Home National निवड केल्यानंतर ४८ तासात उमेदवाराचा गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करा* *👉सर्वोच्च न्यायालय*

निवड केल्यानंतर ४८ तासात उमेदवाराचा गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करा* *👉सर्वोच्च न्यायालय*

निवड केल्यानंतर ४८ तासात उमेदवाराचा गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करा*
*👉सर्वोच्च न्यायालय*

*नवी दिल्ली: राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याच्या दिशेने सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना एक महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. उमेदवाराची निवड निश्चित झाल्यानंतर ४८ तासांच्या आत त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.*

*👉👉न्यायाधीश आरएफ नरीमन आणि न्यायाधीश बीआर गवई यांनी १३ फेब्रुवारी २०२० च्या निकालात काही बदल केले. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंधित आदेश दिला होता. उमेदवारांची निवड झाल्यानंतर ४८ तासांच्या आत किंवा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन आठवडे आधी स्वत:बद्दलची सविस्तर माहिती जाहीर करावी, असे आदेशात म्हटले होते.*

*👉राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह निलंबित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी हे राजकीय पक्ष जाहीर करत नाहीत, असा त्यांचा मुद्दा होता. सर्वोच्च न्यायालयाच्या फेब्रवारी २०२० च्या आदेशाचे राजकीय पक्ष पालन करत नसल्यामुळे त्यांच्याविरोधात अवमानना केल्याची कारवाई करावी, अशी याचिकाकर्त्याची मागणी होती.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!