Home National सोशल मीडिया कंपन्या केंद्र सरकारपुढे नमल्या..

सोशल मीडिया कंपन्या केंद्र सरकारपुढे नमल्या..

सोशल मीडिया कंपन्या केंद्र सरकारपुढे नमल्या…….

नियमांचे पालन करण्याचा निर्णय………………….
काय आहेत नियम…??
दिनांक : ३० मे २०२१
🧷🧷🧷🧷🧷🧷🧷🧷🧷🧷🧷

माहिती-तंत्रज्ञानविषयक नवे नियम २६ मेपासून अंमलात आले आहेत. केंद्र सरकारने सर्व कंपन्यांना दिलेल्या आदेशानुसार गुगल, फेसबुक, व्हॉट्सॲप, कू, टेलिग्राम, लिंक्डइन आणि शेअरचॅट या समाजमाध्यम कंपन्यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतच्या सर्व तपशीलाची माहिती केंद्र सरकारकडे सुपूर्द केली आहे.

मुख्य अट हि होती : नव्या नियमानुसार सर्व समाजमाध्यम कंपन्यांना भारतात मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती करून त्यासंदर्भात केंद्र सरकारला अवगत करणे क्रमप्राप्त होते. हि माहिती आता केंद्रसरकारकडे सुपूर्द केली आहे.

व्हॉट्सॲप नमले मात्र ट्विटर कडून अजूनही अस्पष्टता :

व्हॉट्सॲपने नव्या नियमांविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली असली तरी त्यांनी नियमांचे पालन करत असल्याचे केंद्र सरकारला कळवल्याने व्हॉट्सॲप आणि केंद्र सरकार यांच्यात निर्माण झालेला वाद निवळत असल्याचे संकेत मिळत आहेत.

नव्या नियमांबाबत ट्विटरने नाराजी व्यक्त करत त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात येत असल्याचे नमूद केले. त्यानंतर केंद्र सरकारनेही ट्विटरला फटकारत नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले.

काय आहेत नवे नियम ?

पॉर्नोग्राफी, त्यांचा मुलांवर होणारा परिणाम आणि प्रक्षोभक वक्तव्य हटवावे.

सोशल मीडियावरील अश्लीलतेला आळा घालणे.

सोशल मीडियावरच्या माहितीची तीन स्तरीय तपासणी…

सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या तक्रारीसाठी कंपन्यांनी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी.

या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा.

तक्रारींबाबत 24 तासांत कारवाई होणे अपेक्षित.

महिलाविरोधी पोस्ट 24 तासांत हटवाव्या लागतील.

सोशल मीडिया कंपन्यांना फर्स्ट ओरिजिनेटर कोण आहे, ते सांगावे लागेल.

हा प्रकार कुणी सुरू केला हे सांगावे लागेल. ते भारताबाहेरून सुरू झाले असेल तर भारतात ते कुणी सुरू केले हे सांगावे लागेल.

तुमच्या प्लॅटफॉर्मवर काही समाजविघातक असेल तर ते हटवावे लागेल.

हे नवे नियम २६ मे २०२१ पासून लागू झाले आहेत. जर या कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, तर त्यांचे इंटरमीडिअरी स्टेटस काढून घेतले जाऊ शकते. त्या भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार, गुन्हेगारी कारवाईच्या चौकटीत येऊ शकतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!