Home CM Maharashtra वैजापूरजवळील अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांना दुःख मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयेज खमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश

वैजापूरजवळील अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांना दुःख मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयेज खमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश

मुंबई, १५ – नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पोच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.*

*👉🟥🟥👉मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.*

error: Content is protected !!