कै. रावसाहेब कृष्णा खबाले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह. भ. प. कांचनताई लकडे, श्रीगोंदा यांचे फुलांचे कीर्तन
संपादकीय
खबाले वस्ती, महादेवनगर शहा ता. इंदापूर येथील आदरणीय व समाजकार्यात अग्रेसर असलेले कै. रावसाहेब कृष्णा खबाले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह. भ. प. कांचनताई लकडे, श्रीगोंदा यांचे फुलांचे कीर्तन पार पडणार आहे. . बुधवार दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.
कै. रावसाहेब खबाले हे आदर्श व्यक्तिमत्व, समाजशील वृत्ती, तसेच सर्वांना जोडून घेणारा स्वभाव यामुळे परिसरात विशेष ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या पुण्यस्मरण कार्यक्रमात पुष्पवृष्टी, कीर्तन आणि अन्नदान यांसारखे तीन प्रमुख उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे श्रीगोंदा येथील झी टॉकीज
फेम ह.भ.प. कांचनताई लकडे यांचे भक्तिमय फुलांचे कीर्तन. सकाळी १० ते १२ या दरम्यान होणारे हे कीर्तन के. रावसाहेबांच्या कार्याची, विचारांची आणि समाजातील योगदानाची भावपूर्ण आठवण करून देणारे ठरणार आहे.
अन्नदानाचा कार्यक्रमानंतर श्रद्धांजली म्हणून उपक्रमही राबविण्यात येणार असून स्थानिक नागरिक, मान्यवर पाहुणे आणि सामाजिक बांधव
यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. खवाले वस्ती, महादेवनगर येथे होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना समस्त खवाले परिवार योनी सर्वांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कै. रावसाहेब कृष्णा खवाले यांच्या प्रेरणादायी कार्याची स्मृती जपण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजाबद्दलची त्यांची निष्ठा आणि लोकांवरील प्रेम अधोरेखित करणारा ठरेल.