Home महाराष्ट्र राज्य अनन्या पांडेच्या अडचणी वाढणार?

अनन्या पांडेच्या अडचणी वाढणार?

अनन्या पांडेच्या अडचणी वाढणार?*

*मुंबई :-क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या तपासातून अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) रडारवर आलेली अभिनेत्री अनन्या पांडेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण यासाठी तिच्याकडील सात इलेक्ट्रॉनिक गेजेट जप्त केले आहेत.*

*👉अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसोबत केलेल्या चॅट्स आणि काही नावांची शहानिशा केली जाणार आहे. अनन्याने मोबाइल व लॅपटॉपमधील मेसेज आणि काही कॉन्टॅक्ट नंबर डिलीट केले असण्याची शक्यता असून तज्ज्ञांमार्फत ते पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. गेल्या दोन दिवसांत अनन्या पांडे हिची एनसीबीने जवळपास साडेसहा तास केलेली चौकशी पूर्ण न झाल्याने येत्या सोमवारी तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.*

*👉आर्यन खानसमवेत केलेल्या ड्रग्जसंबंधीचा व्हाॅट्सॲप चॅट महत्त्वपूर्ण मुद्दा ठरला आहे.यावरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्जच्या अनुषंगाने दोघांमध्ये पूर्वीही वेळोवेळी संभाषण झाले असल्याची शक्यता वर्तविली असून त्यासाठी या सात इलेक्ट्रॉनिक गेजेट मध्ये तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपचाही समावेश आहे.फॉरेन्सिक तपासणीद्वारे एनसीबीला त्या चॅट्स आणि इतर तपशील जाणून घ्यायचा आहे,जे कदाचित हटविण्यात आले असतील. सोमवारपर्यंत हा डेटा पुन्हा मिळाल्यास त्या आधारावर चौकशीस सुरुवात होईल. शिवाय अनन्या व आर्यन आणि इतरांमध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे की नाही, हेही तपासले जाणार आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!