
कार्यकर्त्यांसाठी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करू:- युवा नेते प्रवीण माने
इंदापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संवाद व पद वाटप मेळावा काल पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा अध्यक्ष शेखरजी वढणे उपस्थित होते. युवकांचे आशास्थान युवा हृदय सम्राट सन्माननीय प्रवीण भैया माने हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष हा देशातील एक नंबरचा पक्ष असून तो महाराष्ट्रात ही एक नंबरचा पक्ष आहे आणि इंदापूर मध्येही हा पक्ष एक नंबरचा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन शिखरजी वडणे साहेब यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केले.
युवकांचे नेतृत्व असलेले प्रवीण भैया माने यांनी पक्षाने आदेश दिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्यात स्वबळावर ती लढवण्यास तयार असल्याचं सुतवाच केले. इच्छुक उमेदवारांसाठी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करू असे आश्वासन प्रवीण भैया माने यांनी कार्यकर्त्यांना दिले. प्रवीण भैय्याच्या या आव्हानानंतर तरुणांमध्ये एक प्रकारचं उत्साह निर्माण झालं व नेता असावा तर असा अशी चर्चाही त्या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान असे नेतृत्व इंदापूर तालुक्याला प्रवीण भैया माने यांच्या स्वरूपाने मिळालेले पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये नवं आणि जुनं असं काहीही बदल नसतं सर्व कार्यकर्त्यांना समान मान दिला जातो. कार्यकर्त्यांची केलेली तालुक्यातील निवड येत्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पार्ट निश्चितच मजबूत होईल असे सदरच्या कार्यक्रमातून दिसून आले.