Home महाराष्ट्र राज्य राज्यात आज 40 हजारहून अधिक रुग्ण; मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत*

राज्यात आज 40 हजारहून अधिक रुग्ण; मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत*

राज्यात आज 40 हजारहून अधिक रुग्ण; मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत*

*मुंबई :-महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संक्रमणामुळे चिंतेची परिस्थिती उद्भवली आहे. नुकत्याच हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र राज्यात आज 40,414 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच आज नवीन 17,874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 23,32,453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3,25,901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.95% झाले आहे. राज्यात आज 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.*

*👉👉आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कोविड टास्क फोर्समधील पदाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक बैठक आज रविवारी पार पडली.या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना लॉक़डाउनच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. जर कोरोनाला रोखण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून अशाचप्रकारे उल्लंघन होत राहिले तर राज्यात लॉकडाउन सदृश निर्बंध लादावेत लागतील असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.*

*👉👉राज्यातील परिस्थिती*

*➡️आजवरचे एकूण रुग्ण:-2,71,3875*

*➡️आजवर बरे झालेले एकूण रुग्ण:- 2,33,2453*

*➡️ऍक्टीव्ह रुग्ण: 3,25,901*

*➡️आजवरचे एकूण मृत्यू:-54,181*

*👉महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईमध्ये आज कोरोनाचे नवे 6,923 रुग्ण सापडले आहेत. तर शहरात 8 मृत्यू झाले आहेत. या नव्या रुग्णांसह मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ही 3,98,674 वर पोहोचली आहे तर आजवर एकूण 11,649 मृत्यू झाले आहेत. नागपुर शहरात आज नवे 3,970 रुग्ण आढळले आहेत. तर 3,479 रुग्ण बरे झाले आहेत. 58 मृतांहस नागपूरमधील आजवरच्या मृतांची संख्या ही 4,931 वर पोहोचली आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!