Home शैक्षणिक चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला

संपादकीय ,

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव विलास भोसले खजिनदार माने सर संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमा आयोजित करण्यात आला. नर्सरी पासून बारावीपर्यंतची विद्यार्थी तसेच चेतना कॉलेजचे प्राचार्य व सर्व शिक्षक स्टाफ यावेळी उत्साहाने उपस्थित होते यावेळी युवराज शिंदे सर यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना व इतिहास थोडक्यात सांगितला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड तानाजी देवकर साहेब यांनी कामगार दिनाचे महत्त्व तसेच महाराष्ट्र दिन आणि सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांचे कौतुक केले त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा या विषयी माहिती दिली तसेच प्राचार्य मस्के सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि शिक्षकांना सूचना केल्या व शिक्षकांचे कौतुक केले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यास माधुरी चव्हाण मॅडम आणि पोर्णिमा थोरे मॅडम यांनी मदत केली आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ज्योती शिंदे मॅडम यांनी केले आणि सूत्रसंचालन गोळे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!