Home शासन निर्णय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जून रोजी भिगवण येथे;लाईफ सायन्स क्षेत्रात १९८ रिक्त पदांसाठी संधी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जून रोजी भिगवण येथे;लाईफ सायन्स क्षेत्रात १९८ रिक्त पदांसाठी संधी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जून रोजी भिगवण येथे;लाईफ सायन्स क्षेत्रात १९८ रिक्त पदांसाठी संधी

पुणे, दि. 26 (जिमाका, वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि दत्तकला शिक्षणसंस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी बुधवार, ३ जून २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी, स्वामी चिंचोली, भिगवण, ता. दौंड, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

लाईफ सायन्स क्षेत्रातील विविध रिक्त पदांसाठी आयोजित या मेळाव्यात सोहन हेल्थकेअर, क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी, मोडेप्रो इंडिया प्रा. लि., ओमनी अॅक्टीव्ह इंडिया प्रा. लि., एम जे बायोफार्मा लि., सेंच्युरी फार्मास्युटिकल लि., एमक्युअर फार्मा प्रा. लि., जिनेव्हा बायोफार्मा लि., इटेनरीस फाईन लि., हॉनर लॅब लि., अलिवुस लाईफसायन्स लि. यांसह नामांकित कंपन्या सहभागी होणार असून एकूण १९८ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

१० वी, १२ वी, डी. फार्म, बी. फार्म, बीएससी केमिस्ट्री, एमएससी केमिस्ट्री आणि एमएससी बायोटेक्नॉलॉजी पात्रताधारक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याद्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांच्या माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in⁠ या संकेतस्थळावर अर्ज करावेत तसेच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती आणि किमान पाच बायोडाटा प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!