Home National बाभुळगांव येथे सापडलेले पिल्लू बिबट्या चे नसुन ते वाघाटि या दुर्मीळ जातिचे आहे: वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे.

बाभुळगांव येथे सापडलेले पिल्लू बिबट्या चे नसुन ते वाघाटि या दुर्मीळ जातिचे आहे: वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे.

बाभुळगांव येथे सापडलेले पिल्लू बिबट्या नव्हे वाघाटि: वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे.

 

संपादकीय

बाभुळगाव (ता.इंदापूर) येथे दि. २४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या फडात बिबट्यासदृश्य प्राण्याचे एक पिल्लू सापडले.त्यामुळे बाभुळगावात चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र वनविभागाच्या अधिका-यांनी समक्ष पाहणी केल्यानंतर ते मार्जार कुळातील अत्यंत दुर्मिळ असणा-या वाघाटी जातीचे पिल्लू असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यास वनविभागाने ताब्यात घेवून निसर्गात सोडले आहे.

सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दि.२४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाभुळगाव येथील गोपीनाथ गुरगुडे यांच्या ऊसाच्या फडात एक बिबट्यासदृश्य प्राण्याचे पिल्लू आढळून आले.या संदर्भात त्यांचे पुतणे दीपक गुरगुडे यांनी त्या पिल्लाचे छायाचित्र काढून ते वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याकडे पाठवले.काळे यांनी पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांना ही माहिती दिली.

त्यांनी पोलीस अधीक्षकांना देखील त्याची कल्पना दिली.वनसंरक्षक कार्यालयाच्या सूचनेनूसार काळे यांनी इंदापूरचे वनपाल राहुल गीते, बी.एस.खारतोडे व इतर ताफा बाभुळगावला पाठवला.

पिल्लाची पाहणी केल्यानंतर ते पिल्लू मार्जार कुळातील अत्यंत दुर्मिळ असणा-या वाघाटी या जातीचे असल्याचा निष्कर्ष अधिका-यांनी काढला. बिबट्या असल्याच्या चर्चेला त्यामुळे पूर्णविराम मिळाला.धास्तावलेल्या बाभुळगावकरांच्या जीव भांड्यात पडला.

या संदर्भात माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले की,हे पिल्लू अत्यंत दुर्मिळ अश्या वाघाटी जातीचे आहे.वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या शेड्युल १ मध्ये वाघ, सिंह, हत्ती अश्या प्राण्याबरोबर वाघाटी जातीच्या प्राण्याचा समावेश आहे.इंदापूर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या जातीचे पिल्लू सापडले आहे.त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले. बाभुळगावमध्ये बिबट्या नव्हे तर वाघाटी जातीचे पिल्लू सापडले आहे.त्यामुळे लोकांनी घाबरुन जावू नये,असे आवाहन राहुल काळे यांनी केले आहे.

===================

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!