Home महाराष्ट्र राज्य सौ.उमा महेश तिर्लोटकर यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार

सौ.उमा महेश तिर्लोटकर यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार

सौ.उमा महेश तिर्लोटकर यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी कळविले आहे .लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्षा संदीपा वाघ यांनी कळविले आहे. कोविड काळात “शाळा बंद पण शिक्षण सुरू …..” यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. यामध्ये सौ . उमा तिर्लोटकर इयत्ता चौथीसाठी तज्ञ मार्गदर्शक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत .गरीब ,गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारे आर्थिक मदत करणे, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या सौ .उमा तिर्लोटकर यांना विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच विविध शिक्षक स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. सौ.उमा महेश तिर्लोटकर या मुंबईतील घाटकोपर येथील श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यालय येथे कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!