इंदापूर तालुका प्रतिनिधी:-रोहन घोगरे
हिंदू धर्मातील गुरुदेव या शब्दाने प्रचलित असे श्री दत्तगुरु महाराज यांची जयंती. आज या दिवसाचे महत्व म्हणजे त्रिदेवांचे एकत्रित स्वरूपात ज्यांनी अवतार कार्य केले आणि गुरुतत्व काय असत हे जगाला सांगितले. शिवाला पुजणारा शैव संप्रदाय, विष्णूला पूजणारा वैष्णव संप्रदाय, शक्तीला पुजणारा शाक्त संप्रदाय त्याचप्रमाणे गुरु तत्वाला म्हणजे दत्त महाराजांची पूजा करणार दत्त संप्रदाय अस्तित्वात आला. हिंदू धर्मात नवनाथ ज्यांनी घडवले वाढवले शिकवले आणि त्रिलोकामध्ये नावारूपास आणले ते म्हणजे दत्त महाराज. नवनाथांचे गुरु दत्त महाराज होत.
आजच्या दिनी विविध ठिकाणी, विविध प्रकारे ,विविध सोहळे आणि उपक्रम राबवत दत्त जयंती साजरी केली जाते. याचप्रमाणे काटी या गावात दत्त जयंती निमित्ताने सोलनकर वस्तीवर जे मंदिर नाविन्याने बांधून पूर्ण झाले होते आणि मागच्या वर्षी याच मुहूर्तावर दत्त महाराज, नवनाथ महाराज, स्वामी समर्थ आणि शिवपिंड या सर्व मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा करत *अण्णा महाराज सोलनकर* यांनी जनकल्याणचा वसा हाती घेतला. तो त्यांनी अविरत सुरू ठेवत या वर्षीदेखील दत्त जयंती चा उत्सव उत्कृष्ट प्रकारे पार पाडला. हे करत असताना मागील वर्षभरापासून दर गुरुवारी, पौर्णिमा, अमावास्या तसेच साधुसंतांचा प्रगटदिना ला दत्त महाराजांची आरती महाप्रसाद तसेच लोकोपयोगी उपक्रम करत एक आदर्श निर्माण केला आहे.
या वर्षी या सोहळ्याच्या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होत त्यामध्ये प्रामुख्याने दत्त महाराजांचे भजन नामजप आणि होम हवन त्यानंतर ह भ प काजळताई लोदाडे यांचे कीर्तन झाले. मग सायंकाळी ६ वाजता दत्तजन्म उत्सव व महाआरती पार पडली. त्यानंतर महाप्रसादाने तृप्त होऊन अनेक पंगती उठल्या. २०२४ पासून दत्तकृपा आशीर्वादाने जन्मलेल्या नवजात बालकांना पाळणा आणि वस्त्रदान केले गेले.
अशाप्रकारे दत्त जयंती च्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन नियोजन करणारे सोलनकर महाराज आणि सेवकवर्ग यांना स्वतः भेटून महाराजांचा आशीर्वाद घेत पुढील काळात आणखी भव्य दिव्य आणि समाजपयोगी उपक्रम या प्रांगणात व्हावेत ही इच्छा व्यक्त केली.
