Home पुणे जिल्हा निर्भया पथकातील रणरागिणी सौ. अमृता भोईटे

निर्भया पथकातील रणरागिणी सौ. अमृता भोईटे

निर्भया पथकातील रणरागिणी सौ. अमृता भोईटे

निर्भया पथक ही संकल्पना अस्तित्वात आल्यापासून पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण आठ निर्भय पथके सज्ज झाली त्यापैकी बारामती येथील निर्भया पथकाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील प्रमुख म्हणून हवालदार सौ. अमृता भोईटे निर्भिडपणे निर्भया पथकाची जबाबदारी हाताळत आहेत. बारामती निर्भया पथकामध्ये एकूण सहा पोलीस स्टेशन येत असून बारामती शहर, बारामती तालुका वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर भिगवण, प्रत्येक पोलिस स्टेशनचे एक अमलदार असे सहा अमलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील एक महिला असे एकूण सात पोलीस अमलदार या निर्भया पथकाचे काम पाहतात.

स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत कित्येक कुटुंबाला समुपदेशनाद्वारे उजाडण्यापासून वाचविण्याचे अमृता भोईटे यांचे कार्य केवळ यांचेच नव्हे तर संपूर्ण पोलीस खात्याची मान उंचावणारे आहे. इंदापूर, पौड, बारामती शहर, बारामती तालुका अशा विविध पोलीस ठाण्यात जवळपास १६ वर्ष यशस्वी सेवा पूर्ण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!