Home National कोरोना आपत्ती* *👉👉दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत पुन्हा एकदा जगात टॉपवर

कोरोना आपत्ती* *👉👉दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत पुन्हा एकदा जगात टॉपवर

कोरोना आपत्ती*
*👉👉दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत पुन्हा एकदा जगात टॉपवर*

*नवी दिल्ली, २० एप्रिल:- सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी 2.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. खरेतर चांगली गोष्ट म्हणजे रविवारच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात 2 लाख 56 हजार 828 लोक संक्रमित झाले आहेत. रविवारी 1.75 लाखपेक्षा जास्त लोक पॉजिटिव्ह आढळले होते. पहिल्यांदाच विक्रमी 1 लाख 54 हजार 234 लोकही बरे झाले. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 18 एप्रिलला 1.43 लाख लोक रिकव्हर झाले होते.*

*👉दुसरीकडे वाईट गोष्ट म्हणजे संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडा 1.80 लाखांच्या पार गेला आहे.आतापर्यंत 1 लाख 80 हजार 550 लोकांनी जीव गमावला आहे. दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत देश पुन्हा एकदा टॉपवर गेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. ब्राझीलमध्ये सध्या दररोज जवळपास 1,500 लोकांचा मृत्यू होत आहे. तर अमेरिकेमध्ये हा आकडा 400-600 एवढा आहे.भारतात सोमवारी 1,757 रुग्णांचा मृत्यू झाला.सोमवारी 78.37% म्हणजेच 2.01 लाखांपेक्षा जास्त रुग्ण देशातील 10 राज्यांमध्ये सापडले. सर्वात जास्त महाराष्ट्रात 58,924 संक्रमित आढळले. उत्तर प्रदेशात 28,211, दिल्लीमध्ये 23,686, कर्नाटकात 15,785, केरळमध्ये 13,644, छत्तीसगडमध्ये 13,834, मध्यप्रदेशात 12,897, तामिळनाडूमध्ये 10,941, राजस्थानमध्ये 11,967, गुजरातमध्ये 11,403 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले.*

*👉दरम्यान, भारतात झालेल्या करोना उद्रेकामुळे इतर देश सावध झाले आहेत. हॉगकाँगने भारतीय विमानांना प्रवेश बंद केला आहे. तर अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने अमेरिकनं नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. भारतात रुग्णसंख्या वाढल्यामुळे नागरिकांनी भारताचा दौरा करणं टाळावं. पूर्णपणे लसीकरण झालेलं असलं तरीही संसर्ग होण्याचा व विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतात जाणं टाळावं. जर जाणं अत्यावश्यक असेल, तर आधी पूर्णपणे लसीकरण करून घ्यावं,” असं रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं म्हटलं आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!