Home National जि.प. सदस्य कु.अंकिता पाटील यांचा वाढदिवस अगळा वेगळा साजरा

जि.प. सदस्य कु.अंकिता पाटील यांचा वाढदिवस अगळा वेगळा साजरा

*सामाजिक बांधिलकी महत्त्वाची- अंकिता हर्षवर्धन पाटील*

उपसंपादक :-शिवाजी पवार

जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर येथील माऊली बालक आश्रम येथे आश्रमातील मुलांना फळे व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी मुलांसमवेत केक कापला व वाढदिवस साजरा केला.
या मुलांसमवेत वाढदिवस साजरा केल्यामुळे जो आनंद मला प्राप्त झाला आहे, तो शब्दात मांडणे अतिशय कठीण आहे. अशी प्रतिक्रिया अंकिता पाटील यांनी यावेळी दिली. वाढदिवस हे फक्त औचित्य असते, हे औचित्य साधून आपण सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कार्यक्रम राबविल्यामुळे औचित्यास एक वेगळे महत्त्व निर्माण होते. संदिपान कडवळे व त्यांच्या सहकारी यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांचीआभारी आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद,इंदापूर नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम, नितीन आरडे ,राजाभाऊ घाडगे, युवामित्र श्रीयश नलवडे, ॲड. आसिफ बागवान, ललेंद्र शिंदे, नदीम बागवान,सुधाकर ढगे, सुशांत षटकार यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!