चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये “परिचय कार्यक्रम Induction program” उत्साहात साजरा
इंदापूर- सरडेवाडी येथील चेतना फाऊंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये
आज नुकताच परिचय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२५व२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष पदविका, प्रथम वर्ष पदवी आणि द्वितीय वर्षे पदवी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, फार्मसी क्षेत्र, भविष्यातील संधी व आव्हाने माहिती देण्यात आली. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. रोहन हेगडे हे होते. यावेळी चेतना फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने, सदस्य श्री. बाळू बोराटे, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के व चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. निकिता माने इ. मान्यवर या उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. रोहन हेगडे सर यांनी समाजामध्ये असलेले फार्मसिस्ट चे महत्व सांगितले. डॉक्टरांसोबत फार्मसिस्ट चे असलेले स्थान आणि नोकरीच्या संधी बद्दल उत्कृष्टरित्या माहिती दिली. तसेच प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी नवीन विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्या निकिता माने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात असणाऱ्या संधी आणि त्यांचे महत्व पटवून दिले. प्रथम वर्ष डी. फार्मसी च्या वर्ग शिक्षका प्रा.ऋतुजा धायगुडे यांनी विद्यार्थ्यांना कॉलेज बद्दल माहिती दिली. प्रथम वर्ष बी. फार्मसी च्या वर्ग शिक्षका प्रा. पायल निकम यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष बी.फार्मसी ची योग्य माहिती दिली. शिक्षणविभाग प्रमुख प्रा. गीतांजली कांबळे यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्राची उत्कृष्टरित्या माहिती दिली आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले. परीक्षाविभाग प्रमुख प्रा. नम्रता मोरे यांनी परीक्षा विभागाची माहिती दिली. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. शिवानी भापकर यांनी भविष्यातील फार्मसी क्षेत्रातील नोकरीच्या संधी बद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. गीतांजली कांबळे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. अजिंक्य देशपांडे यांनी मानले.