निर्मीती करावी अशी मागणी अण्णा हजारे यांनी सरकारला केली.*

*👉🅾️🅾️👉यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव डाॅ. विश्वासराव आरोटे म्हणाले,अण्णांनी माहीतीचा अधिकार हि देशाला दिलेली देणगी आहे.पत्रकारांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे.अण्णांनी समाजाला न्याय देण्यासाठी अनेक यशस्वी आंदोलने केली.अण्णा हजारे हे देशाचे प्रति गांधीजी आहेत.पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी सरकारने कठोर कायदे करावेत अशी सुचना केंद्र व राज्य सरकारला देण्याची गरज असल्याची मागणी आरोटे यांनी केली.*

*👉🟥🟥👉पत्रकार बांधवांना रेनकोट वाटप करताच वरुण राजाचे आगमण झाल्याने सर्वच आनंदी झाले. पत्रकार बांधवांसाठी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी प्रथमच मोठा वेळ दिला.याप्रसंगी राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष विनोद गायकवाड.श्रीगोंदा तालुका तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे, सचिव पिटर रणसिंग,पारनेर तालुका उपाध्यक्ष सुरेश खोसेपाटील,रामदास नरड,अविनाश भांबरे, खजिनदार संतोष कोरडे,पारनेर शहराध्यक्ष संतोष तांबे,निघोज शहराध्यक्ष सागर आतकर,मायभूमीचे कार्यकारी संपादक महेश शिंगोटे,पत्रकार वसंत रांधवन, संपत कपाळे, गंगा धावडे, आनंदा भुकन,संपत वैरागर, संदीप गाडे,अनिल चौधरी,भगवान मंदिलकर,नितीन परंडवाल,सचिन जाधव आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी संघटनेच्या कार्याचा धावता आढावा घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष संजय मोरे यांनी तर,आभार सचिव बाबाजी वाघमारे यांनी आभार मानले.*

error: Content is protected !!