Home National मोदी सरकारचा शेतकरी हिताचा निर्णय आधारभूत किंमतीत (MSP) वाढ

मोदी सरकारचा शेतकरी हिताचा निर्णय आधारभूत किंमतीत (MSP) वाढ

मोदी सरकारचा शेतकरी हिताचा निर्णय आधारभूत किंमतीत (MSP) वाढ

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देत सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.
ते म्हणाले, भातावरील एमएसपीमध्ये ७२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर १८६८ रुपये प्रतिक्विंटल भात आता १९४० प्रतिक्विंटल झाला आहे.

यासह बाजरीवरील देखील एमएसपी वाढवण्यात आली. बाजरी प्रतिक्विंटल २१५० रुपयांवरून २२५० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. तर त्याखालोखाल तूर आणि उडीद डाळीला ३०० रुपये प्रतिक्विंटल तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक वाढ तीळाला देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!