Home राजकीय बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशांत डिक्कर यांच्या सह आदिवासी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशांत डिक्कर यांच्या सह आदिवासी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

*बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशांत डिक्कर यांच्या सह आदिवासी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू..*
*महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी आदिवासींच्या परस्पर शेकडो एकर जमीन विकल्याचे संतापजनक प्रकार उघडकीस..*
बुलडाणा/जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथिल महसुल विभागातिल काही अधिकाऱ्यांनी आदिवासी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून यांच्या परस्पर कोणत्याही प्रकारचे दस्तावेज नसतांना शेकडो एकर जमिनी विकल्याचा संतापजनक प्रकार बुलडाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित असलेल्या मालकीच्या जमिनी महसुल विभागातील काही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर कोणत्याही प्रकारची दस्तावेज नसतांना शेकडो एकर जमिनी विकल्याची बाब निदर्शनास आली आहे. हडपलेल्या जमिनी आदिवासी शेतकऱ्यांना परत मिळाव्या व दोषिनवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. आदिवासींच्या जमिनी हडपणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून हडपलेल्या जमिनी आदिवासींना परत द्या, गैरआदिवासी लोकांनी बनावट सातबाऱ्यावर वेळोवेळी सोनाळा स्टेट बँक शाखेकडुन घेतलेले करोडो रुपये कर्जाची वसुली करा,आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील १९६६ नुसार कलम ३६ व ३६ अ हटविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा,जमिनीच्या मुळ मालका विना जमिनीची खरेदी, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा,बेकायदेशीरपणे जमिनीचे क्षेत्रफळ वाढवून रजिस्टर दस्तावेजा विना जमिनीची हेराफेरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा इत्यादि मागण्यांसह उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर, पंचायत समिती माजी सदस्य अख्तर मोरे, दिलीप जयस्वाल यांच्या सह बहुसंख्य आदिवासी शेतकरी उपोषणात सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!