Home राजकीय रस्त्याच्या कामाचे पैसे  घेतात पण सेवा देत नाहीत :-नितीन दादा आरडे (संस्थापक अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

रस्त्याच्या कामाचे पैसे  घेतात पण सेवा देत नाहीत :-नितीन दादा आरडे (संस्थापक अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

रस्त्याच्या कामाचे पैसे  घेतात पण सेवा देत नाहीत :-नितीन दादा आरडे (संस्थापक अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ भिगवन ते हिंगणगाव रस्त्यातील शौचालय, रस्ता साफ सफाई, साईड पट्ट्या दुरुस्ती, या कामाचे टेंडर “शुभम सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड “या कंपनीकडे असून सध्या हे काम बंद आहे. महामार्ग प्रशासन अधिकारी व कंपनी ठेकेदार संगनमताने बिल काढून शासनाची फसवणूक करत आहेत .म्हणून सदर कंपनीचा हा ठेका रद्द करून या कंपनीचे नाव काळे यादीत टाकावे .अशी मागणी शिवशाही शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दादा आरडे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

भिगवन ते हिंगणगाव हायवे रस्ता साफसफाई झाड लोट साईट पट्ट्या देखभाल दुरुस्ती डिव्हायडर मधील झाडाला पाणी घालणे हायवे रोड लगतची सार्वजनिक शौचालय व मुताऱ्या स्वच्छता व त्या ठिकाणी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा कामाचा ठेका नमूद कंपनीकडे आहे .परंतु सदर कंपनी ही कामे न करताच प्रत्येक महिन्याला बिल घेत आहे .यामध्ये महामार्ग प्रशासन अधिकारी व कंपनी ठेकेदार सामील आहेत. त्यांचे या कामात आर्थिक हितसंबंध आहेत. सदर कंपनी गेल्या दोन वर्षापासून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारत आहे.
_________________________हिंगणगाव हद्दीतील शौचालय तीन वर्षापासून बंदच _
बंद कामाची बिले ठेकेदाराच्या घशात __
महामार्ग प्रशासनाधिकारी व संबंधित कंपनी ठेकेदार यांच्या संगनमताने भ्रष्टाचार _________________
हिंगणगाव येथील शौचालय गेल्या तीन-चार वर्षापासून बंद आहे .त्याला जबाबदार पी एस पी एल कंपनी आहे. त्यामुळे वाहन चालकाची गैरसोय होत आहे. यावर शासन लाखो रुपये खर्च करत असून कंपनी मात्र फक्त बोगस बिल बनवत आहे. वाहतुकीमुळे रस्त्यावर वाळू मुरूम माती खडीचे थर आले असून या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. याबाबत कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता कंपनी प्रशासन अधिकारी सदर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५/०९/२०२१ रोजी पासून शासकीय वेळेत इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नितीन आरडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!