पुणे, दि. १८ : सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थामार्फत शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा (जी.डी.सी. ॲण्ड ए) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन (सी.एच.एम.) परीक्षा २४, २५ व २६ मे २०२४ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे; या निकालाच्या अनुषंगाने फेरमोजणीकरीता ५ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे तसेच ८ जानेवारी २०२५ पर्यंत चलन बँकेत भरावे, असे आवाहन जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्डाचे सचिव तथा सहकारी संस्था उपनिबंधकांनी (प.व प्र.) पुणे यांनी दिली आहे.