Home शैक्षणिक चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मोबाईल व्यसन मुक्ती वर अतिथि व्याख्यान

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मोबाईल व्यसन मुक्ती वर अतिथि व्याख्यान

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मोबाईल व्यसन मुक्ती वर अतिथि व्याख्यान

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मोबाईल व्यसन मुक्ती वर अतिथि व्याख्यान

आजच्या युगात मोबाईलचा वापर हे जीवनाचा अविभाज्य भाग झाले असले, तरी त्याचा अतिरेक हा अनेक मानसिक व शारीरिक समस्यांना आमंत्रण देत आहे. या पार्श्वभूमीवर चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज सोमवार २९ सप्टेंबर या दिवशी “मोबाईल व्यसनमुक्त जीवन” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. तुषार रंजनकर, डायरेक्टर अल्फा बाईट कॉम्पुटर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचे आहारी जाण्याची समस्या, झोपेवर होणारे परिणाम, एकाग्रतेचा अभाव इत्यादी मुद्द्यांवर सविस्तर प्रकाश टाकला.
त्यांनी मोबाईलचा संतुलित वापर कसा करावा, वेळेचे योग्य नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, दिवसातील ठराविक वेळेसाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ करणे, मित्र-परिवारासोबत प्रत्यक्ष संवाद वाढवणे आणि छंद जोपासणे या उपायांची माहिती दिली
चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के म्हणाले की झोपता-उठताना वापरताय मोबाईल, ब्रेन आणि बॉडीवर होईल जीवघेणा परिणाम असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात, प्रत्येकाची सकाळ एकाच गोष्टीने सुरू होते. अलार्मचा आवाज ऐकताच, तुम्ही डोळे उघडता आणि मोबाईल फोन थेट तुमच्या हातात येतो. प्रथम तुम्ही नोटिफिकेशन तपासता, नंतर तुम्ही इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपवर पोहोचता. मित्राचा नवीन फोटो, कोणाचा तरी स्टेटस अपडेट आणि नंतर ईमेल किंवा ऑफिस मेसेजेस. काही वेळात, बेडवरून उठल्याशिवाय अर्धा तास किंवा त्याहून अधिक वेळ जातो. ही सवय आता जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनली आहे. पण सकाळी उठल्याबरोबर मोबाईलकडे पाहण्याची ही सवय आपल्या मनावर, शरीरावर, मूडवर किती खोलवर परिणाम करत आहे.
नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमासाठी चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळू बोराटे आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. प्रास्ताविक प्रा. किरण सातपुते यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा ऋतुजा धायगुडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!